श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 3

उगाचि भितोसी भय हे पळू दे – आपले मन अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करत असते… उद्या काय होईल… माझे अमुक काम होईल कि नाही… आणि या विचारातुन अनेकदा मनात भीती निर्माण होते… उद्या काय होईल याची… कधी कधी आपणस काही तरी अडचण असते आणि मग आपल्या मनात भीती चे विचार डोकावतात… या मनाला विचारांना आपणस सांगायचे आहे… अरे भिऊ नकोस ब्रम्हांड नायक आपल्या सोबत आहेत!

जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे – अरे मना तुझ्या जवळ अफाट अशी शक्ती आहे… स्वामी नामाची शक्ती… ती शक्ती आहे आहे आपल्या अंतकरणात आहे… आपल्या आतील आवाज अनेकदा आपणस सांगत असतो स्वामी महाराज आहेत भिऊ नकोस.. पण आपले नकरात्मक विचार मध्ये येत असतात… आपणास आंतरिक शक्तीस जागृत करायचे आहे… त्या शक्ती ची अनुभूती घ्यायची आहे.

जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा – या संपूर्ण जीव सृष्टी च्या जन्म व मृत्यूची जी दोरी आहे ती… स्वामी महाराजांच्या हाती आहे… कुणाचा जन्म कधी होईल… शेवटचा श्वास कधी याचे संपूर्ण नियोजन हे स्वामी महाराजांच्या कडे आहे… थोडक्यात झाडाचं पण सुद्धा ज्यांच्या सत्ते ने हालते… अश्या ब्रम्हांड नायकाचे आपणस सेवक आहोत… एकदा का स्वामींच्या हाती आपला हात समर्पित केला कि मग.. प्रत्येक दिवस कसा स्वामीमय बनतो… पण याचा अर्थ असा मुळीच नाही कि आपले दुखत आहे आणि आपण म्हणाल मी काहीच करणार नाही… आपणास डॉक्टर कडे जावे लागेल.. त्याच्या नियमांचे पालन करावेच लागेल.

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा – हे मना तू घाबरू नकोस… तू स्वामीचा बाळ आहेस… जसे आपले आई वडील आपली काळजी घेतात तसेच स्वामी महाराज आपली काळजी घेत असतात… बघा एखादे लहान मुलं.. आपल्या आई च्या किंवा वडिलांच्या खांद्यावर बसते तेवहा त्यास खात्री असते… आपणस आपले वडील पडू देणार नाहीत… त्या मुले त्याच्या मनात कोणतीही भय नसते… ते घाबरत नाही… तशीच दृढ श्रद्धा आणि विश्वास आपणस आपल्यात निर्माण करायचा आहे… आपण स्वामींचे बाळ आहोत हा दृढ विश्वास आपणस आपल्या अंतकरणात निर्माण दृढ करायचा आहे.

 

