श्री गजानन चरित्र दर्शन 12 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Jan 16, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी राहत होते.. एकेदिवशी एक प्रकार घडला तो दिवस होता… वैशाख शुद्ध तृतीयेचा दिवस होता… म्हणजेच अक्षय तृतीया चा दिवस होता… म्हणजेच या दिवशी आपण पितृ पूजन करतो तो दिवस… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त..त्या दिवशी श्री महाराजांच्या काय मनात आले कुणास ठाऊक… श्री महाराज मुलांमध्ये बैसले आणि म्हणाले आम्हाला चिलीम हवी आहे कुणीतरी भरून द्यावी… हि महाराजांची वाणी होताच सर्व मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली… परंतु ती चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची आवश्यकता होती… आता सर्वांनां प्रश्न पडला कि विस्तव कुठून आणावा… तितक्यात तिथे श्री बंकटलाल आले… बंकटलालानी मुलांना विचारले काय झाले… तेव्हा मुले म्हणाली… महाराजांना चिलीम भरुन दिली आहे परंतु ती पेटवण्यासाठी अग्नी नाही… तेव्हा बंकटलाल म्हणाले चिंता कशाला करता… आपल्या गल्लीत जानकीराम सोनार आहेत ना त्याच्या कडे जाऊन अग्नी घेऊन या… त्याच्या व्यवसायाची सुरवात अग्नी सुरु करूनच होते… ती मुले सोनाराकडे गेली… सोनाराला अग्नी मागितला… सोनार त्या मुलांना रागावला आणि म्हणाला अरे काय तुम्ही त्या महाराजांच्या नादी लागला आहात .. मी काही अग्नी वगैरे देणार नाही.. जाऊन सांग त्यांना जर आहात तुम्ही साक्षात्कारी तर मग विस्तवाची काय गरज आहे.. पेटवा तशीच चिलीम… सर्व मुले नाराज झाली… मुलांनी सर्व वृत्तांत महाराजांना व बंकटलाल यांना सांगितला… हे ऐकून महाराज हसले … बंकटलाल महाराजांना म्हणाला मी अग्नी तयार करतो… तेव्हा श्री महाराज म्हणाले… अग्नी तयार करू नकोस… नुसती काडी चिलीम जवळ धर… श्री महाराजांच्या आज्ञे नुसार बंकटलाल यांनी नुसती काडी चिलीम जवळ धरली तर चमत्कार झाला… चिलीम पेटली… काडी जशी तशी राहिली…सर्वांनी महाराजांची ती लीला पाहिली आणि एका स्वरात  सर्वांनी श्री गजानन महाराज कि जय असा जय जयकार केला.

बोध – श्री महाराज आम्हाला वरील लीलेतून बोध द्या… महाराजांनी वरील लीला केली तो दिवस होता… अक्षय तृतीया … खरंतर अक्षय तृतीया म्हणजे आपल्यातील चांगल्या गुणांना वाव देणे… चांगले गुण वाढवणे.. पुण्य कमवणे… साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त होय… पण तो मुहूर्त जर आपल्या जीवनात बदल घडवत नसेल तर त्या दिवसाला मुहूर्त कसे म्हणणार… श्री महाराजांची इच्छा होती कि जानकीराम सोनार यांच्या जीवनात बदल घडवावा… पुण्य वृद्धी व्हावी… या साठी श्री महाराजांनी चिलीम ओढण्याची लीला केली… महाराजांच्या इच्छे नुसार सर्व मुले जानकीराम यांच्याकडे अग्नी मागण्यासाठी गेले परंतु… श्री जानकीराम यांची पुण्याई कमी पडली त्या मुळे त्यांनी अग्नी दिला नाही उलट त्यांनी महाराजांची टीका केली… या सर्व प्रकारा मुळे मुले नाराज झाले परंतु महाराजांनी अग्नी शिवाय चिलीम प्रज्वलित करून सर्वांना अनुभूती दिली.. खरंतर वरील लीलेतील जानकीराम हे आपल्या मध्ये सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात पण आपण त्या कडे लक्ष देत नाही… आणि एक दिवस असा येतो कि जसे श्री जानकी राम यांना परब्रह्म कृपा करण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांचे पूर्व संस्कार आड आले… असेच आपल्या जीवनात देखील होत असते… या ठिकाणी अग्नी म्हणजे आपल्यातील असणारी शक्ती जागृतीचे एक प्रतीक आहे.. जसा दिवा लावण्यासाठी अग्नी हवा असतो तसे आपल्या जीवनात महाराजांची कृपा होण्यासाठी आपणस आपल्यातील अवगुणांवर काम करून त्यावर मात करायची आहे… जेणेकरून श्री महाराज आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करू इच्छितात त्या साठी मार्ग मोकळा होईल . चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आजच्या लीलेला माध्यम करून आपण आम्हाला खरी अक्षय तृतीया काय असते याची समज दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आपण अनेकदा आमच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात.. परंतु आमचे मन या मध्ये बाधा निर्माण करते…आमचे मन जानकीराम यांच्याप्रमाणे कृती करते… आम्हाला त्या मुलानं प्रमाणे बनव… जसे ती मुले तुमच्या आज्ञे प्रमाणे कृती करण्यास तयार झाली… त्या प्रमाणे आमचे मन बनव… जेणेकरून तू जे काही मला देऊ इच्छितोस त्यात माझे मन बाधा निर्माण करणार नाही.. धन्यवाद आई… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… श्री गजानन महाराज कि जय ।।


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...