शिव पुराण कथा १

Sep 28, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

शिव पुराण हे भगवान शिव यांचे सर्वस्व आहे.. शिव पुराण  श्रवण किंवा पठण केले तर चारी पुरुषार्थ प्राप्त होतो.. चित्त शुद्धी साठी शिव महापुराण चे चिंतन मनन करावे.. देवराज नावाचा एक गृहस्थ होता .. तो सर्व आचरण हे चुकीचे होते.. ज्ञान नव्हते पण दाखवत होता खूप ज्ञानी आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले होते.. एक दिवस तो फिरता फिरता उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्यात याचे पूर्वीच नाव प्रतिष्ठानपुर होते..  झूँसी गावात पाहोचला तिथे त्याला शिव मंदिर दिसले.. तिथे अनेक साधू संत .. शिव भक्त होते.. तिथे देवराज ला ताप आला होता.. तिथे शिव पुराण  ची कथा सुरु होती..देवराज तिथे शिव कथा श्रवण  करतो.. साधारण एक महिन्यात त्याचे निधन झाले.. तो यमलोकी जात असताना तिथे शिव गण येतात आणि त्याला कैलास वर घेऊन जातात.. त्यावेळेस धर्मराज सुद्धा हस्तक्षेप करत नाही.. असा हा शिव पुराण  चा महिमा आहे.. हि कथा शिव पुराणात येते.. बोला उमा महेश्वर देवता कि जय.. !

बोध – खरंतर ईश्वराचे प्रत्येक चरित्र हे आपणस चित्त शुद्धी साठी महत्वाचे कारक असे असते पण आपण फक्त ते वाचतो ऐकतो आणि इतरांना सांगतो.. पण त्यातून आपणास काय बोध होतो हे महत्वाचे.. उपरोक्त लीलेत आपले आचरण हे शुद्ध असावे हा बोध होतो.. कारण आपले आचरण आपले जीवन दर्शवते.. त्या व्यक्ती कडे ज्ञान नव्हते  पण असे दाखवत होता कि मी खूप ज्ञानी आहे.. कधी कधी आपणही हि चूक करतो आपणस अनेकदा एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते आपण ते मान्य करत नाही उलट खोटे ज्ञान प्रदर्शित करतो.. हि चूक आपणस दूर करायची  आहे.. त्याने अनेकांचे धन लुबाडले म्हणजेच इथे आपणस प्रामाणिकपणे धन कमवायचे आहे.. थोडक्यात शिव पुराण कथा आपणस शुद्ध आचरण ठेवण्याची शिकवण देत आहे .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

प्रार्थना – हे महादेवा.. देवराज यांना तू शिव पुराण कथेस निमित्त करून चित्त शुद्ध केलेस तसेच आमचेही चित्त शुद्ध कर.. आमचे चुकीचे आचरण दूर कर.. आम्हाला ज्ञानी बनव पण खोटे ज्ञान प्रदर्शित न करण्याची बुद्धी दे.. प्रामाणिक पणे धन कमवण्याची बुद्धी दे.. धन्यवाद समर्था .. हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद..!  

www.chetanakeswar.com


Share
और पढिये !!

जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७) आजचे चिंतन-मनन सर्व शास्त्र हुनी थोर !! असे माझा स्वामीराव !! जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि... आपणस लगेचच...

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६) आजचे चिंतन-मनन श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'नशीब' ..जे भेटते 'पुण्याईने' !! श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'पुण्य' ..ज्याने 'नशीब' बदलले आमुचे !! www.SwamiVaani.com...

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४) आजचे चिंतन-मनन अहंकार नसावा मनी ! समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !! कर्ता करविता एकच समर्थ स्वामी ! ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !! www.SwamiVaani.com वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे...

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३) आजचे चिंतन-मनन काळजी नको करू मित्रा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे..! ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास, आता नशीब तुझ्या सोबत आहे..!! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला...

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२) आजचे चिंतन-मनन अरे किती सोसतोस त्रास !! बन तू स्वामींचा दास ! विश्वासाने सांगतो , स्वामी करणार नाही तुला उदास !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास...

आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू... आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण...

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०) आजचे चिंतन-मनन अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा , नको घाबरू तू असे बाळ त्यांचा | www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार...

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९) दत्त येऊनिया ऊभा ठाकला , सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला , जन्ममरणाचा फेरा चुकवीला || - श्री दत्त महाराजांची आरती www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा...

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८) ✨ आजचे चिंतन-मनन ✨ जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे ।। इतुके देई दीन दयाळा , नच तव पद अंतरा रे ।। - आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग) www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त...

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...