श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६
श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस!
शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो सूर्य उपासक होता.. तो रोज न चुकता सूर्याला अर्घ्य देत असे.. एके दिवशी वज्रभूषण अर्घ्य देत असताना त्याला सूर्याच्या जागी श्री गजानन महाराजांचे दर्शन झाले.. तेव्हा श्री महाराज तिथेच बसलेले होते..वज्रभूषण तात्काळ महाराजच्या चरणी लीन होतो.. महाराजांच्या चरणी अर्घ्य समर्पित करतो.. आरती करतो.. महाराजांची स्तुति करतो.. मला आज माझ्या सेवेचे फळ मिळाले.. आपल्या दर्शनाने माझ्या सर्व चिंतेचे हरण झाले आहे.. महाराज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि उपदेश करतात कि कर्म मार्ग सोडू नकोस.. मात्र फळाच्या अपेक्षेत न अडकता अखंड कर्म करत रहा.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – वरील लीलेतून श्री महाराज आपणस कर्म करण्याचा उपदेश करत आहेत.. कर्म करा पण विना फळाची अपेक्षा म्हणजेच कर्म तो पर्यंत करत रहा जो पर्यंत यश मिळत नाही.. !