देवघर कसे असावे

देवघर कसे असावे – खरंतर देवघर कसे असावे.. यावर अनेकांची अनेक मते आहेत… यावर खरंतर प्रत्येकाने चिंतन केले तर प्रत्येक जण स्वतःला प्रामाणिक उत्तर देऊ शकतो कि… देव घर कसे असावे… ज्या ठिकाणी आपले चित्त स्थिर होते.. मन शुद्ध होते…आंतरिक आनंद प्राप्त होईल असे देव घर असावे..आता आपण म्हणाल नक्की देवघर कसे असावे… देव घर हे आपणस आर्थिक दृष्टया जसे परवडेल असे असावे… नक्कीच बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत… त्यातील आपणास आवडणारा… परवडणारा पर्याय आपण निवडावा… देवघरात नेहमी स्वच्छ असे कापडी आसन असावे.. शक्यतो रोज धुतलेले आसन असावे… आता महत्वाचा मुद्दा… देवघरात देव कोणते असावेत.. शास्त्रानुसार पंचायतन असावे… थोडक्यात पाच देव असावेत… जसे गणेश, विष्णू, शंकर, सूर्य, देवी… हि पाच देव असावेत… शंख.. घंटा असावी… आता काय होते… आपण देवघरात देवांची इतकी गर्दी करतो कि काही दिवसानी आपणस देव घर छोटे वाटू लागते… या मागचे मुख्य कारण म्हणजे आपण… कुठे गेलात किंवा कुणी सांगितले कि आणखीन एक देवाची मूर्ती अथवा फोटो घेऊन येतो व आपणस हि कळत नाही आणि मग देव घर लहान पडू लागते… त्या मुळे आज पासून ठरवा कि मी आहे त्याच देवांची व्यस्थित पूजा करेल उगाचच आणखीन देवांच्या मूर्ती अथवा फोटो वाढवत बसणार नाही.. अनेकदा काय होते मूर्ती किंवा फोटो खराब होतात आणि मग काही लोकांच्या सांगण्यावरून त्या मूर्ती अथवा फोटो मंदिरात नेवून ठेवले जातात… आता यावर तुम्ही स्वतः चिंतन मनन करा आणि ठरवा कि हे योग्य आहे कि आयोग्य… नक्की आपण भक्ती करतो कि वेडेपणा… कृपया हि गोष्ट प्रथम बंद करा… आठ दिवस… किंवा महिन्यातून एकदा सर्व देवांना हळद… लिंबू… किंवा दही… किंवा बाजारात अनेक पावडर मिळतात त्याचा वापर करून देवांना स्वच्छ करावे… कारण काय होते वातावरणामुळे किंवा केमिकल युक्त गंधाने मूर्ती खराब होतात त्यामुळे आपण अश्या प्रकारे महिण्यातून एकदा सर्व मूर्ती स्वच्छ करावेत… बघा नक्कीच आपली प्रसन्नता वाढण्यास मदत होईल… आता देवपूजा झाली… रोज देवाला काहीतरी नैवैद्य अर्पण करावा… आपण देवांना अनेक फुले वाहतो… दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य नदीत वा पाण्यात टाकण्याची चुकीची पद्धत आपण करतो… बघा एकीकडे आपण गंगेच्या पाण्याची पूजा करतो आणि दुसरी कडे त्याच गंगा मातेचे पाण्यात घाण टाकतो… अशी कशी आपली श्रद्धा जी आपल्या पर्यावरणाचे नुकसान करत असेल तर… देव कसा प्रसन्न होईल… त्यामुळे आज पासून संकलप करा कि निर्माल्य पाण्यात टाकणार नाही म्हणजे नाहीच.. इथेच आपली निम्मी भगवंताची सेवा रुजू होते व ईश्वर सुद्धा खुश होऊन आशीर्वादच देतो… केवळ देवाला स्नान घातले कि देव पूजा संपते का नाही तर ईश्वराच्या जवळ जाण्याचा सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण रुपी भक्ती… पूजा झाली कि रोज किमान ५ मिनिटे कोणत्याही देवाचे नामस्मरण करा … जप करा… बघा आपणस… आपल्या स्वतः मध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसेल… आज आपण इथेच थांबू… पुढील भागात यावर अजून चिंतन मनन करूया… चला तर मग राम कृष्ण हरी.. आपणास माहिती आवडल्यास नककीच आपले चॅनेल subscribe करा इतरांनाही सांगा… धन्यवाद

लक्ष्मी पूजन – प्रार्थना

चला आपण सर्वानी लक्ष्मी पूजनाची तयारी केली असेलच… आपण आज पर्यंत अनेकदा लक्ष्मीपूजन केली असतील… हा उत्सवच आहे मुळात प्रकाशाचा… आपण सर्व जण पूजा करतो… आज आपण लक्ष्मी ची प्रार्थना करणार आहोत… आपणा सर्वाना विनंती आहे आपण घरच्यांनी सर्वानी एकत्र मिळून हि प्रार्थना करावी… हि मराठीत प्रार्थना आहे…नक्कीच प्रार्थना आपल्या मनात भक्ती भाव निर्माण करेल… अशी आशा आहे… नक्कीच आपणही लाभ घ्या… इतरांना हि share करा व आपले चॅनेल subscribe करा…
चला तर मग लक्ष्मी मातेला प्रार्थना करूया – सर्वांनी डोळे झाकावेत.

