उत्तम लक्षणें – श्री रामदास स्वामी – संदर्भ – ग्रंथराज – दासबोध

Nov 27, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

आपल्यात कोणते उत्तम गुण असावेत याचे समर्थ श्री रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथात वर्णन केले आहे. त्यातील काही उत्तम गुणांवर आज आपण चिंतन करूयात.

वाट पुसल्याविण जाऊ नये । फळ वोळखल्यावीण खाऊ नये । – बघा महाराज खूप सुंदर सांगत आहेत वाट पुसल्याविण जाऊ नये… म्हणजे अनेकदा आपण बाहेर गावी जाण्याचे नियोजन करतो… अनेकदा आपणस तिथली माहिती नसती… अश्या वेळेस आपण अनेकदा दिशादर्शकाचा वापर करतो… वा अनेक ऑनलाईन पर्याय वापरतो… पण यातून अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते… यांपेक्षा आपण जर जाणकार व्यक्तींना विचारले तर नक्कीच आपल्या पुढील अनेक अडचणी आपण टाळू शकतो.. यातून अनेक गोष्टी आपणस माहिती होतील… जसे कसे जाणे योग्य आहे… तिथे काय काय आपण पाहू शकतो…अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणस मिळतील व आपला प्रवास सुखकारक होईल…यातून आणखीन एक मतीती अर्थ आपणस प्राप्त होते आहे… अनेकदा आपणस एखाद्य विषयाची अडचण असते.. पण अनेकदा आपण कुणास विचारत नाही नाही आणि आपणस अडचणी येतात.. जर आपण वेळीच जाणकारांचे मार्गदर्शन घेतले तर नक्कीच आपणस योग्य मार्ग मिळू शकतो… आपण काय खावे तर जे आपल्या प्रकृती ला योग्य आहे तेच पदार्थ आपण सेवन करावेत.. असे नाही कि आपल्या जिभेला आणि मनाला आवडते म्हणून आपण त्या पदार्थाचे सेवन करावे.. जे आपल्या प्रकृतीला योग्य आहे असाच आहार घ्यावा.. म्हणजेच आपण आपल्या आहारा विषयी जागृत असणे आवश्यक आहे.

अति वाद करू नये । पोटी कपट धरू नये – अनेकदा आपण अनेक विषयावर एकमेकांशी वाद घालत बसतो.. त्या वादाचा विषय मूलतः काहीच नसतो… जसे समजा एखादा खेळाचा सामना सुरु आहे… तेव्हा अनेक व्यक्ती एकमेकांशी वाद घालतात… कारण प्रत्येकजण हाच प्रयत्न करतो कि मीच योग्य आहे.. जर खोलवर विचार केला तर आपणस या वादातून त्या दोघांमध्ये कुणाचाच काहीच फायदा होणार नाही तरी देखील ते एकमेकांशी वाद घालून परस्पर संबध खराब करतात… असे वाद करून काय उपयोग आहे का? अनेकदा काय होते आपले एकमेकांशी भांडण होते… भांडण फार किरकोळ असते पण आपले मन त्याला मोठे करते आणि मग मन म्हणते मेलो तरी त्याच्याशी बोलणार नाही वा नाते ठेवणार नाही.. विचार करा आपणास एकदाच मनुष्य जन्म मिळतो.. या कोरोना तर आपणस हेच शिकवले आहे कि आपला क्षणाचा भरोसा नाही… कधी आपला श्वास बंद होईल… तरी देखील जर आपण मनात कपट ठेवत असू तर हे कितपत योग्य आहे.. यावा आपण जरूर चिंतन मनंन करावे.

विचारेंविण बोलू नये । विवंचनेविन चालों नये। मर्यादेविन हालो नये। – अनेकदा आपण इतके बोलतो कि आपणस देखील आठवत नाही कि आपण काय बोललो… आणि नंतर आपणस आपल्या बोलण्याचा पश्चताप होतो… एकदा बंदुकीतील गोळी सुटीला कि आप तिची दिशा बदलू शकत नाही… तसेच शब्दांचे आहे… अनेकदा आपण भावनेच्या भरात काही तरी अति बोलत असतो…आपण बोलताना मागचा पुढचा काहीच विचार करत नाही… समोरची व्यक्ती एक बोलली कि आपण दोन शब्द बोलतो … पण नेमकी समोरची व्यक्ती असे का बोलत आहे… नेमकी कोणती परिस्थिती असेल म्हणून ती विचार न करता बोलत आहे.. या सर्व गोष्टीं चा आपण आधी सारासार विचार करणे आवश्यक आहे… असे नाही कि समोरच्या व्यक्तीने आपणस अपशब्द बोलला कि लगेचच आपण बोलले पाहिजे… उलट अश्या वेळेस आपण काही काळ थांबावे… शक्य असेल तर आपण त्या स्थानाचा त्याग करू शकता.. याचा अर्थ असा नाही कि आपण माघार घेत आहोत… आपण आपल्या सारासार बुद्धी चा वापर करत आहोत. .. यातून आपण काही मर्यादांचे देखील पाल करत असतो… जसे समोरील व्यक्ती आपल्या पेक्षा मोठी असेल तर एक प्रकारे तिचा तो आदरच होईल.. तसेच आपण आपल्या मर्यादा पाळल्या हे समाधान आपणास नक्कीच आनंद देऊन जाईल.

निंदा द्वेष करू नये । असत्संग धरू नये – अनेकदा आपण एकमेकाची निंदा करतो..जर आपण जर खोलवर जर विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची निंदा करतो तेव्हा जर आपण विचार केला तर आपणस जाणवेल कि आपण किती मूर्ख पण करत आहोत… आपण त्याची निंदा करतो म्हणजे एक प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार व द्वेष आपण त्या व्यक्ती विषयी आपल्या मनात टाकून.. आपले मंच खराब करून घेतो.. त्याचा फायदा तर काहीच नाही… कारण त्याची निंदा करून आपण नक्की काय साध्य करतो तर … आपले स्वतःचे नुकसान करत असतो… कारण आपण आपल्या विचारांना चुकीचे खाद्य देतो.. त्याचा परिमाण आपल्यावरच होत असतो… त्या मुळे प्रयत्न करूया कुणाची हि निंदा करणार नाही… आता आपण कुंची निंदा करत नाही पण .. समोरील व्यक्ती आपल्या समोर इतरांची निंदा करतो हा एक प्रकारचा असत्संग आहे.. तो आपण नक्कीच टाळू शकतो… आपण तो विषय तिथेच थांबवू शकतो.

ऐक्यतेसी फोडू नये । विद्याभ्यास सोडू नये – हा खूपच खोल विचार आपणस देत आहेत एकीचे बळ आपण सर्वच जाणतो… जर आपल्यात एकी असेल तर आपले कुणीच काही बिगडवू शकत नाही.. याबाबत आपण लहानपणी गोष्ट ऐकिली आहे.. पण आपण जसे मोठे होतो हि गोष्ट विसरतो .. आपणास हि गोष्ट कायम स्मरणात ठेवायची आहे… व आपल्या जीवनात अंमलात आणायची आहे… तसेच इतरांना सुद्धा या साठी प्रेरित करायचे आहे… तसेच आपण शाळा सोडली कि अभ्यास सोडून देतो… आपण जर पाहिलीत कि जी मोठी लोक असतात ते सदैव अभ्यास करत असतात.. हा अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी वाचन का ? तर तसे नाही तर नेहमी नवीन गोष्ट शिकतात… जसे एखादा क्रिकेटर आहे तो… कायम सराव करतात त्यामुळे ते उत्कृष्टपणे खेळू शकतात… हि त्यांची खूप मोठी मेहनत म्हणजेच विद्याभ्यास आहे.

चला आज आपण इथेच थांबू या – समर्थांना प्रार्थना करूया – महाराज आज आपण आम्हाला उत्तम गुणांची जी समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आज आपण आम्हाला इतरांशी संवाद साधण्याची समज दिलीत… वाद न करण्याची समज दिलीत … मनातं कुणाविषयी कपट न ठेवण्याची समज दिलीत… वाणी वरच्या नियंत्रणाची समज दिलीत…निंदा द्वेष न करण्याची समज दिलीत… संगत कशी असावी हि समज दिलीत.. एकता व विद्याभ्यास ची समज दिलीत… या सर्व समज वर काम करण्याची आम्हाला प्रेरणा द्या… फक्त हि गोष्ट विचारात ना राहता.. आमच्या जीवनात उतरावी.. हि प्रार्थना करू घेतल्याबद्दल धन्यवाद !!

 

 


Share
और पढिये !!

१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना...

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...