श्री गजानन चरित्र दर्शन 15 – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय 4

Mar 13, 2022 | चरित्र, मराठी, संत गजानन महाराज

Share

शेगांवच्या दक्षिण दिशेला चिंचोली नावाचे गाव आहे. त्या गावात माधव नावाचे एक ब्राम्हण राहत होते. त्यांचे वय साधारण ६० पेक्षा जास्त होते. त्यांनी आपलें संपूर्ण आयुष्य हे संसार म्हणजे सर्वस्व या साठी खर्ची केले होते. आपल्या भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे कुणासच माहित नसते. हीच स्थिती माधव यांची झाली .अचानकपणे त्याच्या आयुष्यात दुःखद घटना घडू लागल्या. अचानकपणे त्यांच्या पत्नीचे व मुलाचे निधन झाले . अचानकपणे घडलेल्या या गोष्टीमुळे त्यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला. ते पूर्णपणे एकाकी झाले. त्यांना एकदमच विरक्ती आली. आता ते देवाचा धावा करू लागले. त्यांच्या ह्रद्यातून प्रार्थना निघू लागल्या. हे परमेश्वरा हि माझी काय अवस्था झाली आहे. मी तर आयुष्यभर संसारच केला.कधी तुझे नाव घेतले नाही. आज तो संसार पूर्णपणे विस्कटला आहे. आता मला कुणीच नाही. आता माझा सांभाळ कोण करणार. हे परमेश्वरा तूच मला तारू शकतोस. अश्या प्रार्थना करता करता. कुणाच्या तरी सांगण्यावरून ते शेगांवी येतात. श्री गजानन महाराजांच्या सानिध्यात आल्या नंतर त्यांनी उपोषण सुरु केले. अन्न पाण्याचा त्याग करून त्यांनी हरी नाम सेवा सुरु केली. श्री गजानन महाराजांनी त्यांना सांगितले बाळा असे करू नकोस.अरे आज जी नाम सेवा करत आहेस ती आयुष्यभर का नाही केली ? ज्या पत्नी व मुलांसाठी तू आयुष्यभर संसार केलास ते तर तुला सोडून गेले. आता तुला परमार्थ आठवत आहे. आपण जे कर्म करतो त्याचे फळ आपणस भोगावेच लागते. महाराज त्याला म्हणाले हट्ट करू नकोस भोजन करून घे. तिथे उपस्थित लोक होते त्यांनी देखील भोजन करण्यासाठी विनंती केली परंतु त्याने कुणाचेच ऐकले नाही. अन्न त्याग करून तो तसाच समर्थांच्या सानिध्यात हरी नाम घेत बसून राहिला. आता रात्रीची वेळ झाली सर्वजण झोपले होते. माधव हि तिथेच झोपला होता. महाराजांनी यम स्वरूपात माधव यांस स्वप्नात दृष्टांत दिला. यमाचे ते महा भयंकर रूप पाहून माधव घाबरले. त्यांना धडकी भरली. छाती धडधडु लागली. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. हे सर्व पाहून समर्थांनी सौम्य रूप धारण केले व माधवास म्हणाले अरे स्वतःला धीट म्हणतोस आणि काळाला घाबरतोस. असाच एक दिवस काळ येईल आणि तुला घेऊन जाईल. तुला त्याचे दर्शन घडवले आहे.महाराजांची हि वाणी ऐकताच.. माधव विनंती पूर्वक महाराजांना म्हणाला. यमलोक नको. तेवढी यात्रा टाळा. वैकुंठ प्राप्ती व्हावी हीच प्रार्थना. माधवाची प्रार्थना ऐकून श्री महाराज हसू लागले व म्हणाले अरे मृत्यू समोर येताच हरी नाम घेत आहेस . जर अजून तुझी जगण्याची इच्छा असेल तर आयुष्य वाढेल. तेव्हा श्री माधव म्हणाले महाराज आता आयुष्य नको इतकीच इच्छा आहे कि उर्वरित आयुष्य आपल्या चरणकमलात जावे व शेवटचा श्वास आपली सेवा करता करता व्हावा. महाराजांनी श्री माधव यांची इच्छा पूर्ण केली व महाराज तथास्तु म्हणाले. अश्या रीतीने श्री माधव यांचे देहावसन श्री महाराजांच्या सानिध्यात झाले.
बोला श्री गजानन महाराज कि जय ! 

बोध – खरंतर वरील लीला हि आपल्या सर्वांच्या डोळयातील अंजन अशी आहे. बोध वर मनन करण्यापूर्वी श्री माधवराव यांना नमन करूया कारण त्यांना माध्यम करून समर्थ आपणस बोध देत आहेत. वरील लीलेत श्री माधवराव हे आयुष्यभर संसारात गर्क होते. संसार करत असताना त्यांना केवळ संसारात लक्ष होते. त्यांच्या मुखात कधीच हरी नाम आले नाही. संसार करता करता त्याच्या वयाची ६० वर्षे गेले. अचानकपणे त्यांच्या संसारात दुःख आले त्यांची पत्नी व मुलगा यांचे निधन झाले. आकस्मिकपणे झालेल्या घटने मुळे त्यांना एकदम संसारातून विरक्ती आली आणि ते हरी नामाकडे वळाले. खरंतर आयुष्य संसारात गेले होते. अचानकपणे हरी नाम घेणे सुद्धा त्यांना जड जात होते. पण काही तरी पुण्याई असावी त्यांना श्री गजानन महाराज भेटले. महाराज भेटले तरी त्याचा अट्टाहास सुरूच होता. कारण श्री महाराजांना ओळखण्याची दृष्टी नव्हती. आपले देखील असेच होते. आपण संसार करत असताना आपल्या मुखात हरी नाम येत नाही. तसेच आपले मन देखील सबब देते कि नाम घेण्यासाठी वेळ नाही. असे करत करत आपल्या संसाराचा गाडा सुरु असतो. काही समस्या आली कि आपण तेवढ्यापुर्ती हरी नाम सेवा करतो. समस्या सुटली कि परत संसारात गर्क होतो. खरंतर आपल्या जीवनात एखादी समस्या व संकट येते ते या साठी असते आपल्याला हरी नामावर स्थिर करण्यासाठी. संकट आपल्याला घडवत असते पण आपले मन नेहमी संकटापासून दूर पळण्याचा प्रयत्न करते. श्री माधवराव यांची पुण्याई होती म्हणून त्यांना वार्धक्यात देखील हरी नाम घेता आले. आणि आपली काहीतरी पुण्याई म्हणून आपणस श्री महाराजांच्या कृपेने त्या लीलेस माध्यम करून श्री महाराज आता पासून हरी नाम घेण्यास सांगत आहेत. श्री माधवराव यांना यम स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नाचे उत्तर श्री महाराजांनी दिले .या यम स्वरूप दर्शनातून महाराज आपणस सांगत आहेत . बाळांनो प्रत्येक क्षणी काळ जवळ येत आहे परंतु आपणस त्याचा विसर पडला आहे. काळ कधी येईल व घेऊन जाईल हे सांगता येणार नाही. काळ येण्याआधी आपणस हरी नामात दंग व्हायचे आहे. म्हणजेच आपल्या ह्रदयातील नामावर स्थिर व्हायचे आहे. या साठी सातत्य हा गुण आवश्यक आहे . श्री माधव राव यमलोक नको तर वैकुंठ हवा आहे असे म्हणत आहेत म्हणजे काय तर प्रत्येक श्वास हा हरी नामात जावा हि प्रार्थना ते करत आहेत म्हणजेच आपणस ते समज देत आहेत कि प्रत्येक श्वास हा हरी नाममय व्हावा !
चला तर मग आपण सर्व जण श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया – हे समर्था तुझी प्रत्येक लीला तर बोधच आहे.. परंतु आमचे मन तिला फक्त लीला वा गोष्ट म्हणून घेते.. आजच्या लीलेस माध्यम करून आम्हाला संसार व अध्यात्म यांची सांगड कशी घालावी याची शिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आमचे मन संकट व दुःख आले तरच तुझे नाम घेते… आमच्या वर कृपा कर व आमच्या मनाला सदैव तुझ्या नामात दंग कर… आमचा प्रत्येक श्वास हा तुझ्या नामाचा दास असावा.. नामरूपी वैकुंठात आम्हाला स्थिर कर… कारण तुझे नामच सत्य आहे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… कोटी कोटी धन्यवाद !!

 


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...