तुज चरणापासून नको दूर लोटू ! तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३७(पर्व ४ थे भाग ४१)

आजचे चिंतन-मनन

तुज चरणापासून नको दूर लोटू !
तुझ्या नामाचाच आहे मज आसरू !!
दृढ संकल्पाने तुझी सेवा करू !!
दास राहीन सदैव !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो…भगवंताकडे काय मागावे.. याची उत्तम प्रार्थना म्हणजे वरील शब्द…खरच समर्था खूप खूप धन्यवाद असे भाव, विचार वाणी आमच्या पर्यंत पोहचवतोस त्याबद्दल.. हीच तर तुझी कृपा आहे..समर्था काहीही होऊ दे पण आम्हाला तुझ्या चरणापासून दूर करू नकोस..इथे आपली गल्लत होऊ शकते स्वामीं चरण फक्त स्वामीं च्या मंदिरात आहेत का ? नाही तर सर्वत्र स्वामीं चरण आहेत..प्रत्येकाच्या हृदयात स्वामीं चा वास आहे..पण आपणस याचा विसर पडला आहे.. आपण इतरत्र स्वामीं ना शोधतो…आता ती वेळ आली आहे..स्वामींना प्रार्थना करूया समर्था तुझे जे स्थान ..चरण..हृदयात आहेत..त्या पासून मला दूर करू नकोस…आता आपणस स्वामीं च्या चरणांशी स्थान मिळाले..पण ते टिकवता आले पाहिजे..त्याला पर्याय काय.. स्वामीं नाम “”श्री स्वामीं समर्थ”” नामाचा जप..पण आपण सोपे साधन सोडून नको त्या मार्गाने स्वामींना शोधतो..म्हणून आज पुन्हा सर्वांना विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..थोडे घ्या पण..माझे स्वामीं आईचे नाम घ्या..स्वामीं नामाची सवय कशी लागू शकते..दृढ संकल्पाने..जसे मी सामूहिक ११ कोटी स्वामीं नाम जप सेवेत एक वर्षात किमान ६,६६,६६६ स्वामीं नाम सेवा रुजू करेल..कुणी म्हणेल मी २१,००० सेवा रुजू करेल..हा झाला दृढ संकल्प… सामूहिक स्वामी नाम सेवा हे निमित्त आहे स्वामीं सेवेचे..पहा आजरी पडल्यावर आपण औषध घेतो.. पण आजारी पडू नये याचीच काळजी आपण घेतली तर..आपले मन आजारी पडते..मग आम्ही हताश होतो.. इकडे तिकडे भरकटत बसतो .जर आपण आजपासून मनाला स्वामीं नाम सेवेचे काम दिले तर..नक्कीच ते भरकटणार नाही..ते इतरांना देखील प्रेरणा देईल..इथे म्हंटले आहे..दास राहीन..इथे थोडक्यात आपणस आपल्या मनाचे दास न बनता.. आपल्या मनाला स्वामी चरणाचे.. स्वामीं नामाचे दास बनवायचे आहे..म्हणजेच आपल्या हृदयातील स्वामीं चरणी आपणस एकरूप व्हायचे आहे..यावर आपण स्वतः चिंतन मनन करा..खूप छान मार्गदर्शन स्वामीं करतील..स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं ही समज दिल्याबद्दल.. हे चिंतन करून घेतल्याबद्दल…!


Share
और पढिये !!

जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७) आजचे चिंतन-मनन सर्व शास्त्र हुनी थोर !! असे माझा स्वामीराव !! जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !! www.SwamiVaani.com स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि... आपणस लगेचच...

श्री स्वामी समर्थ म्हणजे असे ‘पुण्य’ ..ज्याने ‘नशीब’ बदलले आमुचे !!

स्वामी वाणी पुष्प ५३२(पर्व ४ थे भाग ३६) आजचे चिंतन-मनन श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'नशीब' ..जे भेटते 'पुण्याईने' !! श्री स्वामी समर्थ म्हणजे असे 'पुण्य' ..ज्याने 'नशीब' बदलले आमुचे !! www.SwamiVaani.com...

अहंकार नसावा मनी !

स्वामी वाणी पुष्प ५३०(पर्व ४ थे भाग ३४) आजचे चिंतन-मनन अहंकार नसावा मनी ! समर्पित कर्म करावे प्रत्येक क्षणी !! कर्ता करविता एकच समर्थ स्वामी ! ऐसा विवेक जागृत ठेवुनिया !! www.SwamiVaani.com वरील ओवीतून स्वामी आपणस काय सांगत आहेत .. अहंकार नसावा मनी.. म्हणजेच इथे...

काळजी नको करू मित्रा

स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३) आजचे चिंतन-मनन काळजी नको करू मित्रा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे..! ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास, आता नशीब तुझ्या सोबत आहे..!! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला...

स्वामी करणार नाही तुला उदास !!

स्वामी वाणी पुष्प ५२८(पर्व ४ थे भाग ३२) आजचे चिंतन-मनन अरे किती सोसतोस त्रास !! बन तू स्वामींचा दास ! विश्वासाने सांगतो , स्वामी करणार नाही तुला उदास !! www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..काय आहे आजच्या स्वामीं वाणी चा संदेश..पहिली ओवी तुन प्रहार केला आहे..त्रास...

आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.

स्वामी भक्तहो .. आपण म्हणतो कि चिंतन मनन केले पाहिजे.. पण केले जात नाही कारण चिंतन मनन का करायचे.. याचा फायदा काय हेच आम्ही समजून घेत नाही .. चला आधी आपण चिंतन मनन म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू... आपण सर्व शिकलो.. आज प्रत्येक जण काही तरी काम करतो.. पण...

अशक्य ही शक्य करतील स्वामी

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०) आजचे चिंतन-मनन अशक्य ही शक्य करतील स्वामी जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा , नको घाबरू तू असे बाळ त्यांचा | www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार...

दत्त येऊनिया ऊभा ठाकला

स्वामी वाणी पुष्प ५२५(पर्व ४ थे भाग २९) दत्त येऊनिया ऊभा ठाकला , सदभावे साष्टांगेसी प्रणिपात केला | प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला , जन्ममरणाचा फेरा चुकवीला || - श्री दत्त महाराजांची आरती www.SwamiVaani.com स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर आपण चिंतन मनन केले असेलच.. लहानपणा...

जाणसी मनीचे सर्व समर्था

स्वामी वाणी पुष्प ५२४(पर्व ४ थे भाग २८) ✨ आजचे चिंतन-मनन ✨ जाणसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे ।। इतुके देई दीन दयाळा , नच तव पद अंतरा रे ।। - आरती संग्रह (दिंडोरी प्रणित सेवा मार्ग) www.SwamiVaani.com स्वामीं भक्त हो..वरील ओवी म्हणजे ह्रदयातून आलेले आर्त...

स्वामी सेवेचा सोपा मार्ग

स्वामी भक्तहो..जप सेवा करायचीच आहे तर सोप्पा मार्ग.. रोज सकाळी उठलात कि मोबाईल फोन सुरु करण्यापूर्वी स्वामी नाम घ्या.. मग मोबाइल हातात घेऊन आजची सेवा सबमिट करा.. झाली कि आजची सेवा.. पहा किती सोपे आहे स्वामी नाम सेवेचा...