स्वामीं नाम सेवेतील अडचणी
१)वेळ नाही
२) खूप काम
३)कंटाळा
४)आज इच्छा नाही
५) उद्या पासून करू
६) जप करताना झोप येते
अशी हजारों कारणे आपल्याकडे आहेत पण जेव्हा मी माझ्या स्वामीं ना हाक मारतो ना..स्वामीं आई वाचव..तेव्हा मात्र स्वामीं आई कोणतेच कारण देत नाही.. जर स्वामीं नी आपल्या हाकेला ओ दिली नाही तर ? असे होत नाही..होणार नाही.. पण आपण ही सेवेत कमी पडायचे नाही..वेळ मिळाला की स्वामीं नाम, मनात द्वंद्व निर्माण झाले की तारक मंत्र.. पहा…स्वामीं नाम,.स्वामी सेवा ही अनुभूती आहे….स्वामीं नाम।सेवेस काय लागते..आपल्या मनाची तयारी..चला तर मग सेवा रुजू करूया..! धन्यवाद स्वामीं
स्वामींची भक्ती
स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...