श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा

Sep 12, 2022 | मराठी, संत गजानन महाराज

Share

श्री गजानन महाराज लीला दर्शन ८ – गजाजन महाराज सांगत आहेत अती सर्व वर्ज्य करा… ! 

आपण लीला क्रमांक ७ मध्ये पाहिले कि श्री गजानन महाराज श्री बंकटलाल यांच्या घरीच राहिले.. दुसऱ्या दिवशी श्री गजानन महाराजांची विविध प्रकारचे सुंगधी द्रव्याने स्नान घातले.. षोडश उपचारे पूजा केली.. नैवद्य अर्पण केला.. इतके भक्तिमय वातावरण होते कि सर्व सेवेकरी सेवेत तल्लीन झाले होते.. श्री बंकटलाल तर भक्तीत इतके तल्लीन झाले होते.. त्यांचे घर द्वारकापुरी सारखे झाले होते… तो दिवस सोमवारचा होता.. त्यावेळेस तिथे श्री बंकटलाल यांचे चुलत भाऊ इच्छाराम सुद्धा तिथेच होते… ते शिव भक्त होते.. त्या दिवशी त्यांचा उपवास होता.. त्यांनी श्री महाराजांना प्रार्थना केली.. महाराज आपण करुणाघन आहात.. आपण सर्वांच्या इच्छेची पूर्ती करता.. माझी आपणस विनंती आहे कि.. आपण संध्याकाळचे भोजन देखील आमच्याकडे करावे.. आपण जर जेवण केले नाही तर मी देखील भोजन करणार नाही.. आपण सर्वांची इच्छा पूर्ण करता.. माझी इतकी इच्छा पूर्ण करा.. महाराज भोजन करण्यास तयार झाले.. इच्छाराम भोजनाचे ताट घेऊन आले.. ताटात आंबेमोहर तांदळाचा भात , मोतीचूर चे लाडू , जिलेबी, अजूनही बरेच पदार्थ होते.. श्री महाराज स्वतःशीच बोलले.. “आता इतके खा कि कधीच खाण्यास मिळाले नाही.. सगळ्यांना दाखव अति खाणे काय असते.. असे म्हणून महाराज भोजन करण्यास सुरवात करतात.. त्यांनी ताटातील सर्व अन्न ग्रहण केले.. त्यांनी इतके जेवण केले कि त्यांना तिथेच जोराची उलटी झाली.. हि त्यांची लीला होती.. बोला श्री गजानन महाराज कि जय !

बोध – वरील लीलेत खूपच खोल असा संदेश दडला आहे.. वरील लीलेत इच्छा रामजी यांनी आपली इच्छा महाराजांना सांगितली व इच्छा युक्त भक्ती साठी श्री महाराजांना भोजनाचा आग्रह केला.. त्यांना माहित होते श्री महाराजांचे भोजन झाले आहे तरी आपल्या व्रताच्या पूर्ती साठी महाराजांना भोजनाचा आग्रह धरला.. श्री महारांजानी सुद्धा आपणस बोध प्राप्त व्हावा यासाठी भोजन करण्यास तयार झाले.. त्यांनी केवळ भोजनच केले नाही तर आणलेले सर्व भोजन त्यांनी ग्रहण केले आणि लगेचच उलटी केली.. इथे ते सर्व अन्न पचवू शकत होते पण जाणून बुजून त्यांनी उलटी केली कारण त्यांना सर्वांना दाखवून द्याचे होते कि कुणालाही कोणत्याच गोष्टीचा आग्रह करू नका.. ज्याला जितकी भूख आहे तो तितके अन्न ग्रहण करेल.. त्याला आग्रह करून खाऊ घालूं नका.. इथे इच्छा रामजी सारखे आपले सुद्धा होते.. कुठेही कोणती चांगली खाण्याची वस्तू दिसली कि ती खाण्याचा मोह आपण रोखू शकत नाही मग तेव्हा आपणस भूख असो व नसो आपण अतिरिक्त अन्न ग्रहण करतो.. अश्या प्रकारे आपण आपली शरीरावर अन्याय करतो… असे आपण करू नये हा बोध देण्यासाठी श्री गजानन महाराजांनी हि लीला केली असावी असा बोध मिळतो.. बोला गजानन महाराज कि जय .. !

