श्री गजानन चरित्र दर्शन 17 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 5

Mar 20, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज शेगांव मध्ये होते..महाराजांच्या लीला ची प्रचित अनेक भक्तांना येत होती..त्यामुळे दिवसेंदिवस.. भक्तांची गर्दी वाढतच होती..अचानक एक दिवस महाराजांच्या काय मनात आले माहित नाही… महाराज अचानक शेगांव सोडून… शेगांव जवळ असणाऱ्या पिंपळगाव गावात निघून गेले… महाराज कुठे गेले हे कुणासच ठाऊक नव्हते… त्या पिंपळगाव गावात अरण्यात एक हेमाडपंती शंकराचे मंदिर होते… महाराज मंदिरात जाऊन बसले… पद्मासनात महाराज ध्यानस्थ बसले… त्या अरण्यात अनेक गुराखी मुले आपले गुरे घेऊन येत असत… गुरे चरत असताना काही मुले भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी येतात… तेव्हा त्यांना महाराजांचे दर्शन होते… महाराजांचे स्वरूप पाहून ते मुले जरा गोंधळून गेली.. कारण महाराज ध्यानस्थ बसले होते… त्या मुलांनी महाराजांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण महाराज काहीच बोलले नाही… काहींना वाटले हे साधू जेवण न मिळाल्या मुळे कदाचित बोलत नसावेत… तेव्हा त्या मुलांनी आपल्या जवळील जी शिदोरी होती… ठेचा.. भाकरी… कांदा महाराजांना दिला परंतु महाराज काहीच बोलले नाहीत.. ते ध्यानावस्थेतच होते…  मुलांना काहीच समजत नव्हते… ते एकमेकांशी बोलत होते..कुणी म्हणे हे मरण पावले आहेत असेही नाही कारण… मृत माणसाचे अंग गार असते… यांचे अंग गार नाही… कुणी म्हणे भूत… पण भूत असू शकत नाही… भूत मंदिरात बसणार नाही… कुणी म्हणाले हे देव असावेत… आपण यांचे पूजन करू… त्या सर्वांनी महाराजांची पूजा केली.. पण महाराज काही ध्यानातून बाहेर आले नाही… आता दिवस मावळण्याची वेळ झाली होती… सर्व मुले एकमेकांना म्हणाली आता आपण घरी जाऊ या… आपले घरचे वाट पहात असतील… त्या मुलांनी ठेचा भाकरी तशीच ठेवली व सर्व जण आपापल्या घरी निघून गेले … सर्वांनी घरी गेल्यावर हि घटना आपल्या घरी सांगितली… संपूर्ण गावात हि बातमी पसरली… दुसऱ्या दिवशी सर्व गावाचं त्या मंदिरात आले… पाहतो तर काय… महाराज त्याच अवस्थेत होते… महाराजांनी भाकरी सुद्धा खाल्ली नव्हती… सर्वांना आश्चर्य वाटले… काही जण म्हणे हे शिवजी आहेत… समाधी अवस्थेत आहेत.. त्यांना त्रास होईल असे वर्तन करू नका… गावातील सर्व लोकांनी एक पालखी सजवली आणि त्यात महाराजांना बसवले… महाराजांची पूजा केली… वाद्य संगीतात महाराजांची पालखी सोहळा करण्यात आला… अनेक लोक भजन म्हणत होती… जय जय योगीराज मूर्ती… महाराजांची पालखी गावातील मारुती मंदिरात आणण्यात आली… पाटावर महाराजांना बसवण्यात आले.. महाराज समाधी अवस्थेतच होते… तोही दिवस तसाच गेला… आता लोकांना काय करावे समजत नव्हते… कुणी स्तवन करत होते… कुणी प्रार्थना करत होते… तर काही जणांनी उपवास पकडला… महाराजांनी समाधी अवस्थेतून बाहेर येऊन आपल्याशी बोलावे या साठी…आणि काय आश्चर्य महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले… उपस्थित सर्व मंडळी आनंदित झाली… सर्वानी महाराजांना नैवैद्य ग्रहण करण्याची विनंती केली… महाराजांनी नैवद्य ग्रहण केला… सर्व जण खूप आनंदित झाले… तो दिवस होता सोमवार चा … सर्वांनी एक घोषात महाराजांचा जयजयकार केला… जय जय योगीराज मूर्ती .

