Share

एक हरि आत्मा जीवशिव सम ।
वायां तू दुर्गमी न घालीं मन ॥३॥ हरिपाठ
पहा काय बोध होतो…स्वामीं नाम घ्या..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ जप करा
www.chetnakeswar.com

स्वामी भक्तो… वरील ओवी तून माऊली आपणस काय सांगत आहेत.. हरी हा एकच आहे.. जो शिव आहे.. जो आत्मा आहे.. आपण त्यात भेद करतो.. जीव आणि शिव वेगळे आहेत.. आपण इथे थोडा सोपा अर्थ घेऊया.. अरे जो ईश्वर आहे तो एकच आहे.. कुणी त्याला वेगळ्या नावाने ओळखतो.. कुणी शिव म्हणतो.. पण सर्वांमध्ये असणार जो एक चैतन्य आहे.. शिव आहे.. ज्याला आपण आत्मा म्हणतो तो एकच आहे.. पण आपली जी बुद्धी आहे ती यात भेद करते.. अमुक ईश्वर असा आहे.. पण खरंतर आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत.. आपण उगाचच त्यावर चर्चा करतो.. नको त्यात मन अडकवतो.. हरी शिवाय आणखी कुठेही मन अडकवले तर ते कष्ट व्यर्थच जाणार आहेत.. म्हणून हरी नाम घे.. म्हणजेच नाम सेवा कर.. कोणतेही नाम घे.. पहा सत्याची ओळख होईल.. चला स्वामी नाम घेऊया.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...