- आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये…खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का… असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे स्वामींचे सेवेकरी आहेत ज्यांनी आज पर्यंत अखंड निस्वार्थ सेवा केली आहे..आपणस स्वामीं वाणी ही वेबसाईट तसेच अँप देखील माहीत असेल..या वर आपण स्वामीं वाणी ऐकली असेल..वाचली असेल..पण ही लिहिली कुणी..ही प्रसिद्ध कोण करत आहे..हे आज पर्यंत काही मोजक्याच लोकांना माहीत आहे..आपण म्हणाल की मग यात काय झाले ? एक स्वामी वाणी प्रसिद्ध झाली की ती लाखो लोक ती वाचत होते..श्रवण करत होते..वेबसाईट Views सुध्दा लाखो.. जर याचा हिशोब केला तर या माध्यमातून ते वार्षिक लाखो रुपये कमवू शकत होते पण..स्वतःला शब्द दिला होता स्वामीं सेवेचे बाजारी करण करणार नाही..अशी ही निस्वार्थ सेवा अखंडपणे ३.५ वर्ष सुरु होती..साधारण ३०९ भागांची स्वामीं वाणी वेबसाईटवर उपल्बध होती..पण अचानक काही गोष्टी झाल्या..कुठंतरी वाटले की स्वामीं लिलामधून काही जण चुकीचा अर्थ लावत आहेत.. मग विचार आला..आपले काम स्वामी सेवा करणे आहे..आपले मत इतरांवर लादणे नाही..क्षणाचाही विचार न करता त्यांनी सर्व स्वामीं वाणी संग्रह अर्चिव केला..विचार निस्वार्थ होता..अनेकांनी उत्पन्न कमावले.. पण ते स्वामी विचारांचा प्रचार करत होते म्हणून आणि चांगलं कार्य कार्य करत होते म्हणून त्यानां सुद्धा परवानगी दिली.. उत्पन्न महत्वाचे नाही तर स्वामी विचार महत्वाचे आहे हा मुद्दा महत्वाचा..
- या जागी माझ्यासारखी व्यक्ती नक्कीच नाही म्हणाली असती अथवा मला काहीं मोबदला दे म्हणाली असते पण यांनी असे काहीच केले नाही..
- मग विचार केला चिंतन मनन केले की स्वामीं सेवा तर थांबली नाही पाहिजे..मग स्वामीं वाणी चे नवीन पर्व सुरु झाले..दैनंदिन जीवनातील स्वामीं वाणी..म्हणजे आपणस अनेक प्रश्न असतात..त्यावर उत्तर मिळत नाही..अश्या प्रश्नांवर चिंतन मनन करून उत्तर मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे..ही सेवा सुद्धा निस्वार्थ सुरू आहे.. कदाचित आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल..ही व्यक्ती गर्भ श्रीमंत असेल..हिला पैशाचे महत्त्व समजलं नसेल.. वेडी व्यक्ती..असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतील..अनेकांना जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांनी मला असेच उत्तर दिले..पण खरंतर ती व्यक्ती देखील सर्व सामान्यच आहे…प्रापंचिक आहे..तरुण आहे..कुटुंब चालवण्यासाठी १८-१८ तास काम करते..पण निस्वार्थ स्वामीं सेवेचा विडा उचलला आहे असे म्हणावे लागेल..आपण म्हणाल काय फायदा..अहो स्वामीं चा नियम आहे ते कुणाचेच काही ठेवत नाहीत..वेळ आली की व्याजासह परत..एक दिवस अचानक त्यांचे भयानक डोके दुखू लागले..डॉक्टर कडे गेले तर BP २८० झाला होता..ब्रेन स्ट्रोक चा अटॅक होता..प्यारलेसिस पासून ते जिवंत राहणे अशक्य होते.. परंतु दररोजची ध्यानधारणा आणि सर्वांच्या अप्रत्यक्ष आशीर्वाद ह्या मुळे तर काय.. डॉक्टर आश्चर्य चकित होऊन बोलले की, ‘तुम्ही अजून बोलत आहात यावर विश्वास बसत नाही..’ त्यांना ICU मध्ये ऍडमिट केले… परिस्थिती क्रिटिकल होती.. या परिस्थितीत सुद्धा या व्यक्तीने गुरूवार ची स्वामीं वाणी प्रसिद्ध केली.. त्यांना ऑडिओ करता आला नाही..त्याबद्दल त्यांनी स्वामीं भक्तांची माफी मागितली व कारण सांगितले..
- *अहो ज्या माणसाचे नाव माहीत नाही..चेहरा माहीत नाही.* अश्या स्वामीं सेवेकरी बरा व्हावा यासाठी.. फेसबुक, इन्स्टाग्रामवर, व्हाट्सएपच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक प्रार्थना केल्या..यात नाही म्हंटल तरी हजारो लोकांच्या सकारात्मक प्रार्थना काम करत होत्या..आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थना आणी डॉक्टरांचे प्रयत्न यातून मृत्यू वर मात केली..डॉक्टरांचे प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रार्थनेचे बळ.. 72 तासाच्या आत डॉक्टरांनी सांगितले आता आपणस धोका नाही..आणि 7-8 दिवसांतच त्याना discharge मिळाला..ते सुख रूप घरी आले..अजूनही डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे.. पण धोक्याच्या बाहेर हेत..
- हे सर्व काय होते तर निस्वार्थ स्वामीं सेवेचे फळ…एखादी व्यक्ती मृत्यु च्या दारात असून सुद्धा निस्वार्थ सेवा सुरू ठेवते मग त्याचे फल या पेक्षा मोठे ते काय असणार.. असो..यातून आपणस काय बोध मिळतो..आपले प्रत्येक कर्म निस्वार्थ भावनेने करा..मग ती स्वामीं सेवा असो वा..आपण करत असणारी नोकरी.. धंदा असो तो जेव्हा आपण एक स्वामीं सेवा म्हणून करू तेव्हा नक्कीच स्वामीं महाराज आपणस भरभरून देतात..दुसरे आपले थोडे फार दुखत असेल तर दुर्लक्ष करू नका तात्काळ डॉक्टर कडे जा ..त्यांचा सल्ला घ्या.. मनाने किंवा इतरांचे ऐकून उपचार करू नका..शरीराची काळजी घ्या कारण हेच जेव्हा आपण याची काळजी घेऊ तेव्हा ते देखील आपली काळजी घेणार आहे..निस्वार्थ स्वामीं सेवा करा..मेवा नक्कीच मिळेल..या सर्व अनुभवात आज त्या निस्वार्थ सेवेकरी चे नाव सांगणे अपरिहार्य आहे पण त्यांनी स्वामीं सेवेकरी हीच ओळख कायम असावी ही इच्छा व्यक्त केली….!
नक्कीच अशीच प्रेरणात्मक सेवा तुमच्या द्वारे व्हावी हीच समर्थ चरणी प्रार्थना..धन्यवाद स्वामीं
,”काही जण असेही बोलतील की,स्वामींचीच कृपा होती तर मग डॉक्टर कडे कशाला गेला? आशा लोकांना सांगावेसे वाटते की, डॉक्टरांना सुद्धा देवानेच बनवले आहे.. आणि क्वांटम फिसिक्स च्या नियमांने सर्व लोकांच्या सकारात्मक प्रार्थना- तरंगाचा प्रभाव उपचारात सहकार्य करत असतो.. म्हणून दवा आणि दुवा ह्याचे महत्व आहे..😊”
श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे
श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया…विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले पाहिजे.. म्हणजेच कायम आपण नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे… म्हणजेच बाप्पा आपणस प्रेरणा देत आहे आहेत कि ज्ञान प्राप्त कर… सुपासारखे कान आपणस प्रेरणा देतात कि ज्या प्रमाणे सुपाने आपण धान्य साफ करतो त्याच प्रमाणे आपणस बाप्पा सांगत आहेत कि तू अश्याच गोष्टी श्रवण कर जेणेकरून तुझे कल्याण होईल.. अश्याच गोष्टींचे श्रवण कर ज्यात सर्वांचे कल्याण भाव असतील.. ज्या श्रवण केले कि आपली चेतनेची पातळी उंचावेल असेच श्रवण करण्यास बाप्पा आपणस सांगत आहेत… एकदंत म्हणजेच भगवंतास आपण एकदंत म्हणतो यातून बाप्पा आपणस सांगत आहेत कि तुझ्या जवळ काय नाही या पेक्षा तुझ्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी असावे.. पण आपण नेमके उलटे करतो माझ्याकडे काय नाही यावर आपण रडत बसतो बाप्पा सांगतात तुझ्याकडे जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर कर कारण तुला मी जे दिले आहे ते भरपूर आहे त्याचा वापर कर हि प्रेरणा आपणस बाप्पा च्या एकदंत पासून मिळते…बाप्पा चे उदर आपणस प्रेरणा देते कि इतरांच्या चुका आपण कोणत्याही कायम माफ कराव्यात.. कारण आपण इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा त्यांच्यातील गुण घ्यावेत व चुका माफ कराव्यात… मोदक बाप्पा ला आवडतात यावरून बाप्पा आपणस सांगत आहेत कि ज्या प्रमाणे मोद म्हणजे आनंद, गोडवा जिव्हाळा हा मोदकात असतो त्या प्रमाणे आपण हि नेहमी आनंदी असावे आपले वर्तन सर्वांशी स्नेहपूर्ण असावे हा बोध आपणस बाप्पा देत आहेत..बाप्पा च्या हातातील परशु आपणस प्रेरणा देतो कि कोणतंही संकट आले तरी भिऊ नका तर त्याला समर्थपणे त्याचा सामना करा कारण संकट काळी आपणस विचाररूपी परशु वापरण्याचा बोध बाप्पा आपणस देत आहेत.. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे… आपणस बोध देतो कि आपण सदैव आपल्या कार्यसाठी तयार असायला हवे.. म्हणजेच चांगल्या कार्याचे वाहक बनण्याचा बोध इथे आपणस प्राप्त होतो.. थोडक्यात बाप्पा ची मूर्ती आपणस आपल्या विकासासाठी प्रेरणा देत आहे… चला तर मग बाप्पा ची सेवा करत करत बाप्पा ना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करूया
राखी पौर्णिमा
राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते का हे सर्व..नक्कीच तो मुक्त होईल का जर त्याच्या पोटी जन्म घेणारे भाऊ बहीण माझ्या संपत्ती साठी भांडत आहेत.. खरंच यासाठीच मी कष्ट केले का ? कुठेतरी माझे संस्कार कमी पडले का? अरे बाळांनो भांडू नका रे..माझ्यासाठी तुम्ही दोघेही समानच आहात.. चूक कुणाची हे माझ्यासाठी महत्वाचे नाही…कारण मी तुम्हाला सांभाळताना दुजाभाव केला नाही..पण माझ्या संपत्ती साठी तुम्ही भांडता..थोडीशी जरी तुम्हाला माझा आदर असेल..मला मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर कृपा करून भांडू नका रे..मी तरच मुक्त होईल जर तुम्ही न भांडता राहिलात..नाही ना रे बाळांनो भांडणार..हीच मला श्रद्धांजली असेल..चला या राखी पौर्णिमेस आपले नाते दृढ करूया…!
आपण स्व आदर करतो का
आपण स्वतः ला काय समजतो – खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो पर्यंत आपणस इतरांकडून आदराची अपेक्षा करण्याचा काहीच अधिकार नाही.. मी जसा आहे तसा मी माझ्या स्वतःचा स्वीकार करतो का ? अनेकदा आपण स्वतःच आपल्या स्वतःचा स्वीकार करत नाही.. आपण स्वतःला आरश्यात पहा.. किती सुंदर असा देह भगवंताने आपणस दिला आहे.. अनेक जण म्हणतात कि मी दिसायला सुंदर नाही वा माझे शरीर असेच आहे.. खरंतर भगवंतांना आपणस इतके सुंदर असे शरीर दिले आहे त्याचा आपणच आदर करत नाही.. आपणस जे शरीर मिळाले आहे त्या बद्दल भगवंताला धन्यवाद व जे शरीर मिळाले आहे त्याची योग्य ती काळजी आपण घेणे आवश्यक आहे.. पहा भगवंताने आपणस निरोगी शरीर दिले आहे म्हणजेच आपण किती भाग्यवान आहोंत.. हा आता त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे.. हे झाले आपल्या शरीरा बाबत..आता एखाद्याला शुगर चा त्रास अचानक सुरु होतो.. असा काही त्रास झाला कि इतरांचे ऐकून वा आपल्या मनातील चुकीच्या समजुति मुळे आपण आपल्या स्वतःला दोष देतो वा आपल्या नशिबाला दोष देतो.. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही.. अहो खरंतर आपणस शुगर चा त्रास झाला म्हणजेच आपण किती गोड आहात.. अश्यावेळी शुगर शुगर करत न बसता आपण योग्य उपचार घेऊन शुगर कंट्रोल करू शकता या कडे लक्ष द्या… म्हणजेच कोणत्याही कारणास्तव स्वतःचा आदर करणे बंद करू नका.. कारण स्वतःचा आदर हा आत्मविश्वासाचा प्रथम पायाआहे.. चला तर सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःचा आदर करूया .. धन्यवाद !!
नृसिंह जयंती – नृसिंह जन्म कथा
आज नृसिंह जयंती निमित्त चला आपण नृसिंह जन्म कथा पाहूया
हिरण्यकश्यपू राजा ह्यांनी भगवंताची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले होते व असा वर मागितला कि मला कोणत्याही माणसाकडून वा प्राण्याकडून मृत्य येऊ नये, दिवसा किंवा रात्री मृत्य येऊ नये , घरात नाही किंवा बाहेर सुद्धा मृत्यू येऊ नये , असा वर त्याने प्राप्त करून घेतला. हा वर प्राप्त झाल्यामुळे तो स्वतःला अजरामर समजू लागला त्याला वाटू लागले कि मीच देव आहे मीच सर्व शक्तिमान आहे हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता मुलगा नेहमी नामस्मरणात तल्लीन असत. हे पाहून हिरण्यकश्यपू राजा ला फार राग येई त्याने आपल्या मुलाला खूप समजून सांगितले कि तू माझा जप कर मीच देव आहे. पण प्रल्हाद मात्र भगवान विष्णूच्या नाम सेवेत तल्लीन असे हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ला फार चीड येऊ लागली आणि त्याने त्याला समजून सांगण्यासाठी त्याला शिक्षा केली पण तरी देखील प्रल्हाद विष्णूची नाम रुपी सेवा करणे सोडत नाही .मग मात्र हिरण्यकश्यपू चा राग वाढला आणि त्याने शिपायांना प्रल्हादाला डोंगरावरून खाली ढकलून देण्यास सांगितले तरी देखील प्रल्हादाला काहीच इजा पोहचली नाही हे पाहून हिरण्यकश्यपूला खूपच राग आला आणि त्याने शिपायांना उकळत्या तेलात टाकण्याची आज्ञा दिली शिपायांनी प्रल्हादाला तेलात टाकले तर शिपायांना भाजले पण प्रल्हादाला काहीच झाले नाही. उलट प्रल्हाद नाम रुपी सेवेत तल्लीन होता .हे सर्व पाहून हिरण्यकश्यपू ने प्रल्हादला विचारला कि कुठे आहे तुझा ” नारायण नारायण ” दाखव मला कुठे आहे .तुझा भगवान विष्णू बोलव त्याला तेव्हा प्रल्हाद म्हणाला माझा देव सर्वत्र आहे. तुम्ही जिथे पाहाल तिथे माझा देव आहे .आपण फक्त हाक मारा मग रागाच्या भरात हिरण्यकश्यपूने विचारले कि या खांबात तुझा देव आहे का ? तेव्हा प्रल्हाद म्हणाला हो या खांबात माझा देव आहे. तेव्हा हिरण्यकश्यपू ने रागाच्या भरात लाकडी खांबाला लाथ मारली तेव्हा त्या खांबातून भगवान विष्णूंचा नृसिंह रूपात खांबातून बाहेर आले. नृसिंह रूप पाहून हिरण्यकश्यपू खूप घाबरला .भगवान विष्णूं नृसिंह यांनी हिरण्यकश्यपू ला मांडीवर घेतले व दाराच्या उंबऱ्यावर बसले ती वेळ होती सायंकाळची म्हणजे दिवस हि नव्हता रात्र हि नव्हती उंबरा म्हणजे घर हि नाही व घराच्या बाहेर हि नाही न कोणते शस्त्र न काही अस्त्र भगवान नृसिंह यांनी घराच्या उंबऱ्यावर नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून मुक्त केल अश्या प्रकारे भगवान विष्णूचा नृसिंह अवतार झाला सर्वांनी एक घोषात ” नारायण नारायण ” ओम नमो भगवते वासुदेवाय ” नामाचा जय घोष केला
बोध – नृसिंह अवतार हा आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा अवतार आहे. खरे तर हा अवतार म्हणजे आपणस आपला बोध करण्यास प्रेरणा देणार अवतार .चला आपण यावर चिंतन मनंन करूया, हिरण्यकश्यपू राजा होता .तो देखील देवाची सेवा करत होता व त्याने सेवा करून वर प्राप्त केला कि मला कधीच मरण येऊ नये खरे तर इथे आपणस आपल्यातील हिरण्यकश्यपू शोधायचा आहे कारण अनेकदा आपणस देखील विस्मरण होते कि आपण या पृथ्वी वर पाहुणे आहोत आपण अशा अविर्भावात जगतो कि मी अमर आहे. आजच्या लीलेतून आपणस बोध घ्यायचा आहे , कि मी देखील पाहुणा आहे .जे काही आयुष्य मला प्राप्त झाले आहे त्याचा मी सदुपयोग करेल जेणेकरून माझ्यातील हिरण्यकश्यपू मरून जाईल .भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता इथे आपणस भक्त प्रल्हाद यांच्या कडून नाम रुपी सेवेचे महत्व समजत आहे .समस्या कोणतीही असो आपणस नाम रुपी सेवा सुरु ठेवायची आहे. जसे भक्त प्रल्हाद यांना नृसिह यांनी तारले तसेच आपणास देखील आपली जी कोणती इष्ट देवता आहे ती तारणार आहे .आवश्यकता आहे केवळ अखंड नाम सेवेची इथे आपणस वाटते कि हिरण्यकश्यपू हे वाईट होते खरे तर ते सुद्धा देव भक्त होते पण त्यांच्यात अहंकार निर्माण झाला होता व तो दूर करण्यासाठी नृसिंह अवतार झाला म्हणजेच आपल्यातील हिरण्यकश्यपू चा नाश व्हावा यासाठी अवतार झाला आहे .आपणस त्यावर काम करायचे आहे आणि खरी नृसिंह जयंती साजरी करायची आहे व आपल्या जन्माचे सार्थक करायचे आहे.
चला आपण सर्व जण भगवान नृसिंह यांना प्रार्थना करूया – हे नृसिंहा तुझा नृसिंह अवतार म्हणजे आम्हाला आमच्या तील विकारांवर काम करण्यास प्रेरणा देणारा अवतार.. आमच्यातील हिरण्यकश्यपू चा नाश कर.. कारण खरा हिरण्यकश्यपू आमच्यात आहे… पण आम्ही तो फक्त तुझ्या गोष्टीत शोधतो.. खरेतर आमच्यातील हिरण्यकश्यपू नाश होणे गरजेचे आहे… आणि तो तुझ्या कृपेशिवाय शक्य नाही… आम्हाला भक्त प्रल्हादा सारखी भक्ती दे… आमच्या कडून तुझी नाम रुपी सेवा करून घे… आम्हाला तुझ्या नामात स्थिर कर… आणि आमचे आयुष्य रोजच नृसिंह जयंती मय बनव… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद… सर्वांना नृसिंह जयंती च्या खूप खूप शुभेच्छा