हे लक्ष्मीमाते आमच्या कडून प्रार्थना करवून घे… लक्ष्मी पूजनाचा दिवस म्हणजे… अमावस्येचा दिवस… आज पर्यंत आम्ही अमावस्या म्हंटल कि आज पर्यंतच्या चुकीच्या मनावरील विचारांमुळे हे अमावस्या तिथी तुझ्याकडे निषिद्ध दिवस म्हणून पहिले… आणि आज तुझ्या तिथीला म्हणजे आम्ही लक्ष्मीचे पूजन करत आहोत… खरतंर आज पर्यन्त आम्ही विसरलो होतो कि अमावास्या म्हणजे अंधार पण जो प्रकाशाकडे घेऊन जातो कारणआमच्या जीवनात प्रकाशाला महत्व तूच तर आणलेस… आज मला कळाले आहे कि अमावस्या तिथी म्हणजे प्रकाशाकडे नेणारी तिथी… म्हणजेच शुभ तिथी… आजपर्यंत माझ्या चुकीच्या विचारांतून जी चुकी झाली त्या बद्दल मला माफ करावे हीच तुला प्रार्थना… हे लक्ष्मी माते तुझे प्रथम स्वरूप म्हणजे सरस्वती… आज पर्यंत तू मला जी काही बुद्धी दिलीस त्या बद्दल सरस्वती माते धन्यवाद…हे लक्ष्मी माते मला माफ कर आज पर्यंत मी तुझे आभार मानले नाही त्या बद्दल मला माफ कर.. आज पर्यंत तुझी नक्कीच योग्य प्रमाणात मला प्राप्ती झाली आहे…पण त्या बद्दल मी तुला कधीच धन्यवाद दिले नाहीत त्या बद्दल मला माफ कर… नक्कीच आज पर्यंत तू मला माझ्या कुटुंबाला उपाशी ठेवले नाही.. त्या बद्दल नक्कीच खूप खूप धन्यवाद… ज्या ज्या चांगल्या मार्गाद्वारे मला तुझी प्राप्ती झाली आहे होईल … त्या सर्व गोष्टींना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद…तुझ्या प्राप्ती मध्ये… घरातील सर्वमंडळी… मित्र.. परिवार.. कळत.. ना कळत समाविष्ट असणाऱ्या सर्व व्यक्तींचे आम्ही आभार मानतो… लक्ष्मी माते… हीच प्रार्थना आहे कि … प्रत्येकाच्या जीवनात योग्य प्रमाणात तुझा निवास असावा… आणि या लक्ष्मीचा वापर आरोग्यावर करायची वेळ न येता लोकांना मदत करण्यासाठी व्हावा… लक्ष्मी माते.. आजपर्यंत जी कृपा केलीस अशीच कृपा कायम असावी… तसेच आमचे प्रत्येक कर्म हे तुझा मान वाढवणारे घडो… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद… कोटी कोट धन्यवाद… ज्या गुरुंमुळे हि प्रार्थना मंडळी गेली त्याच्या चरणी वंदन

 

साडेसाती म्हणजे – आपला उत्कर्ष

लेखाचे शीर्षक वाचून आपण म्हणाल हे काय सांगता… आज पर्यंत आम्ही साडेसाती म्हंटले कि आम्ही फारच घाबरतो… कुणाला विचारले कि तुम्हाला साडेसाती सुरु आहे का ? आणि जर खरंच त्या व्यक्तीला साडेसाती सुरु असेल तर तो… त्याला त्रास असो वा नसो तो म्हणतो हो ना खूपच त्रास आहे… साडेसाती सुरु आहे… त्याला जर विचारले साडेसाती म्हणजे काय तर तो सांगू शकत नाही.. खरंच साडेसाती म्हणजे काय ? खरंच  साडेसाती म्हणजे अडचण कि आपला परिपूर्ण उत्कर्ष ? आज आपण यावर थोडीशी माहिती घेऊ या… शनी देव हे प्रत्येक राशीतून गोचर भ्रमण करत असतात हा कालावधी अडीच वर्षाचा असतो … म्हणजेच जेव्हा तो आपल्या राशीच्या आधीच्या राशीला येतो तेव्हा आपणस साडेसाती सुरु होते… म्हणजेच आपल्या राशीच्या आधीची रास अडीच वर्ष + आपली रास अडीच वर्ष + आपल्या राशी नंतर ची रास अडीच वर्ष अश्या सर्वांची बेरीज म्हणजे साडेसाती… आता आपणस साडेसाती म्हणजे काय हे समजले असावे.. आता आपणस एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनिदेव हे न्याय प्रिय देव आहेत.. आपण म्हणाल शनीदेव  न्याय प्रिय आहेत… यावर जेव्हा आपण चिंतन मनन करू तेव्हा आपणस अनेक गोष्टींची उत्तरे प्राप्त होतील..आणि नक्की साडेसाती म्हणजे काय हे आपणस समजेल… आपण जे ही  काही काम करता ते प्रामाणिक पणे करत असाल… ते काम  करत असताना कुणाचेही नुकसान आपण करत नाही… मग आपणस किती वाईट वेळ असो.. आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करावे हि शनि देवांची अपेक्षा असते…आपण जर आपले कर्म करत असताना जर चुकीच्या मार्गाचा अवलंब करत असाल तर नक्कीच आपणास आपल्या कर्माचे फळ मिळते… मग तो कालावधी साडेसाती असतो असे म्हणण्यास हरकत नाही… जर आपण आपले कर्म प्रामाणिक पणे करत असाल तर नक्कीच आपणस साडेसाती ची तीव्रता जाणवणारा नाही… आता आपणस कळले असावे न्याय प्रिय शनिदेव आहेत… न्याय प्रिय म्हणजे फक्त चांगले वागणेच न्याय प्रिय आहे का ? खरंतर ज्यांना साडेसाती आहे त्याच्या जीवनाच्या परिवर्तन चा हा काळ असतो… मग हे परिवर्तन चांगले असू शकते वा वाईट असू शकते… चांगले किंवा वाईट हे सर्व आपल्या वर अवलंबुन असते.. आपण आपल्या मनाला सांगितले कि आता माझ्या राशीला साडेसाती सुरु आहे… त्यामुळे मला खूप त्रास होत आहे… हि साडेसात वर्ष कशी जाणार माहित नाही… त्या वेळेस शनिदेवाच्या न्याय प्रिय स्वभावानुसार ते म्हणतात तुझी इच्छा पूर्ण होवो… म्हणजेच आपले नकारात्मक मन शनिदेवांची उपासना करण्यापेक्षा त्यांचा उपहास करते..आता तुम्हीच विचार करा.. जर तुमची कुणी टीका केली तर ती तुम्ही सहन करू शकता का ?नाही ना? मग या ठिकाणी आपण न्याय प्रिय  शनी देवांना नाव ठेवतो.. आपले मन पण तेच खरे मानते…  आणि एक म्हण आपणस माहीत असेलच  ती म्हणजे… वैरी न चिंती ते मन चिंती ” या म्हणी प्रमाणे आपणस फळ प्राप्त होतात आणि मग आपण आणखीन नकारात्मक बनून… साडेसाती… साडेसाती… करत त्यात पूर्णपणे फसून जातो…आणि मग सर्व रस्ते आपणस बंद दिसतात आणि खूपच त्रास होतो.. मग आपण म्हणाला काय केले तर खरंच  आम्हाला साडेसाती जाणवणार नाही … आमची प्रगती होईल… खरंतर… साडेसाती म्हणजे आपल्या जीवनाच्या यशाचा राजमार्ग आहे… कोणत्या आईला वा बापाला  वाटते का आपले बाळ मागे राहावे नाही ना… तसेच शनिदेवांना का वाटेल माझी भक्ती करणारे माझे भक्त अधोगतीस जावेत.. नाही ना.. तर मग आजपासून आपणस आपले विचारात  परिवर्तन करायचे आहे.. आपल्या मनाला सांगा हि जी काही  साडेसाती आली आहे ती मला सांगत आहे आता तुझा उत्कर्ष चा काळ सुरु झाला आहे… आजपर्यंत नक्कीच मी माझे कर्म करताना अनेक चुका केल्या असतील… त्या चुका पुन्हा करू नकोस असे शनी महाराज सांगत आहेत…जसे घर बांधताना आधी पाया मजबूत असावा लागतो नाही तर इमारत कोसळू शकते … तसेच हि साडेसाती मला सांगत आहे… बाळा तुझा पाया मजबूत कर म्हणजेच आधी तुझे मन जे आहे ते मजबूत बनव… मन हे तुझ्या जीवनाचा पाया आहे… तो मजबूत झाला कि… मग साडेसाती म्हणजे हि जी काही साडेसात वर्ष आहेत हि.. तुझे जीवन बदलून टाकण्यासाठी आली आहेत… प्रत्येक कर्म हे प्रामाणिकपणे कर … सुरवातीला तुला खूप त्रास होणार आहे कारण… हे काम शाब्दिक नाही तर कार्मिक आहे… प्रत्येक अडचणीला सामोरे जाताना श्री शनिदेवांना धन्यवाद द्या… पहा नक्कीच आपणस आपल्या

जीवनात चमत्कार पाहण्यास मिळतील.. मग कितीही  त्रास होऊ द्या तुमचे अंतर्मनातून एकच नाद येईल तो म्हणजे… धन्यवाद शनिदेव … कोटी कोटी धन्यवाद .

चला आपण सर्व मिळून शनी देवांना प्रार्थना करूया – हे शनिदेव मला माफ करा आजपर्यंत मला असे वाटायचे कि… साडेसाती म्हणजे शनिदेवांची वक्र दुष्टी.. पण मला आज समजले आहे कि साडेसाती म्हणजे माझ्या प्रगती साठी ईश्वराने मला दिलेली एक साद… एक कालावधी ..शनी देव आपल्या मुळेच तर मी जागृत झालो आहे… माझ्याकडून आपणस अपेक्षित असणारी कर्म करवून घ्या… हि साडेसात वर्ष माझे जीवन बदलून टाकणारी ठरावीत… आणि माझे मन सदैव सकरात्मक प्रतिसाद देऊ दे… धन्यवाद शनिदेव आपण मला हि समज  दिलीत त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद ! हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! श्री शनी महाराज कि जय !!

साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग

शीर्षक पढ़कर आप बोलेंगे ये क्या बात कर रहे है… आज तक साढ़ेसाती यह शब्द सुनकर ही हमें डर लगता है और आप बोल रहे है… साढ़ेसाती यानी – हमारे उन्नति का राजमार्ग…अगर हमने किसी को पूछा की आपको साढ़ेसाती शुरू है क्या ? अगर वो आदमी तकलीफ में हो तो उसे साढ़ेसाती हो या ना हो… उसे मालुम हो या ना हो वो कहता है…हाँ मुझे बहोत तकलीफ है… साढ़ेसाती है… या कहेगा साढ़ेसाती है ऐसा लग रहा है… अगर आप उसे पूछेंगे की साढ़ेसाती का मतलब क्या ? तो बहोत से लोग इसका अर्थ नहीं बता सकते… सचमे साढ़ेसाती यानी क्या ? सचमें  साढ़ेसाती यानी समस्या है या हमारा परिपूर्ण विकास  का राजमार्ग है… इसके ऊपर आज हम थोड़ा चिंतन करेंगे…श्री शनि देव हर एक राशि से गोचर भ्रमण ( परिक्रमा ) करते है… यह समय ढाई साल का होता है… यानी जब वो हमारी राशि को आता है उससे पहले वो हमारी राशि के पहले  की राशि में  ढाई साल.. हमारी राशि में ढाई साल और हमारी आगे वाली राशि में ढाई साल ये सभी को जोड़ेगे तो यह कालावधि आता है उसे साढ़ेसाती कहाँ  जाता है… अब आपको साढ़ेसाती यानी क्या समझ में आया होगा…अब आपको एक बात बतानी है… श्री शनिदेव न्याय प्रिय ईश्वर  है..आप कहेंगे श्री शनि देव न्याय प्रिय है यानी क्या ? अब हम इसके ऊपर चिंतन मनन करते है… इससे हमें अनेक सवालों के जवाब प्राप्त होने वाले है… और हमें भी समझ में आएगा की साढ़ेसाती यानी क्या? हम जो भी कुछ काम कर रहे है वो अगर हम प्रामाणिकता से कर रहे है… वो काम करते वक्त हम किसी का भी नुकसान नहीं कर रहे है… फिर कितना भी बुरा समय हो… हम अपना कर्म प्रामणिकता से ईमानदारी से करे यह अपेक्षा श्री शनि देव की होती है… अगर हम कर्म करते वक्त अगर गलत रास्ते का इस्तेमाल करेंगे तो उसका फल हमें निश्चित प्राप्त होता ही है… फिर उस समय को साढ़ेसाती का समय भी हम मान सकते है… अगर हम हमारा कर्म ईमानदारी से नहीं करेंगे तो हमें साढ़ेसाती की तीव्रता का एहसास होने ही वाला है… अब आपको समझ में आया होगा की श्री शनिदेव न्याय प्रिय है… न्याय प्रिय यानी सिर्फ अच्छा  बर्ताव करना ही है क्या  ? सचमें जिनके जीवन में साढ़ेसाती आती है वह समय उनके लिए परिवर्तन का समय होता है.. फिर ये परिवर्तन अच्छा भी हो सकता है या बुरा भी हो सकता है… अच्छा  या बुरा यह सब हम पर निर्भर करता है… हमनें अपने मन को बताया की अब साढ़ेसाती का समय शुरू है… मेरी राशि को साढ़ेसाती है… इस वजह से मुझे बहोत तकलीफ हो रही है… ये साढ़ेसात साल कैसे जाएंगे पता नहीं… उसी वक्त न्याय प्रिय श्री शनिदेव बोलते तथास्तु…तुम्हारी इच्छा पूर्ण हो… यानी हमारा नकारात्मक मन श्री शनिदेव की उपासना करना छोड़कर उन्हें ही के ऊपर टीका करता है… अब आप ही सोचो अगर आपको कोई बुरा कहे तो आपको अच्छा  लगेगा क्या ? नहीं ना ? फिर इस जगह हम न्याय प्रिय श्री शनिदेव के ऊपर ही टीका करते है… हमारा मन भी इसको सच मान लेता है… और आपको एक कहावत तो मालूम ही होंगी ..” शत्रु भी जो हमारे बारे में सोच नहीं सकता वह हमारा मन सोचता है” यानी इस कहावत के अनुसार हमें फल प्राप्त होता है… और हम नकारात्मक बन जाते है… और हमारा मन जाप करता है… साढ़ेसाती … साढ़ेसाती और इसी में फस जाता है.. और हमको सभी रास्ते बंद दिखने लगते है…और हमें बहोत ही तकलीफ होती है… फिर आपके मन में सवाल आ रहा होगा की क्या करे जिससे हमें साढ़ेसाती की तकलीफ न हो… हमारी प्रगति हो… सचमें साढ़ेसाती यानी हमारे यश का राजमार्ग है… किसी भी माँ- बाप को लगता है क्या की हमारा बालक पीछे रहे… वो गलत रास्ते  पर जाए…?  नहीं ना….  ? उसी तरह श्री शनिदेव को कैसे लग सकता है की मेरे भक्त पीछे रह जाए… नहीं ना …तो आज से.. इसी क्षण  से हमें अपने विचारों  में परिवर्तन करना है… उसे नकारात्मक नहीं सकारात्मक बनाना  है… अपने मन को बतावो…यह जो साढ़ेसाती आयी है ना… अब मेरे समृद्धि का समय शुरू होने वाला है.. शुरू हो रहा है… शुरू हो गया है… आज तक कर्म करते वक्त अनेक गलती या की है… वो गलतीया फिर से मत करो यह श्री शनिदेव हमें बता रहे है… जिस तरह घर बनाने से पहले नींव का मजबूत होना जरूरी है  नहीं तो वो इमारत गिर सकती है… उसी तरह साढ़ेसाती मुझे बता रही है… बेटा तुम्हारी नींव  मजबूत करो यानी पहले तुम्हारे मन को मजबूत बनावो…मन यह तुम्हारी जीवन की नींव है… अगर वो मजबूत हो गया तो… फिर साढ़ेसाती यानी जो भी साढ़ेसात साल है.. वो मेरे जीवन को बदलने के लिए  आये है… हर एक कर्म प्रमाणिकता से करो… शुरू शुरू में बहोत तकलीफ होंगी…क्यूंकि यह काम शाब्दिक नहीं है तो कार्मिक है… हर एक समस्या का सामना करते वक्त उस समस्या को धन्यवाद दो…श्री शनि महाराज को धन्यवाद दो… देखो हमारी जिंदगी बदल जायेगी…जीवन में चमत्कार दिखने लगेंगे…फिर कितनी बह तकलीफ हो… हमारे अंतर्मन से एक ही पुकार हमें सुनाई देंगी… धन्यवाद साढ़ेसाती… धन्यवाद श्री शनिदेव…हमारे जीवन में आने के लिए धन्यवाद !

चलो हम श्री शनि देव से प्रार्थन करते है… है श्री शनिदेव मुझे माफ़ करो… आज तक मुझे लगता था की… साढ़ेसाती यानी…श्री शनिदेव की वक्रदृष्टि ( अवकृपा )… लेकिन मुझे आज समझ में आया… साढ़ेसाती यानी ईश्वर ने मेरी प्रगति के लिए बनाया हुवा एक रास्ता है… एक पुकार है.. एक समय है… श्री शनिदेव आपकी वजह से ही तो में जागृत हुवा हु… मुझसे आपको अपेक्षित कर्म करके लो.. यह साढ़ेसात साल मेरा जीवन बदलने वाले बन जाए… और मेरा मन हमेशा सकारात्मक प्रतिसाद दे… धन्यवाद शनिदेव…मुझसे यह प्रार्थना करवा लेने के लिए धन्यवाद…यह प्रार्थना करवा लेने के लिए धन्यवाद