सज्जन कुणाला म्हणावे ?

Feb 4, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७८(पर्व ४ थे भाग ८२)

आजचे चिंतन-मनन

सज्जनांचे सज्जनत्व वाढव !
दुर्जनांचे दुर्जनत्व घालव !
अवघे विश्व स्वामीमय होवो !
हेचि मागणे समर्था !!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो .. आजची स्वामी वाणी समजणे सोपे आहे तसेच अवघड हि आहे कारण महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो कि आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि सज्जन नेमके कुणास म्हणायचे.. आपल्या मनात एक व्याख्या असते आणि व्यक्ती नुसार ती बदलत असते.. पण मग सज्जन कुणास म्हणावे.. स्वामी तुम्हींच यावर चिंतन मनन करून घ्या.. प्रत्येक व्यक्ती हि सज्जनच असते.. कारण प्रत्येक व्यक्ती मध्ये चांगले बनायची लालसा असते.. अशी एक व्यक्ती नाही कि तिला दुर्जन बनून आनंद होतो पण तो वेळेनुसार आपल्यात बदल करतो आणि स्वतःला दुर्जनांच्या यादीत बसवतो..आपण सज्जनांची व्याख्या करण्याचा प्रयत्न करूया ” जो कोणत्याही परिस्थितीत स्वामींना भूषणावह असेच आचरण करतो तोच सज्जन” पहा आपला काही तरी व्यक्तिगत फायदा होत आहे पण त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते आहे तरीही आपण आपल्या फायदा व्हावा या साठी चुकीचे वर्तन करतो तेव्हा आपण सज्जनांच्या भूमिकेतून दुर्जनांच्या भूमिकेत जातो .. आता आपल्या सर्वांच्या मनात येते कि जर आपण वेळेनुसार आम्हीं तसे वागलो नाही तर आमचे कोणतेच काम होऊ शकत नाही मग आम्ही काय करायचे.. पहा जेव्हा आपण अडचणीत असतो आणि तेव्हाही संयम बाळगतो थोडे थांबतो आणि मग निर्णय घेतो नक्कीच स्वामींना भूषणावह निर्णय घेत असतो.. जेव्हा आपल्या मनात संभ्रम असेल तेव्हा थोडे शांत व्हा स्वामींना प्रार्थना करा मार्गदर्शन करा.. पहा आपला निर्णय हा स्वामींना भूषणावह म्हणजे सज्जन माणसाचा असेलसुरवातीला अवघड वाटेल पण नंतर आपणस यात यश.. जेव्हा प्रत्येक जण असा प्रयत्न करेल तेव्हा सर्व दुर्जनांचे दुर्जनत्व दूर होणार आहे.. आपल्या मनात येते मी एकटा चांगला वागून काय फायदा.. पहा पत्त्याचा बंगला असतो.. त्यातील एक पत्ता काढला तर बंगला पडतो तसेच आपण आपल्यातील दुर्गुण काढला तर इतर लोक हि आपल्यातील दुर्गुण काढतील..सज्जन होतील.. आणि संपूर्ण विश्व् हे स्वामी मय होईल.. पहा किती सुंदर नियोजन आहे आपल्या स्वामींचे फक्त गरज आहे आपल्यातील दुर्गुण काढून चांगले गुण धारण करण्याची म्हणजेच आपल्यात स्वामींना भूषणावह असणारे सज्जनांचे गुण आपल्यात धारण करण्याचा.. चला तर मग आपल्या स्वतःवर कार्य करूया.. धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

देवी भगवतीला प्रार्थना –

https://youtu.be/TCahq34720k हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले...

ध्यान म्हणजे काय?

https://youtu.be/OjvH-OX4ATo     ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ...

जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !

https://youtu.be/ys7eNZGQJeU श्री गजानन महाराज म्हणत आहेत... जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस... ! लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी...

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी व लाखोंच्या सकारत्मक प्रार्थनेने मृत्यूच्या दारातून परत.. स्वामीं सेवेकरी…!

आपण नेहमी म्हणतो की स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवून रहावे.. म्हणजेच आपले कर्म निस्वार्थ भावनेने करावे..फळाची अपेक्षा करू नये...खरंच काय असते निःस्वार्थ सेवा..अशी निःस्वार्थ सेवा करणारे कुणी आहेत का... असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर याचे उत्तर आहे हो..असे...

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ - गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा... !  आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे...

पितृपक्ष – पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा

पितृपक्ष - पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवाडा, आपल्याकडे दरवर्षी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपदी अमावास्या हा साधारण १५ ते १६ दिवसाची कालावधी ला आपण पितृपक्ष म्हणतो. पितृपक्ष म्हंटलं कि आपल्या कडे आपण म्हणतो कि कोणतेच धार्मिक  कार्य या महिन्यात करायची नाही हे आपण आज...

श्री गणपती बाप्पा ची मूर्ती आपणस काय प्रेरणा देत आहे

श्री गणपती बाप्पा ची मूर्तीची आपण स्थापना करतो हि मूर्ती आपणस अनेक गोष्टींची प्रेरणा देते.. चला तर मग आज आपण यावर चिंतन मनन करण्याचा प्रयत्न करूया...विशाल मस्तक आपणस प्रेरणा देते ज्या प्रमाणे बाप्पा बुद्धी ची देवता आहे त्याचप्रमाणे आपण कायम नवनवीन ज्ञान प्राप्त केले...

प्रार्थना – दोष कुणाचा

हे समर्था.. आज पर्यंत मला वाटत होते की समोरची व्यक्तीच चुकीची आहे..पण आज मला समजले की दोष समोरच्यात नाही तर माझ्या विचारांत आहे..माझ्या विचारांतील दोष दूर कर..कारण माझे जसे विचार तशीच सृष्टी मला प्राप्त होणार आहे..माझी दृष्टी..विचार..आचार प्रेम..आनंद..मौनमय...

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना - प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो...