श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन १

Sep 19, 2021 | ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

Share

खरं तर तारक मंत्र म्हणजे प्रत्येक स्वामीं भक्ता साठी स्वामीं च कवच आहे..प्रत्येक शब्द हा स्वामीं अनुभूती आहे..खरंतर ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात गुंफला..त्यांची भक्ती ची अवस्था ही खूपच वरच्या पात्रते ची असणार..आणि त्यामुळेच स्वामींनी आपल्या सर्वांसाठी तारक मंत्र त्यांच्या कडून करून घेतला..ज्यांनी हा तारक मंत्र शब्द रुपात उतरवला त्यांचे उपकार तर आपण कधीच फेडू शकत नाही..उलट त्यांना प्रार्थना करू या ..आमच्या अल्प बुद्धी ला त्याचा अर्थ उलगडू द्या..जशी भक्ती.. सेवा तुमच्या मार्फत झाली त्यातील काही तर सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त व्हावी..आणि आमचे जीवन स्वामीं मय बनावे हीच प्रार्थना!
निःशंक हो निर्भय हो मन रे !
सुरवातीलाच स्वामीं आपल्या मनाला सांगत आहेत…हे मना..मनात कोणतीही शंका आणू नकोस..कोणतीच भीती मनात ठेवू नकोस…पहा सुरवातीलाच स्वामीं सांगत आहेत आपल्या स्वतःच्या मनावर कार्य करण्यास..कारण आपले मन हे सर्व गोष्टीचे कारक आहे..आपण मनात शंका उपस्थित केली की..आपले होणारे काम ही होत नाही..आपण मनाला सांगायच आहे..हे मना कोणतीच शंका भीती मनात आणू नकोस मनाला सांगायचं आहे..तू जी नकारात्मक बडबड करत आहेस..त्यापेक्षा स्वामीं नाम घे..मना एक गोष्ट लक्षात ठेव सर्व नकारात्मक विचारावर जे राम बाण औषध मला मिळालं आहे..ते म्हणजे “श्री स्वामीं समर्थ” हे नाम अंतर्मनात इतके रुजवा की आपले मन पण म्हणेल..अभी सिर्फ और सिर्फ श्री स्वामी समर्थ”
प्रचंड स्वामीं बळ पाठीशी रे- इथे स्वामीं महाराज आपल्या मनाला सांगण्यास सांगत आहेत ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या पाठीशी आहे..आता इथे आपले मन शंका कुशंका निर्माण करते स्वामीं बळ पाठीशी आहे तरी पण आपले मन आपल्या मनात शंका निर्माण करते..या शंकेचे रूपांतर ..नकारात्मकते मध्ये होते..आणि आपल्यासोबत असणारी स्वामीं ची शक्ती जी कार्य करणार होती तिला अडथळा निर्माण होतो..आज आपण हाथ धुतो.. मास्क लावतो का ? कारण आपल्या मनावर हे खोल पर्यंत रुजले आहे की यानी आपण होणाऱ्या रोगाचा अटकाव करू शकतो अगदी तसेच नकारात्मक विचारांना हे माहीत आहे जर आपल्या मनावर नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्या तर हा नक्कीच यांच्या पासून स्वामीं ची शक्ती बळ यांना प्राप्त होणार आहे यात अडथळा निर्माण होणार आहे..म्हणून मनाला सतत सांगा स्वामीं महाराजांची शक्ती माझ्या सतत सोबत आहे
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी…स्वामीं महाराज हे आपल्या सामान्य बुद्धी च्या पली कडे आहेत
.याचे आपणस सतत स्मरण ठेवायचे आहे..काय होतं आपल्या मनात स्वामीं विषयी एक विशिष्ट अशी कल्पना रुपी आकृती तयार आहे..आणि त्यानुसार आपण विचार करतो व मन ही यालाच सत्य मानते…आता आपण म्हणाल की मग आम्ही जी मूर्ती ..फोटो पाहतो ते स्वामीं नाहीत का ? असे नाही ते स्वामीच आहेत.. पण फक्त तसेच स्वामींचे स्वरूप जाणतो..पण स्वामीं हे चरा चरात आहेत..पण आपल्या मनावर आपण आज पर्यंत जे काही संस्कार केले आहेत..करत आहोत त्यामुळे… आपण त्यांना ओळखू शकत नाही…त्यामुळं स्वामीं या ठिकाणी सांगत आहेत..की मी सतत तुझ्या सोबत आहे पण तू कोणतेही तर्क.. वितर्क लावत बसू नकोस..कारण तू त्यातच अडकशील.
अशक्य ही शक्य करतील स्वामीं..हा तर आपल्या सर्वांसाठी स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे..जर हा आशिर्वाद रुपी मंत्र आपल्या अंतर्मनात कोरला गेला तर या सारखा सुवर्ण योग असूच शकत नाही..कारण ही खूपच उच्चतम स्वामीं कृपा असेल कारण कोणत्याही परिस्थिती मध्ये ह्रदयातून एकच हाक येईल…अशक्य ही शक्य करतील स्वामीं त्याच क्षणी आपली इच्छा पूर्ण झालेली असेल.


Share
और पढिये !!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू...

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!! ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ हरिपाठ पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे...

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!! असोनी संसारी जिह्वे वेगु करी । दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ हरिपाठ www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो....संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने...

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!! हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ हरिपाठ पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..! www.chetnakeswar.com स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य...

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरिपाठ ओवी चिंतन मनन स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची...

खरा कर्ता मी आहे का?

श्री स्वामी समर्थ हे मना मला वाटते की..मी करतो म्हणूनच कार्य होत आहे..पण मी नव्हतो तेव्हाही कार्य सुरू होते..मी नसतानाही कार्य सुरूच असणार आहे..मग मी कसा कर्ता.. कर्ता आणि करविता..तू एक स्वामींनाथा..माझ्यातील कर्ता भाव दूर कर..धन्यवाद समर्था..! www.chetnakeswar.com...

आपले विचार इतरांवर लादू नका!

!!श्री स्वामी समर्थ!! हे मना..कोणत्याही व्यक्तींवर.. आपल्या इच्छा..अपेक्षा..विचार लादू नकोस किंवा असेच त्यांनी करावे असा हट्ट धरू नकोस..कारण सर्वांना प्रेरणा देणारे स्वामीं च तर आहेत..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद..! स्वामीं भक्तहो.. वरील ओवीतून स्वामीं काय सुचवत...

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी रोज ११ वेळेस म्हणा

!! श्री स्वामी समर्थ !! स्वामी भक्तहो कोणतीही आर्थिक समस्या नसून आपल्या विचारातील मानसिकता आहे.. आपल्या अंतर्मनातील विचार आहेत.. चला आपले विचार बदल्या.. खालील विचार रोज १ वेळेस किंवा ११ वेळेस म्हणा पहा काय बदल घडतात.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद !! हे मना मला...

प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस.

स्वामी वाणी पुष्प ५९३(पर्व ४ थे भाग ९७) प्रेरणादायी बोल प्रामाणिक कष्ट कर.. कष्टाला लाजू नकोस..अरे विश्वास ठेवा !! प्रामाणिक कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी स्वतः स्वामी असतात.. स्वामींची सम्पूर्ण शक्ती असते..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. स्वामी महाराज आजच्या...

यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५) प्रेरणादायी बोल हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!! www.SwamiVaani.co.in स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच...