श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २८ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

Sep 19, 2023 | मराठी, संत गजानन महाराज

Share

अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका

खंडू पाटीलांनी श्री महाराजांना विनंती करून आपल्या घरी राहण्यास नेले..एकेदिवशी खंडू पाटील यांच्या घरी काही कर्मठ ब्राह्मण आले.. त्यांना पैशाचा लोभ होता.. त्यावेळी श्री महाराज आराम करत होते.. हे कर्मठ ब्राम्हण मोठं मोठ्याने मंत्र म्हणू लागले जेणे करून श्री महाराज उठतील.. मंत्र म्हणत असताना ते अनेक चुका करत होते.. गजानन महाराज उठले आणि त्यांना म्हणाले अहो.. अरे या अध्यात्म विद्येला पोट भरण्याची विद्या बनवू नका.. अरे उगाचच भोळ्या भक्तांचा फायदा घेऊ नका.. महाराजांनी शुद्ध स्वरात मंत्र म्हणून दाखवले.. महाराजांचे मंत्र ऐकून त्या सर्वांना आश्चर्य वाटले.. त्यांना समजले कि महाराज हे कुणी साधारण व्यक्ती नसून.. विधातच आहेत.. हे सर्व जण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.. महाराजांनी हि त्यांना आशीर्वाद दिला..महाराजानी खडूं पाटलांना त्या ब्राह्मणांना १-१ रुपये दक्षिणा देण्यास सांगितली.. त्यानंतर ते ब्राम्हण तिथून दुसऱ्या गावी निघून गेले.. बोला श्री गजानन महाराज कि जय .
बोध – अध्यात्म हे पोट भरण्याचे साधन नसून.. ती ईश्र्वराच्या जवळ जाण्याचा.. त्याची अभिव्यक्ती करण्याचे माध्यम आहे


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...