यशाला कधीच शॉर्टकट नसतो.

Feb 18, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, प्रेरनादाई कथा

Share

स्वामी वाणी पुष्प ५९१(पर्व ४ थे भाग ९५)

प्रेरणादायी बोल

हे मना !! लक्षात ठेव.. यशाला कधीच शॉर्टकट नसतो.. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट कर.. शाश्वत यश मिळेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी आपणस यशाचा मंत्रच सांगितलं आहे.. यश हवे असले तर कधीच शॉर्टकट नसतो… आपणा सर्वांना यश हवे आहे.. मग यश प्राप्त करण्यासाठी आपण काय करतो हे खूप महत्वाचे आहे.. जर आपणस शाश्वत यश हवे असेल तर आपणस कष्टच करावे लागतील.. पहा दोन विद्यार्थी आहेत.. दोघेही हुशार आहेत.. कारण ईश्वर सर्वाना समान बुद्धिमत्ता देतो.. एक विद्यार्थी रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो… त्या विषयावरील सर्व प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करतो.. म्हणजेच रोजचा अभ्यास रोज पूर्ण करतो.. दुसरा विद्यार्थी हा वर्ष भर अभ्यास करत नाही.. मात्र परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र जागरण करतो.. पहा जेव्हा निकाल लागेल तेव्हा कुणास घवघवती यश मिळेल.. ज्या विद्यार्थ्याने रोज अभ्यास केला त्याला.. दुसरा विद्यार्थी पास होईल कि नापास होईल यांची शाश्वती नाही म्हणजेच यश मिळेल याची खात्री नाही म्हणजेच यश हे नेहमी त्यालाच मिळते जो स्वामींवर विश्वास ठेवून प्रामाणिक कष्ट करतो त्यालाच.. हाच नियम आपणस जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू पडतो.. जेव्हा आपले कर्म हे स्वामी सेवा या भावनेने करू त्यात कष्ट करताना आपण कोणतीही कमतरता ठेवत नाही तेव्हा आपणस शाश्वत यश मिळतेच.. म्हणून स्वामी भक्तहो न थकता.. न थांबता अखंड कर्म रुपी सेवा सुरु ठेवूया .. धन्यवाद समर्था ..बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...