श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 19 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

May 8, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज काही दिवस शेगांव मध्ये राहिले… परब्रम्ह जिथे आवश्यकता असते तिथे संचार करत असते. कुणीही त्यांना एका ठिकाणी अडकवून ठेवू शकत नाही. वऱ्हाड प्रांतात अडगाव नावाचे गाव आहे तिथे गजानन महाराज जाण्यासाठी निघाले . तो महिना होता वैशाख. वैशाख महिना म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाचे प्रमाण इतके होते कि सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष होते. वाटेत अकोली नावाचे गाव होते. तिथे महाराज आले. महाराजांना खूप तहान लागली होती. महाराज ज्या रस्त्याने जात होते तिथे भास्कर नावाच्या शेतकरी आपल्या शेतात काम करीत होता. भास्कर ने स्वतःला पाणी पिण्यासाठी एक घागर पाणी आणले होते. श्री गजानन महाराज भास्कर च्या जवळ आले व पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पाजण्याचें खूप मोठे पुण्य आहे. पाण्याशिवाय प्राणाचे रक्षण होणे अशक्य आहे. मोठमोठे धनिक लोक पाणपोई द्वारे लोकांची तृष्णा भागवतात व पुण्य कमवतात. महाराजांच्या हि वाणी ऐकून भास्कर श्री महाराजाना म्हणाले आपण तर दिंगबर आपणस पाणी पाजून काय पुण्य मिळणार ? उलट जर अनाथ , पंगू , दुर्बल यांना पाणी पाजले तर पुण्य मिळेल हे शास्त्र वचन आहे. आपणास पाणी देऊन काय पुण्य मिळणार. मी आपणस पाणी देणार नाही. भास्कर हे बोलणे ऐकून महाराजांनी स्मित हास्य केले व तिथून पुढे निघाले. थोडे पुढे गेल्या नंतर तिथे एक विहीर होती. महाराजांना तिकडे जाताना पाहून भास्कर म्हणाला अहो ती विहीर कोरडी आहे. आणि हसू लागला. महाराज त्याला म्हणाले अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे पण एक प्रयत्न करतो समाज हितासाठी पाहूया पाणी मिळते का ? महाराज विहिरी जवळ आले. विहीर पूर्णतः कोरडी होती. महाराज तिथेच असणाऱ्या एक वृक्षा काही ध्यान लावून बसले आणि त्यांनी प्रार्थना सुरु केली – हे देवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्न राघवा । हे विठ्ठला नरहरी । हे आकोली पाण्यावाचून त्रस्त झाली । ओलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून । मानवी यत्न अवघे हरिलें । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊली । पाणी दे या विहिरीला । महाराजांच्या प्रार्थनेचे रूपांतर कृपेत झाले. विहिरीला पाण्याचा पाझर फुटला आणि काही क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरली. महाराज त्या विहिरीचे पाणी पिले. हे सर्व पाहून भास्कर थक्क झाला आणि त्याला कळून चुकले महाराज नक्कीच कुणीतरी महान योगी आहेत. तो धावतच महाराजांच्या जवळ आला आणि महाराजांना क्षमा प्रार्थना करू लागला. हे नरदेह धारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।लेकरासी कृपा कर । अर्भक मी तुमचे । मी आपणस ओळखले नाही आणि आपणस अपशब्द बोललो मला माफ करा. महाराज तर कृपेचे सागर आहेत ते कधी आपल्या बालकांवर रागावतील का. उलट महाराज त्याला म्हणाले अरे तुला त्रास होत होता म्हणूनच विहिरी ला आणि आणले आहे. विहिरीला पाणी लागल्याची वार्ता संपूर्ण गावात पसरली अनेक गावकरी मंडळी तिथे आली. सर्वांनी एका स्वरात महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज कि जय!

बोध – खरंतर आजच्या लीलाच पूर्णतः बोध आहे. त्यावर वेगळा बोध लिहिणे आवश्यक नाही असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. तरी देखील महाराजांना प्रार्थना करून आपण इथे बोध मांडण्याचा प्रयन्त करूया. आजची संपूर्ण लीला आपणस प्रार्थनेचे महत्व समजून सांगत आहे. जिथे कुठे आपला भक्त अडचणीत असेल तिथे परब्रह्म आपली मदत करण्यासाठी येत असते. या लीलेत श्री भास्कर हे देखील कोणत्या तरी देवाची भक्ती , सेवा करत असतील. त्यामुळेच परब्रम्ह श्री गजानन महाराज लीलेचे निमित्त करून त्यांच्या साठी धावून आले. कारण महाराजच श्री राम , श्री कृष्ण , विठ्ठल आहेत. आपण ज्या कोणत्या देवाची भक्ती करतो त्यांची नावे विविध आहेत पण परब्रम्ह मात्र एकच आहे. महाराजांनी भास्कर यांना पाणी मागितले पण भास्कर ने आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे महाराजांनाच आपले विचार सांगितले. महाराज त्यांना काहीच बोलले नाहीत कारण महाराजांची प्रत्येक लीला म्हणजे कृतीतून अनुभूती. इथे महाराजां नी स्वतः प्रार्थना केली. इथे महाराज आपणस प्रार्थनेची शक्ती समजवून सांगत आहेत. महाराजांनी प्रार्थना करून विहिरीस पाणी आणले. थोडक्यात महाराज आपणस सकारात्मक प्रार्थना करण्याची शिकवण देत आहेत. महाराज भास्करला म्हणत आहेत कि तुझ्या साठीच पाणी आणले आहे म्हणजेच भास्कर ने सुद्धा देवाला अनेकदा प्रार्थना केली असेल कि भगवंता पाण्याचे दुर्भिक्ष दूर कर आणि त्यांच्या प्रार्थनेचे फलस्वरूप महाराजांनी १४ वर्षांपासून कोरड्या असणाऱ्या विहिरीस पाणी निर्माण केले. इथे महाराज आपणस पाण्याचे महत्व देखील समजून सांगत आहे. पाणी म्हणजे जीवन. आज जे पाणी आहे ते जपून वापरा तसेच पाण्याचे स्तोत्र वाढवण्याची प्रेरणा महाराज आपणस देत आहेत.

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था.. आजची लीला म्हणजे प्रार्थना कशी करावी याची शिकवण आहे आमच्यासाठी.. ज्या प्रमाणे तू श्री भास्करराव यांच्याकडून प्रार्थना करवून घेतलीस व प्रार्थनेस निमित्त करून त्यांच्यावर कृपा केलीस अशीच कृपा आमच्यावर कर.. आमच्याकडून सकारात्मक प्रार्थना करवून घे.. तसेच आमच्याकडून पाण्याचे स्तोत्र वाढावेत ह्या साठी आम्हाला निमित्त कर.. आमच्याकडून हि प्रार्थना करवून घेतलीस त्या बद्दल खूप खूप धन्यवाद !!


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...