स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड आहे..आपणस वाटते की स्वामीं नाम जप केला व स्वामींचे स्तोत्र वाचले की झाली सेवा..काहींना वाटते की अजूनही काही इतर देव..देवतांचे स्तोत्र म्हंटलं नाही तर स्वामीं सेवा पूर्ण होत नाही..मग आपण यात आणखी सेवा ऍड करतो..पहा प्रत्येक सेवा ही परिपूर्णच आहे..असे नाही की अमुक मंत्राचा जप केला तरच ती स्वामीं सेवा..म्हणजेच कोणतीही सेवा करा पण ह्रदयातून करा..फक्त स्वामीं नाम घेतले तरी ती स्वामीं ची परिपूर्ण सेवा आहे..पण आपले मन नेहमी सगळी खिचडी करते..ही सेवा केली तर असे होईल..नाही केली तर असे होईल..पहिला हा  चुकीचा विचार मनातून काढून टाका.. आपण कोणतीही सेवा करा पण मनापासून करा..तुम्ही स्वामीं म्हणा, राम म्हणा किंवा श्री स्वामीं समर्थ म्हणा..प्रत्येक हाकेला स्वामीं ओ देतातच.. फक्त ती हाक ह्रदयातून हवी..आता हे झाले सेवेचे.. पण ही सेवा अपूर्ण आहे..जर आपण कर्म आणि सेवा यात भेद करत असू तर..कारण स्वामीं नी आपणस जे प्रापंचिक काम दिले आहे..ते जर आपण फक्त काम म्हणून पहात असू तर आपण स्वामीं सेवा ह्रदयातून करत नाही.. म्हणजेच आपणस जे काम मिळाले आहे ती सुद्धा स्वामीं सेवा आहे..ते काम करताना आपले भाव जर नकारात्मक असतील तर..आपली स्वामीं सेवा ही कायम अपूर्ण असते.. आपल्यावर स्वामीं कृपा होऊच शकत नाही.. म्हणून नेहमी आपण जे काही काम करता त्यात स्वामीं सेवेचा भाव ठेवा..आपण गृहिणी आहात.. तर आपले कर्तव्य आहे की घरातील काम हे स्वामी सेवा म्हणून करा..पहा आनंद मिळेल.. नाहीतर आपणस कायम वाटत राहील मला सुट्टी च नसते..अहो स्वामीं सेवेकरी तोच जो म्हणतो..धन्यवाद स्वामीं मला सेवेची संधी दिली…हेच आपण जी काही नोकरी करतो काम करतो याला सुद्धा लागू होते.. जर आपण काम चुकार पणा करत असू..आपले आचरण हे भ्रष्टाचार करणारे असेल तर..आपण कितीही स्तोत्र मंत्र म्हणत असाल तर ती स्वामीं सेवा कधीच असू शकत नाही..पण आपले आचरण शुद्ध असेल आपण आपल्या प्रत्येक कर्मास स्वामी सेवा मानत असाल तर नक्कीच आपलीं स्वामीं सेवा ही नित्यसेवा आहे..स्वामीं कृपेचा वर्षाव आपल्यावर होत आहे..खरंतर हा आपण स्वतः चिंतन मनन करण्याचा विषय आहे..यावर आपण अधिक चिंतन मनन करा..अजूनही काही प्रश्न असतील विचारा..नक्कीच आपण त्यावर चिंतन मनन करूया..स्वामीं ना अपेक्षित अशी स्वामीं सेवा करूया..स्वामीं नाम व आपले प्रामाणिक कर्म करूया..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले… हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस… शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत… श्री महादेवांनी हे रचले आहे आणि पार्वती मातेस सांगितले आहे.. भगवान शंकरांनी यास श्रीरामचरित मानस हे नाव दिले आहे… श्री उमा महेश्वरच्या चरणी वंदन करून कथेस आरंभ करत आहे… भगवंताचा वास हा ह्रदयात असतो आणि तिथूनच भाव प्रगट होत असतात असेच भाव श्री तुलसीदासांच्या हृदयात प्रगट झाले आणि निर्मिती झाली श्री रामचरित मानस ग्रंथाची… यात सात कांड आहे.. प्रत्येक कांड हे आपणस आंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात आहे.. हे सुंदर असे काव्य आहे.. यातील प्रत्येक शब्द हे मन प्रसन्न करणारे असे आहेत.. धर्म ,अर्थ ,काम , मोक्ष याचे ज्ञान आहे.. जीवन कसे जगावे याचे यतार्थ वर्णन आहे.. श्री रामचरित मानस मधील प्रत्येक कथा हि आपल्या जीवनात रंग भरते… या कथेमुळे स्वतःवर कसे काम करावे याची प्रेरणा प्राप्त होते… जे कुणी हे चरित्र श्रवण वा वाचन करतात तेच याची महती समजू शकतात… संगत कशी असावी हे शिकवते हि कथा… श्रद्धा नसेल सद्गुरूंचे मार्गदर्शन नसेल तर श्री रामचरित मानस समजत नाही म्हणजेच श्री रामाची कृपा प्राप्त होत.. नाही.. या साठी श्री रामाची कृपाच असावी लागते… जर आपली श्री रामाच्या चरणी श्रद्धा असेल तर नक्कीच आपणस याचा लाभ होईल… राम भक्तीची हि गंगा आपल्या पर्यंत येत आहे

आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत – श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदास स्वामी  दासबोधातून आपल्यातील मूर्खपणा सांगत आहेत
मागें एक पुढे एक ।
ऐसा जयाचा दंडक
बोले एक करी एक ।
तो एक पढत मूर्ख ।।
रामदास स्वामींनी किती सोप्या भाषेत आपल्यातील मूर्ख पणाचा गुण सांगितला आहे.. पहा ना अनेकदा कळत- नकळत आपल्या कडून हि चूक होत असते… एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट आपणस पटली नाही कि आपण तिच्या मागून… तिच्या विषयी चर्चा करतो … मग आपण सारासार विचार न करता त्या व्यक्तीला मूर्ख म्हणतो.. पण खरोखर ती व्यक्ती मूर्ख आहे कि आपणच मूर्ख आहोत… कारण ज्या व्यक्ती विषयी आपण बोलत आहोत… ती व्यक्ती समोर नाही तरी देखील आपण तिच्या विषयी नकारात्मक बोलत असतो… नक्की आपण स्वतः ला च तर मूर्ख बनवत आहोत कि नाही… आपणच विचार करावा… समर्थ सांगतात… ज्या व्यक्ती विषयी आपण मागून टीका करतो… तीच व्यक्ती समोर असेल तर आपण तिची खोटी स्तुति करतो…खरंच आपण त्याला मूर्ख बनवत नाही तर आपणस स्वतःच आपण मूर्ख बनवतो पण हे आपल्याला समजतच नाही… आपण मराठीत एक म्हण ऐकिली आहे… बोले तैसा वागे … त्याचे वंदावे पाऊले… या विषयी समर्थ सांगतात कि… लोकांशी बोलताना एक बोलतो व प्रत्यक्ष कृती करताना मात्र आपण त्याच्या विरुद्ध कृती करतो… जसे आपणस व्यायामाचे महत्व माहित आहे… म्हणून आपण इतरांना त्याचे इतके महत्व सांगतो कि… त्या व्यक्ती ला वाटते खरंच हा एक उत्कृष्ट व्यायाम पटू असेल… प्रत्यक्षात आपण कधीच व्यायाम करत नाही… मग हा मूर्खपणा नाही का ? पहा समर्थानी एका श्लोकात आपल्यातील मूर्खपणाचे दर्शन आपणस करून दिले आहे… यावर आपण स्वतः चिंतन करावे .
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था तू आज आम्हाला आमच्यातील एक मूर्खपणा दाखवला त्याबद्दल धन्यवाद… आम्हीं जेव्हा तो वाचतो तेव्हा तो छान वाटतो… पण मनावरच्या मूर्खपणाच्या सवयी मुळे आम्हाला आमचा मूर्खपणा कधीच दिसत नाही… आजचा हा श्लोक आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनव… जेणेकरून… आम्हाला आमच्यातील मूर्खपणा जाणवेल… आणि मूर्ख पणा आमच्यातून हळूहळू नष्ट व्हावा असा आम्हाला आशीर्वाद द्या… धन्यवाद समर्था … कोटी कोटी धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