नामस्मरण भक्ति – नवविधा भक्ति – श्री समर्थ रामदास स्वामी

Dec 19, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

नवविधा भक्ती चा तिसरा प्रकार नामस्मरण भक्ति या भक्ती विषयी श्रीमत दासबोध ग्रंथात सांगतात
” स्मरण देवाचे करावें | अखंड नाम जपत जावें | नामस्मरणें पावावें | समाधान | नित्य नेम प्रातः काळी | माध्यानकाळी सायंकाळी | नामस्मरण सर्वकाळी करत जावें |
नामस्मरण भक्ति हि खूपच सुंदर अशी भक्ती आहे… हि भक्ती करण्यासाठी आपल्याला कोणत्याही सामुग्रीची आवश्यकता लागत नाही…उपरोक्त श्लोका द्वारे रामदास स्वामी सांगत आहेत… भगवंताचे स्मरण करावे रोज नित्यनेमाने , प्रातः ककाळी , दुपारी , आणि सायंकाळी नामस्मरण करावे… शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे… ज्या पण कोणत्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या भगवंताचे आपण नामस्मरण भक्ति आपण करू शकतो… जसे आपली भगवान श्री कृष्णावर श्रद्धा असेल तर आपण ” ओम नमो भगवते वासुदेवाय… थोडक्यात आपली ज्या देवावर आपली श्रद्धा असेल त्या देवाचे नामस्मरण रुपी सेवा आपण करावी… अनेकदा आपल्या मनात प्रश्न असतो कि नामस्मरण कधी करावे… याचे उत्तर आपणस समर्थ रामदास स्वामी यांनी आपणस दिले आहे कि रोज ना चुकता भगवंताचे नामस्मरण करावे… सकाळी उठले कि … दुपारी… संध्याकाळी तसेच आपणस जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अखंड नामस्मरण रुपी भक्ती करावी… या साठी कोणतेही बंधन नाहीये कि अमुक अश्या अवस्थेतच जप करावा…हा भगवंताच्या भक्तीचा खूप सुंदर असा मार्ग आहे… ज्याप्रमाणे आपला श्वास अखंड चालू आहे त्या प्रमाणे आपली नाम रुपी सेवा सुरु असली पाहिजे… या मुळे आपणस आपल्या मनास नाम रुपी सेवेची सवय लावायची आहे… सर्वांना नक्कीच विनंती आहे कि रोज किमान १ माळ आपली ज्या कोणत्या देवावर श्रद्धा असेल त्याभगवंताचे नाम सेवा करावी… या मध्ये एक गोष्ट महत्वाची कि अमुक एक मंत्रच श्रेष्ठ अशी शंका मनात आणू नये … प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.

चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था… नाम कधी घ्यावे हि समज तू आज आम्हाला दिलीस…आमचे मन अनेकदा अनेक मंत्राचा जप करते कारण… मनाला असे वाटते कि हा मंत्राचा जप केला तर अमुक फायदा होईल… आणि या कारणाने नामस्मरण भक्ति चा जो खरा फायदा मिळवायचा आहे त्यापासून आम्ही दूर जातो… आमची हीच प्रार्थना आहे कि एक नामावर आम्हाला स्थिर कर… धन्यवाद स्वामी… कोटी कोटी धन्यवाद.. !
जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...