जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५३३(पर्व ४ थे भाग ३७)

आजचे चिंतन-मनन

सर्व शास्त्र हुनी थोर !!
असे माझा स्वामीराव !!
जिथे सर्व शास्त्र अपूर्ण !
तिथे स्वामी भक्ती पूर्ण !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो.. वाचताना असे वाटते कि आपण अर्थ समजला.. पण अर्थ इतका खोल आहे कि… आपणस लगेचच त्याचा विसर पडतो.. सर्व शास्त्रांहून थोर.. इथे आपली गल्लत होऊ शकते ती अशी कि आपण तुलना करत आहोत.. पण असे नाही.. प्रत्येक गोष्ट हि त्या ठिकाणी योग्य असते मग ते शास्त्र असो वा आणि काही.. सर्व शास्त्राची निर्मिती हि स्वामीच तर करतात… म्हणजेच इथे जर आपण विचार केला तर आपणस तुलना न करता स्वामींवर विश्वास दृढ करायचा आहे.. म्हणजेच क्षणिक गोष्टीत न अडकता स्वामी नामावर मनाला स्थिर कार्याचा आहे..जिथे सर्व शास्त्र अपूर्ण ! इथे आपल्यातील चुकीच्या मान्यतेवर प्रहार केला आहे.. पहा आपल्या जीवनात समस्या आहे.. समस्येतून मार्ग काढण्यासाठी आपण आध्यत्मिक सेवा करतो.. मग ती स्वामी सेवा असो वा आणखी काही.. पण स्वामी सेवा करतानाही आपण फक्त स्वामी सेवा करतो का नाही मग आपले मन म्हणते वा आणखी कुणी सांगते कि.. अमुक अमुक सेवा कर.. हे नाही ते कर… इथे एक गोष्ट परत सांगावीशी वाटते आपण कश्यावर टीका करत नाही आहोत पण जर आपली स्वामींवर श्रद्धा आहे.. विश्वास आहे मग का ? स्वामी सेवे व्यतिरिक्त आणखी सेवा करावी लागते.. का आपले मन अजूनही इतर सेवांकडे वळते.. का स्वामी नामावर स्थिर होत नाही.. कारण आपण स्वामींना आई म्हणून हाक मारत नाही.. आपली भक्ती अजून स्वामी चरणी दृढ नाही… आपणस हि भक्ती दृढ करायची आहे.. कोणतीही परिस्थिती येऊ मुखातून स्वामी नामच यावे.. म्हणजेच अंतर्मनात हा विचार कोरला गेला पाहिजे आता फक्त आणि फक्त स्वामी भक्ती.. स्वामी प्रेम..अशी स्वामी भक्ती प्रेम आपल्या जीवनात यावे हीच स्वामी चरणी प्रार्थना.. धन्यवाद समर्था.. !!

 


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...