हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे..

Feb 13, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५८७(पर्व ४ थे भाग ९१)*

*प्रेरणादायी बोल*

हे मना !! प्रत्येक पाऊल टाकत असतांना.. चुकीचे पाऊल पडणार नाही ह्याची काळजी घे.. लोकांना जरी समजत नसेल पण स्वामीना सर्व समजत आहे ह्याची जाणीव ठेव..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामीं भक्तहो आजच्या स्वामीं वाणी तुन स्वामीं काळजी घेण्यास सांगत आहेत..काळजी पण काळजी म्हणजे चिंता नव्हे तर आपण जे काही कर्म करतो..ते कर्म करताना काळजी घेण्यास स्वामीं सांगत आहेत..आपण जे काही कर्म करत आहोंत ते चुकीचे कर्म तर करत नाही ना..म्हणजे आपण जे काही कर्म करत आहोत त्यामुळे देश, समाज, वन्य जीव प्राणी यांचे आपण नुकसान तर करत नाही ना..जर आपण नुकसान करत असू व आपणस वाटत असेल की मला कुठे कोण पहात आहे.. स्वामीं पहात आहेत…! पहा रस्त्यावर कचरा टाकु नका, थुंकू नका हे आपण लहानपणा पासून ऐकतो, बोलतो..अनेक ठिकाणी बोर्ड सुद्धा असतो की असे करू नका नाही तर दंड होईल.. आपण मात्र नजर चुकवून या गोष्टी करतो..आपणस आनंद होतो की मला कुठे कुणी पाहिले..पण आपण हे विसरतो की हे स्वामीं।पहात आहेत..आपण अशी चूक करून आपण स्वतः ला तर फसवतोच त्याच बरोबर आपल्या पुढच्या पिढीचे सुद्धा नुकसान करत आहोत..ते कसे पहा आपण लहानपणी दुधा शिवाय कशालाच प्लास्टिक पिशवी वापरत नव्हतो..आपले काही अडत होते का?? आज आपण प्लास्टिक पिशवी वापरतो..त्याचा परिणाम रस्त्याच्या कडेने प्लास्टिक मध्ये कचरा..हे कर्म कुणी केले आपण..याची फळे आपण तर भोगत आहोतच पण भावी पिढी सुद्धा यांचा दुष्परिणाम भोगणार आहे..पहा…पहा ही चूक आपण करतो व म्हणतो आम्ही नाही इतर लोक..म्हणून प्रत्येक कर्म करताना स्वामीं ना भूषणावह कर्म करावे..धन्यवाद स्वामीं कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...