स्वामी वाणी पुष्प ५२९(पर्व ४ थे भाग ३३)
आजचे चिंतन-मनन
काळजी नको करू मित्रा,
स्वामी तुझ्या पाठीशी आहे..!
ह्या स्वामी शक्तीवर ठेव विश्वास,
आता नशीब तुझ्या सोबत आहे..!!
www.SwamiVaani.com
स्वामीं भक्तहो..या ओवीतून ही मनावर प्रहार केला आहे..आपण स्वतः स्वतःच्या मनाला मित्राची उपमा दिली आहे..कारण आपल्या मना सारखा आपला दुसरा चांगला…खरा..मित्र दुसरा कोणी नाही..पण आपण मनाला मित्र बनवत नाही तर.. आपण।मनाचे गुलाम बनतो..मग मन आपणस नकारात्मक प्रतिसाद देते..आपणासही तेच खरे वाटते..त्या मुळे स्वामीं सांगत आहेत..मनाला मित्र बनव…मित्र झाले की..मनात विश्वास निर्माण होईल..स्वामीं पाठीशी आहेत..विश्वास ही स्वामीं सेवेतील खूप मोठी शक्ती आहे.. एकदा मन मित्र बनले..स्वामीं वर विश्वास दृढ झाला की..नशीब..ज्यावेळी वाईट होते तेव्हा आपण नशीब म्हणतो..पण नशीब हे दुसरे काही नसून आपल्यातील अविश्वास..आपल्यातील अविश्वास जाऊन विश्वास निर्माण झाला की..उरते ती फक्त स्वामीं ची साथ..चला तर मग मनावर काम करूया..स्वामीं नाम घेऊया.. धन्यवाद स्वामीं..!