अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!! श्री गजानन वाणी भाग १ – संदर्भ -ग्रंथ श्री गजानन विजय

Nov 4, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज काही ना बोलता कृती द्वारे सांगत आहेत.. अन्न  हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा आदर करा!!

श्री क्षेत्र शेगाव मध्ये देवीदास पातुरकर नावाचे गृहस्थ राहात होते… ते मठाधिपती होते… एके दिवशी त्यांच्या घरी त्याच्या मुलाच्या ऋतू शांतीचा कार्यक्रम होता… त्या निमित्त त्यांनी अनेक लोकांना भोजनासाठी निमंत्रण दिले होते…त्या काळी जेवण करण्यासाठी पानाच्या पत्रावळीचा वापर केला जात… आज हि अनेक ठिकाणी याचा वापर होतो… जेवण  झाल्यावर त्या पत्रावळी त्यांच्याह घर शेजारी असणाऱ्या कचरा कुंडीत टाकल्या जात होत्या… सर्वप्रथम त्याच ठिकाणी श्री गजानन महाराज त्या कचरा कुंडीपाशी येऊन बसलेले दिसले… आजानुबाहु , तेजस्वी मुद्रा ,दिगम्बर ,अंगावर जुन्या कापडाची बंडी आणि हातात चिलीम होती… परब्रम्ह श्री गजानन महाराज त्या पत्रावळी वरील जे भाताचे शीत होते ते उचलून खात होते…

!! गण गण गणात बोते !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध – परब्रम्हाची प्रत्येक लीला हि आपल्या साठी प्रेरणा देणारी आहे… आणि त्यांच्या लीलेतुन बोध प्राप्त होण्यासाठी त्यांची कृपाच असावी लागते…  चला आपण त्यांनाच प्रार्थना करूया आम्हाला  हृदयातून मार्गदर्शन करा… अन्नाचा प्रत्येक कण  हा महत्वपूर्ण असा आहे… एक एक कणा पासून अनके कण बनतात आणि त्यातून अनेक जणांचे उदरभरण होऊ शकते… अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे हि समज आपणस कायम ठेवायची आहे… आपणस अन्नाचा एकही कण  वाया जाणार नाही या साठी प्रयन्त करायचा आहे… या ठिकाणी श्री गजानन महाराज श्री पातुरकर यांच्या  घरी जाऊन सुद्धा जेवण करू शकत होते… परंतु त्यांना आपल्याला समज देण्यासाठी हि लीला केली आहे… आपल्याला जेवढे आवश्यक आहे तवढेच अन्न  घ्या .. तसेच अन्नाच्या प्रत्येक कणाला  धन्यवाद द्या… त्याचप्रमाणे ज्या शेती मधून हे धान्य आले त्या शेतकऱ्याला धन्यवाद द्या… ज्यांनी हे अन्न  बनवले त्यांना धन्यवाद द्या…तसेच आणखीन ऐका  गोष्टीचे भान आपणस ठेवायचे आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाहेर हॉटेल मध्ये जेवण करण्यास जातो त्यावेळेस आपणस या गोष्टी चे जास्त भान ठेवायचे आहे… कारण आपण अनेकदा अन्न  तसेच टाकून देतो… इथे आपणस विशेष काळजी घ्यायची आहे… आपला आहे अन्ना विषयी चा भाव…  समज श्री गजानन महाराजांच्या सेवेचे पहिले पाऊल ठरेल… !!बोला

|| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद

भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज आज आपण आम्हाला अन्न हे पूर्णब्रम्ह हि जी समज  दिलीत त्या बद्दल धन्यवाद…हि समज आम्हाला कायम राहावी आणि अन्नाच्या एकाही  कणाचे नुकसान आमच्या द्वारे होऊ नये..अन्नाचा प्रत्येक कण  ग्रहण करताना तुमच्या बोधाची.. लीलेची आठवण असावी हीच प्रार्थना… धन्यवाद महाराज कोटि कोटि धन्यवाद

 


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...