हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

May 28, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामीं भक्तहो… अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत…पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील तर तो जो काही दोष आहे..तो मुळापासून दूर कसा होणार..आज आपण अश्याच एका उपायांवर चिंतन मनन करणार आहोत..आज आपण आपल्या घरांना विविध नावे देतो..जसे मातृ पितृ निवास, स्वामीं निवास,स्वप्न पूर्ती निवास..असे अनेक नावे आपण आपल्या वास्तूला देत असतो..पण नाव देताना हे नाव आपणस काय प्रेरणा देत आहे.. यांवर देखील आपण चिंतन मनन करणार आहोत…काही दिवसांपूर्वी एक पाटी मला स्वामीं कृपेनं मिळाली.. त्यावर लिहलं।आहे..” हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो” या वर चिंतन मनन झाले..एक विचार सुद्धा आपले जीवन बदलून टाकू शकतो तसेच हा एक विचार नक्कीच वास्तू दोष  घालवू शकतो प्रेरणा मिळाली..पहा मी कुणाच्या घरात राहतो…स्वामीं च्या म्हणजेच ब्रम्हांड नायकाच्या घरात राहतो..जे स्वामीं चे घर आहे तिथे  दोष कसा असणार..पहा एक।विचार कसे जीवन बदलून टाकतो.. इथे महत्वाचे सांगावेसे वाटते की इतरही गोष्टी आपण नाकारत नाही पण प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करतो तेव्हाच आपणस यश प्राप्त होते..असो.. पहा जेव्हा हा विचार आपल्या अंतर्मनात कोरला जाईल  तेव्हा आपण प्रत्येक घराकडे आपल्या स्वतःच्या घराकडे..जे घर आपले ऊन , वारा पाऊस अश्या अनेक संकटापासून रक्षण करते ते आपणस गृह मंदिरच वाटेल..आणि सर्व दोष दूर होतील   हा विश्वास आहे..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय!.धन्यवाद स्वामीं!


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...