बोध – वरील लीला तर आपल्या मनाचे दर्शन होण्यासाठी एक आरसाच आहे.. महाराज शेगांव सोडून अचानकपणे पिंपळगाव गावात आले.. म्हणजेच परब्रह्म हे कधीच एका ठिकाणी नसतात… ते सर्वत्र असतात.. त्यांना आपण कोणत्याही क्षेत्रा पुरते मर्यादित समजू नये… महाराज अरण्यातील शिव मंदिरात ध्यानस्थ बसले.. महाराज इथे आपणस ध्यानाचे महत्व सांगत आहेत.. आपणस जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण ध्यानात जावे… म्हणजेच आपल्या मूळ अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करावा हा खूप खोल असा संदेश महाराज आपणस देत आहेत… इथे गुराखी मुले गुरांना चरण्यासाठी घेऊन आले होते… जेणेकरून त्यांना मनसोक्त चरण्याचा आनंद घेता येईल… इथे महाराज आपल्याला आपल्या मनाचे दर्शन घडवत आहेत… आपले मन देखील त्या गुरां प्रमाणे इकडे तिकडे चोहीकडे धावत असते… ते कधीच एका ठिकाणी स्थिर रहात नाही… महाराज यातून आपणस सांगत आहेत… ज्या प्रमाणे गुरे चरण्यासाठी गुराखी विशिष्ठ ठिकाणी घेऊन जातात जेणेकरून इतर कुणाचे नुकसान होऊ नये… इथे महाराज या गोष्टीला निमित्त करून सांगत आहेत ज्या प्रमाणे गुराखी गुरे एका ठिकाणी चरण्यासाठी आणतो… त्या प्रमाणे आपणस आपले मन चांगल्या गोष्टी साठी स्थिर करायचे आहे… जेणेकरून ते चुकीच्या ठिकाणी धाव घेणार नाही… महाराजांना पाहिल्या नंतर त्या मुलांच्या मनात अनेक प्रश्न आले… त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट केली कि महाराजांना खाण्यासाठी ठेचा… भाकरी आणून दिली… यातून आपणस बोध होतो कि आपण आपल्या भोजनातील काही हिस्सा गरजू व्यक्तीला देणे आवश्यक आहे… पहा त्या गुराखी मुलांकडे किती भाकरी असेल त्यांच्या पुरतीची असेल… पण तरी देखील त्यांनी आपल्यातील भाकरी त्यांना दिली… यातून आपणस इतरांना देण्याचा गुण विकसित करण्यास सांगत आहेत… गावांतील लोकांनी महाराजांना शिव स्वरूप मानले…आणि श्रद्धा युक्त त्यांनी महाराजांचे पूजन केली… अनके भजने … प्रार्थना केल्या पण महाराज समाधी अवस्थेतून बाहेर आले नाहीत… हे सर्व पाहून त्यानी उपवासाचे व्रत घेतले… या व्रतातून आपणस विश्वास … श्रद्धा व भक्ती कशी असावी याची आपणास महाराज ओळख करून देत आहेत… उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणे नाही तर…आपल्यातील नकारात्मक विचारांचा उपवास करण्याची महाराज आपणस शिकवण देत आहेत.. थोडक्यात आजची लीला म्हणजे बोधांचा खजाना आहे. चला आपण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… हे समर्था आजच्या लीलेतून तू आम्हाला आमच्या मनाचे दर्शन घडवून दिलेस त्याबद्दल धन्यवाद…आपण आजच्या लीलेस माध्यम करून ध्यानाचे जे महत्व समजून दिलेस त्याबद्दल धन्यवाद..आम्हाला तुझ्या ध्यानात मग्न कर… आमच्या मनाला ध्यानाची सवय लागावी यासाठी मला मदत कर…आमच्यात इतरांना देण्याचा गुण विकसित कर.. आम्हाला आमच्यातील नकारात्मक विचारांवर उपवास करण्याची सवय आमच्यात दृढ कर… समर्था हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !! 


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...