प्रार्थना – श्री गजानन महाराज आपण तर करुणाघन आहात.. आजच्या लीलेच्या माध्यमातून आपण आम्हाला समज दिलीत कि शरीराला आवश्यक असेल तितकेच अन्न आपण ग्रहण करणे आवश्यक आहे.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.. आम्हाला आमच्या आहारावर नियंत्रण ठेवण्याची समज द्या.. आमच्यातील इच्छा राम वर नियंत्रित करा.. अती सर्व वर्ज्य करण्याची समज आमच्यात दृढ करा.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद


Share
और पढिये !!

क्षमा म्हणजे काय ?

💐 *स्वामी वाणी पुष्प ५७४(पर्व ४ थे भाग ७८)* *आजचे चिंतन-मनन* जया अंगी क्षमा भाव करुणेचा ! ऐसा भक्त सदैव प्रिय स्वामींचा !! म्हणोनि चुकलेल्या माफ करावे ! चूक झाली तर नम्र भावें माफी मागावे !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. क्षमा म्हणजे काय? इंग्रजीत आपण सॉरी...

अतूट श्रद्धा म्हणजे काय?

स्वामी वाणी पुष्प ५७३(पर्व ४ थे भाग ७७)* *आजचे चिंतन-मनन* श्रध्दा अतूट-अभेद्य करा ! स्वामी चरणी भाव धरा ! जन्म सार्थक निश्चित !! www.SwamiVaani.co.in स्वामीं भक्तहो.. जशी आपली श्रद्धा असेल तसे फल आपणस प्राप्त होत असते..आपण म्हणतो आमची स्वामी वर किंवा या या देवावर...

स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ?

प्रश्न- स्वामी सेवा म्हणजे नेमकि कोणती सेवा करायची..‌कारण स्वामी नामाचा जप तर मी करते.. पण त्या व्यतिरिक्त अजुन कोणती सेवा करायची ? चिंतन- स्वामीं भक्तहो..आजचा प्रश्न हा इतका खोल आहे की ज्यावर प्रत्येकाने चिंतन मनन केले पाहिजे..स्वामीं सेवा..खूप सोपी आहे तशीच खूप अवघड...

अतुलना प्रार्थना

हे समर्था..आज पर्यंत मला वाटायचं की...माझेच विचार, मत, तत्व बरोबर आहे..इतरांचे नाही..पण आज तू समज दिलीस की...प्रत्येक गोष्ट ही अनुभव घेण्यापूर्वी छान वाटते..म्हणजेच ती सुद्धा अतुलनीय आहे..ही समज कायम राहू दे..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल...

मधाची मधुरता मधमाश्यांनशिवाय नाही.. श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन 20 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 6 श्री महाराज बंकटलाल यांच्या घरी रहात होते... गावाच्या दक्षिणेस बंकटलाल यांची शेती होती.. श्री महाराज बंकटलाल यांच्या शेतात कणसे खाण्यासाठी गेले.. त्यांच्या बरोबर अजूनही अनेक सेवेकरी होते.. शेतात एक...

श्री रामचरित मानस 4

विक्रम संवत १६३१ मध्ये श्री रामचरित्र मानस कथेला प्रारंभ झाल.. चैत्र मासातील नवमी या तिथीस वार मंगळवार या दिवशी अयोध्येत हे चरित्र प्रकशित झाले... हाच प्रभू श्री रामांचा जन्मदिवस... शरयू नदी आणि अयोध्या नगरी..श्री तुलसीदास महाराज श्री राम कथेस आरंभ करत आहेत... श्री...

आत्महत्या -पाप आहे कि पुण्य आहे

https://youtu.be/QpXKoAqCoUU   आत्महत्या - आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो कि अमुक अमुक व्यक्तींनी आत्महत्या केली.. आपण ऐकतो हळहळ व्यक्त करतो.. जवळची व्यक्ती असेल तर कदाचित आपल्या डोळ्यातही अश्रू येतात..काही दिवसा नंतर आपण सर्व जण विसरून जातो.. आपण अनेकदा हेही ऐकले...

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा

श्री रामचरित मानस ३ महिमा श्री रामचरित्राचा - श्री महादेवांनी हि कथा रचली व सर्वप्रथम ती माता पार्वती यांना सांगितली... श्री शंकरांनी हि कथा काकभुशुंडी ऋषींना दिली कारण ते राम भक्त होते... काकभुशुंडी ऋषींनी याज्ञवल्क्य ऋषींना ऐकवली याज्ञवल्क्य ऋषींनी श्री भारद्वाज...

श्री रामचरित मानस 2 – महिमा राम नामाचा

महिमा राम नामाचा - श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत... सर्वप्रथम राम नामाला वंदन असो... खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे... हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि...