जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच- श्री गजानन चरित्र दर्शन 11 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ३

Jan 4, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

जसे कर्म तसे फळ आज नाही तर उद्या नक्की मिळतेच

श्री विठोबा घाटोळ यांना पूर्व पुण्याई ने श्री गजानन महाराजांच्या सेवेची संधी त्यांना मिळाली होती पण म्हणतात ना पुण्य करण्यासाठी पुण्य गाठी असावे लागते… श्री विठोबा घाटोळ यांना श्री महाराजांच्या सेवेची खूप छान अशी संधी मिळाली होती… श्री विठोबा घाटोळ हे महाराजांची सेवा करत होते परंतु अंतर्मनात वेगेळेच विचार सुरु होते… मनात अहंकार… खोटी भक्ती … लालसा होती … महाराजांची सेवा थोडीच करत परुंतु दिखाऊ पण जास्त करत.. तो सर्वाना सांगत असे कि समर्थांच्या सेवेचे काम माझ्याशिवाय होत नाही… महाराज माझा शब्द कधीच टाळत नाहीत… इतर भक्तांवर तो हुकूम गाजवण्याचे काम करत असे… हे सर्व महाराजांना माहित होते परंतु महाराज त्या कडे दुर्लक्ष करत… एके दिवशी काही बाहेरगावची मंडळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी आली होती… परंतु त्यावेळी महाराज आराम करत होते… महाराजांना उठवण्याची कुणाची हिम्मत नव्हती.. सर्वांना प्रश्न पडला कि महाराजांना कुणीत उठवावे… त्यावेळी अनेकांनी श्री विठोबा घाटोळ यांचे नाव सुचवले… त्या बाहेरगाव वरून आलेल्या भक्तांनी श्री विठोबा घाटोळ यांना विनंती केली…आणि त्यांची विनंती व स्तुति ऐकून ते भारावून गेले… अहंकार जागृत झाला…आणि ते श्री महाराजांकडे गेले…श्री महाराजांना सर्व हकीकत सांगितली व आपण त्या लोकांना दर्शन द्यावे अशी विंनती केली… महाराजांकडे एक काठी होती ती घेऊ ते बाहेर आले… आलेल्या भक्तांना दर्शन दिले… दर्शन घेऊन बाहेरगांव वरून आलेले भक्त निघून गेले… ते भक्त निघून जाताच श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांस तिथे उपस्थित लोकांसमोर काठीने बदडून काढले… महाराजांचा मर खाल्ल्या नंतर श्री विठोबा तिथून पळून गेला तो परत काही श्री महाराजांकडे आला नाही … बोला श्री गजानन महाराज कि जय !! 

बोला || अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध -खरंतर वरील लीला म्हणजे आपल्या साठी डोळ्यातील अंजन आहे म्हणावे लागेल… पहा श्री विठोबा घाटोळ यांची पूर्वपुण्याई होती म्हणूनच त्यांना श्री महाराजांचा सहवास व सेवा करण्याचे भाग्य लाभले… परंतु त्यांच्यातील अहंकार व लोभी वृत्ती मूळे त्यांना त्या सेवेचा लाभ घेता आला नाही व परब्रम्हाच्या सेवेस ते मुकले… इथे आपणस हा सुद्धा बोध होतो पहा ना श्री महाराज आराम करत होते तरीही जे भक्त त्यांच्या दर्शन साठी आले होते… त्याची श्री महाराजांवर इतकी श्रद्धा होती कि श्री महाराज त्यांना दर्शन देण्यासाठी तात्काळ आले… इथे श्री महाराजांनी श्री विठोबा घाटोळ यांना काठीने मारले… खरे तर महाराजांचा मार हा आपल्यातील चुकीच्या वृत्ती काढून टाकण्यासाठी असतो… आहे हे श्री विठोबा घाटोळ यांना समजले नाही…जसे हे त्यांना समजले नाही तसेच अनेकदा आपल्याही बाबतीत होत असते… अनेकदा आपल्याकडून जेव्हा काहीचुका होतात तेव्हा श्री महाराज इतरांना माध्यम बनवून आपल्याला मार वा समज देत असतात … कारण महाराजांना आपल्यातील चुकीच्या समजुती… आपल्यातील दिखाऊपणा घालवून आपल्यातील भक्ती वाढवायची आहे… परंतु नेमके आपण सुद्धा अनेकदा या गोष्टीला विरोध करतो आणि श्री विठोबा घाटोळ यांच्या प्रमाणे सेवा सोडून इतरत्र अडकतो… आपणस यावर स्व चिंतन… करण्याची नितांत गरज आहे… चला तर मग आपण त्या साठी श्री महाराजांना प्रार्थना करूया ..
प्रार्थना – श्री गजानन महाराज आमची देखील पुण्याई म्हणून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे… अनेकदा तू माझी प्रगती व्हावी यासाठी… इतरांच्या मार्फत शब्दरुपी काठी द्वारे व अन्य मार्गाने तू आमच्यातील… ढोंगीपणा… दिखाऊपणा… जावा यासाठी मला मदत करत असतेस परंतु माझ्यातील अहंकारी मन याला विरोध करते… आई माझी इतकीच प्रार्थना आहे कि माझ्या मनाने कितीही विरोध करू दे परंतु तू मला सॊडू नकोस कारण माझे भले कश्यात आहे हे मला समजत नाही… धन्यवाद आई… कोटी कोटी धन्यवाद

 

 


Share
और पढिये !!

आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !!

स्वामी वाणी पुष्प ५३४(पर्व ४ थे भाग ३८) आजचे चिंतन-मनन हे मना ! आता नको भीती कुणाची ! प्रचंड स्वामी शक्ती आहे पाठिशी !! क्षणोक्षणी काळजी घेती भक्ताची ! ही गुरूमाऊली !! www.SwamiVaani.com या ओवीतून स्वामीं नी आपल्या मनावर प्रहार केला आहे..कोणतीही गोष्ट ही आपल्या...

जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७) आजचे चिंतन-मनन सर्व शास्त्र हुनी थोर !! असे माझा स्वामीराव !! जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि... आपणस लगेचच...

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६) आजचे चिंतन-मनन श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'नशीब' ..जे भेटते 'पुण्याईने' !! श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'पुण्य' ..ज्याने 'नशीब' बदलले आमुचे !! www.SwamiVaani.com...

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४) आजचे चिंतन-मनन अहंकार नसावा मनी ! समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !! कर्ता करविता एकच समर्थ स्वामी ! ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !! www.SwamiVaani.com वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे...

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३) आजचे चिंतन-मनन काळजी नको करू मित्रा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे..! ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास, आता नशीब तुझ्या सोबत आहे..!! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला...

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२) आजचे चिंतन-मनन अरे किती सोसतोस त्रास !! बन तू स्वामींचा दास ! विश्वासाने सांगतो , स्वामी करणार नाही तुला उदास !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास...

आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू... आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण...

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०) आजचे चिंतन-मनन अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा , नको घाबरू तू असे बाळ त्यांचा | www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार...

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९) दत्त येऊनिया ऊभा ठाकला , सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला , जन्ममरणाचा फेरा चुकवीला || - श्री दत्त महाराजांची आरती www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा...

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८) ✨ आजचे चिंतन-मनन ✨ जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे ।। इतुके देई दीन दयाळा , नच तव पद अंतरा रे ।। - आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग) www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त...