मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

Nov 20, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6
श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते… गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक विहीर होती तिथे कणसे भाजण्याची तयारी करण्यात आली.. तिथेच एक कल्पवृक्ष होते त्या खाली महाराज बसले .. त्या झाडाला मधमाश्याचे पोळे होते.. हे कुणाच्याही लक्षात आले नाही.. तिथेच कणसे भाजण्यासाठी सुरवात केली.. कणसे भाजत असताना धूर व अग्नीची दाहकता याचा परिणाम असा झाला कि त्या झाडावरील मधमाश्या उठल्या व सर्वांना चावू लागल्या.. सर्व जण पळू लागले श्री महाराज मात्र जागेवरून उठले नाही..ते स्वस्वरूपात रममाण होते.. सर्व माश्या श्री महाराजांच्या अंगावर बसल्या होत्या.. जसे कि महाराजांनी माश्यांची शाल केली आहे.. हे सर्व पाहून श्री बंकटलाल यांचे हृद्य द्रवित झाले.. त्यांच्या मनात विचार आला कि उगाचच आपण श्री महाराजांना कणसे खाण्यासाठी इथे आणले.. आणि श्री बंकटलाल श्री महाराजांकडे जाऊ लागला.. त्या क्षणी श्री महाराजांनी त्या मध माशांना आपल्या जागी जाण्याची आज्ञा दिली.. ते म्हणाले अरे माझा खरा भक्त माझ्या साठी येत आहे.. त्याला त्रास देऊ नका तुम्ही आपल्या जागेवर जा.. महाराजांनी असे म्हणताच सर्व माश्या झाडावर जाऊन बसल्या.. श्री बंकटलाल यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.. ते महाराजांना म्हणाले.. मी सोनाराला घेऊन येतो काटे काढण्यासाठी.. बंकटलाल सोनाराला घेऊन येतात.. सोनार पहातो तर त्याला एकही काटा दिसत नाही… तेव्हा तेव्हा सोनार म्हणतो कि मला तर काटे दिसत नाहीत.. तेव्हा श्री महाराज म्हणाले काटे काढण्यासाठी चिमट्याची आवश्यकता नाही.. महाराजांनी काही क्षण श्वास रोखला व काही क्षणात सर्व काटे बाहेर आले.. महाराजांचे शरीर पूर्वी प्रमाणे झाले.. हे सर्व पाहून सर्वांनी महाराजांचा जयजयकार केला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – वरील लीला म्हणजे भक्ती कशी असावी हे सांगण्यासाठीच हि लीला आहे.. पहा ब्रम्हांड नायक कणीस खाण्यासाठी शेतात गेले.. खरे तर हे एक निमित्त होते परीक्षा पाहण्यासाठी..मधमाशी मध देते पण ते अदृश्य रूपाने देते.. कारण आपण मध तेव्हाच खाऊ शकतो जेव्हा तिथे माशी नसेल.. म्हणजेच गुरुकृपा तेव्हाच होते जेव्हा संकट रुपी माशी दूर करू.. संकट रुपी माशी असतानाही जेव्हा आपण अखंड सेवा सुरु ठेवतो.. तेव्हा त्या सेवेचे फलित म्हणजे मधाप्रमाणे गोडवा होय.. जेव्हा आपण संकटाशी दोन हात करतो.. संकटात देखील आपली श्रद्धा ढळत नाही तेव्हा त्याचे फलस्वरूप गोडच असते.. वरील लीलेत कणसे खाण्यासाठी सर्व आली पण मध माश्या आल्यावर सर्वजण पळून गेली.. श्री बंकटलाल मात्र त्याही स्थिती मध्ये श्री महाराजांकडे जाण्यासाठी तयार होते.. त्याचे फलस्वरूप श्री महाराजांनी माश्याना आपल्या जागेवर जाण्याची आज्ञा दिली.. श्री बंकटलाल यांची भक्ती फारच उच्चतम होती.. यातून हाही बोध आपणस मिळतो कि एखादा संकटात असेल तर त्याला मदत करा कारण आज आपण त्याला केलेली मदत हि देखील सेवेचा एक भाग आहे.. इथे कदाचित आपल्यात मनात येइल कि आर्थिक मदत का ? आर्थिक मदत असे नाही तर आपण इथे मानसिक मदत करू शकतो.. आत्म बळ वाढवू शकतो.. मदत हि अनेक प्रकारे होऊ शकते फक्त मदत करताना आपले तसेच समाजाचे तसेच ज्याला आपण मदत करत आहोत त्याचे नुकसान तर होत नाही ना याची देखील आपणस भान ठेवायचे आहे.. चला तर मग आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया –हे समर्था.. आजची तुझी लीला म्हणजे भक्तीचा पाठच म्हणावी लागेल.. आजच्या लीलेतून संकटकाळी सुद्धा कशी भक्ती करावी याची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद…जसे भक्ती भाव बंकटलाल यांच्या हृदयात प्रगट झाले.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव.. हे मध माश्यानो आज पर्यंत आम्हीं आपणस फक्त आपण चावता एवढेच लक्षात ठेवल.. पण मधाची मधुरता तुमच्या शिवाय शक्य नाही हि शिकवण आम्हाला दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. कोणतेही संकट येवो.. आपल्यातील मधुरता आम्हाला आठवावी हीच समर्था प्रार्थना

 


Share
और पढिये !!

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...

जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७) आजचे चिंतन-मनन सर्व शास्त्र हुनी थोर !! असे माझा स्वामीराव !! जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि... आपणस लगेचच...

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६) आजचे चिंतन-मनन श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'नशीब' ..जे भेटते 'पुण्याईने' !! श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'पुण्य' ..ज्याने 'नशीब' बदलले आमुचे !! www.SwamiVaani.com...

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४) आजचे चिंतन-मनन अहंकार नसावा मनी ! समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !! कर्ता करविता एकच समर्थ स्वामी ! ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !! www.SwamiVaani.com वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे...

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३) आजचे चिंतन-मनन काळजी नको करू मित्रा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे..! ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास, आता नशीब तुझ्या सोबत आहे..!! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला...

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२) आजचे चिंतन-मनन अरे किती सोसतोस त्रास !! बन तू स्वामींचा दास ! विश्वासाने सांगतो , स्वामी करणार नाही तुला उदास !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास...

आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू... आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण...

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०) आजचे चिंतन-मनन अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा , नको घाबरू तू असे बाळ त्यांचा | www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार...

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९) दत्त येऊनिया ऊभा ठाकला , सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला , जन्ममरणाचा फेरा चुकवीला || - श्री दत्त महाराजांची आरती www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा...

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८) ✨ आजचे चिंतन-मनन ✨ जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे ।। इतुके देई दीन दयाळा , नच तव पद अंतरा रे ।। - आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग) www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त...