स्वर्ग नाम सेवेत आहे

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
हरिपाठ

स्वामी भक्त हो माऊली सांगत आहेत.. हरिपाठ काय आहे वैकुंठ आहे.. पहा आपण म्हणतो कि स्वर्ग सुख हवे आहे.. मग आपण म्हणतो हे केले कि स्वर्ग सुखाची अनुभूती येईल.. पण काही केले तरी आपणस आनंद प्राप्त होत नाही.. सुखाची प्राप्ती होत नाही.. आता स्वर्ग म्हणजे काय.. याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार.. कल्पना वेगळी असणार आहे.. आपण इथे व्यवहारिक भाषेत अर्थ पाहूया.. जिथे कायम आनंद असतो तो क्षण म्हणजे स्वर्ग.. हे स्वर्ग सुख आपणस कधी प्राप्त होईल जेव्हा आपण हरी नाम घेऊ.. म्हणजेच माऊली आपणस नाम सेवा करण्यास सांगत आहेत.. जेव्हा आपण हरिपाठ करू म्हणजेच हरिपाठ चा प्रत्येक शब्द व्यहारात उतरवू तेव्हा आपणस स्वर्ग सुखाची अनुभूती येणार आहे.. त्यासाठी आपणस नाम सेवा करायची आहे.. नाम हे ज्या प्रमाणे आभाळात पाऊस भरला आहे त्या प्रमाणे नामात हरी कृपा आहे.. म्हणून माऊली सांगत आहेत.. नाम घ्या.. कोणतेही नाम घ्या पण .. रोज घ्या.. चला रोज स्वामी नाम घेऊया.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

ईश्वर एकच आहे

एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ
पहा काय बोध होतो…स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा
www.chetnakeswar.com

स्वामी भक्तो… वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण त्यात भेद करतो.. जीव आणि शिव वेगळे आहेत.. आपण इथे थोडा सोपा अर्थ घेऊया.. अरे जो ईश्वर आहे तो एकच आहे.. कुणी त्याला वेगळ्या नावाने ओळखतो.. कुणी शिव म्हणतो.. पण सर्वांमध्ये असणार जो एक चैतन्य आहे.. शिव आहे.. ज्याला आपण आत्मा म्हणतो तो एकच आहे.. पण आपली जी बुद्धी आहे ती यात भेद करते.. अमुक ईश्वर असा आहे.. पण खरंतर आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत.. आपण उगाचच त्यावर चर्चा करतो.. नको त्यात मन अडकवतो.. हरी शिवाय आणखी कुठेही मन अडकवले तर ते कष्ट व्यर्थच जाणार आहेत.. म्हणून हरी नाम घे.. म्हणजेच नाम सेवा कर.. कोणतेही नाम घे.. पहा सत्याची ओळख होईल.. चला स्वामी नाम घेऊया.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

मंथन करा..आपल्यातील विचारांचे

!!श्री स्वामी समर्थ!!
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग !!हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान १ माळ..!

स्वामीं भक्तहो.. माऊली वरील ओवीतून खूप खोल असे मार्गदर्शन आपणस करत आहेत..मंथन करा..आपण अनेक ग्रँथ पुस्तके वाचतो..त्याचे मंथन करा..ते मंथन कुठे करा आपल्या अंतर्मनात करा…आपण म्हणाल मंथन करून काय होईल..पहा..दूध आहे. ते तापवले की साय येते…मंथन झाले..दुधाचे.. दही केले की आंबटपणा येतो..मंथन झाले..दह्याचे.. ताक केले.. लोणी निघते…मंथन झाले..लोणी तापवले…की तूप निघते..दुधाचे तूप होण्याची प्रक्रिया…असेच जेव्हा आपल्या विचारांचे मंथन होईल..कधी जेव्हा आपण वाचन करू..श्रवण करू..तेव्हा..त्यात माऊली सांगत आहेत..हे मंथन करताना नको असणारा भाग सोडून द्या.. त्याचा मूळ गाभा धरा.. त्यावर कार्य करा..जसे दुधात तूप आहे..तसेच आपल्यातच सर्वकाही आहे..बाकी गोष्टीत अडकू नका.. पहा कसे जीवन होते..या सोबत महत्वाचे..नाम घ्या..कोणतंही घ्या..पण सातत्याने घ्या..पहा स्वामींना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!!

सर्वजण हरीचा महिमा वर्णन करतात

!!श्री स्वामी समर्थ!!
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥५॥ हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..रोज किमान रोज १ माळ..,!
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो.. माऊली सांगत आहेत.. चारही वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणे ही सुद्धा हरीचे वर्णन करतात..पहा आपण अनेक ग्रंथ वाचतो…त्याची पारायणे करतो..पण त्यावर विचार करत नाही..आपण फक्त कथा किंवा गोष्टी यातच अडकतो..किंवा त्यावर चर्चा करतो..पण ते ग्रँथ हे आपले गुरू असतात..ते आपल्याशी बोलतात पण आपण त्यावर विचार करत नाही..त्यामुळे ते फक्त वाचन होते..जर आपण यातून सार काढला व त्या नुसार कार्य केले तर.. नक्कीच यशस्वी जीवन होईल..आपण किती वाचतो.. या पेक्षा आपणस काय बोध होतो..हे महत्वाचे… वरील ओवीतून माऊली स्पष्टपणे सांगत आहेत..काहीही जरी आपण वाचले तरी त्यात..हरी चे वर्णन आहे..म्हणजेच नामाची महती आहे..पण आपण नाम सेवा सोडून इतर सेवेत अडकतो..म्हणून माउली पुन्हा सांगत आहेत…नाम घ्या…नाम..कोणतंही घ्या.. फक्त रोज न चुकता घ्या..पहा अनुभूती घेऊन..चला रोज किमान १ माळ स्वामीं नाम घेऊया…धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ
हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू देऊ नकोस… माझे अभ्यासात लक्ष लागू दे.. मी जो काही अभ्यास करेल त्यात माझे लक्षात राहू दे .. रोज काही तरी नवीन शिकण्याची प्रेरणा मला दे.. सर्वांना सुखात.. आनंदात.. ऐश्वर्यात ठेव.. तुझे गोड नाम सदैव मुखात राहू दे .. हे शरीर देवता मला माफ कर आज पर्यंत तुला धन्यवाद दिले नाहीत त्याबद्दल मला माफ कर.. आज पर्यंत जशी मला साथ दिलीस तशीच इथून पुढेही देत रहा हि विनंती.. तुला निरोगी राहण्यासाठी आवश्यक ते भोजन घेण्याची प्रेरणा मला दे.. धन्यवाद समर्था .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय