श्री गजानन महाराज लीला दर्शन 5

Nov 28, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

बंकटलाल आणि पितांबर शिंपी हे दोघे गोविंदबुवा यांचे कीर्तन ऐकण्यास गेले होते… आणि त्या तिथे त्यांना श्री गजाजन महाराज यांचे दर्शन झाले.. त्यामुळे ते किर्तन सोडून श्री महाराज यांच्या जवळ येऊन बसले … त्यानंतर त्यांनी महाराजांना विचारले कि तुम्हाला जेवण आणू का ?तेव्हा महाराज त्यांना म्हणाले की तुम्हाला गरज वाटत असेल तर मालिनी यांच्या घरातून झुणका आणि भाकरी घेऊन या असे महाराजांनी सांगितल्यावर पितांबर झुणका भाकर घेऊन आला ती झुणका भाकरी महाराजांनी खाल्ली आणि पितांबरला ते म्हणाले की हा मटका घेऊन जा आणि त्या नदीतून पाणी घेऊन ये.. तर पितांबर त्यांना म्हणाला की महाराज तेथे पाणी खूप कमी आहे आणि त्या पाण्यातून खूप वास येत आहे तुमची परवानगी असेल तर मी दुसऱ्या ठिकाणावरून चांगले म्हणजे शुद्ध पाणी घेऊन येतो त्यावर श्री महाराज म्हणाले की त्या ठिकाणावरूनच पाणी आण आणि पाणी हाताने नको भरू मटक्यानेच पाणी भर त्यानंतर श्री महाराजांची आज्ञा अनुसरून पितांबर  तेथे गेले.. तेथे गेल्यानंतर त्यांनी बघितले की पाणी तर हाथानेच भरण्यासारखे आहे पण महाराजांची आज्ञा होती म्हणून त्या अनुसार त्यांनी मटका पाणी भरण्यासाठी नदी मध्ये बुडवला त्यावेळी चमत्कार झाला मटका तर भरला पण त्या ठिकाणी त्या नदीमध्ये भरपूर पाणी आले आणि ते पाणी पण खूप शुद्ध होते की त्या मध्ये आपला चेहरा दिसेल हे सर्व पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी श्री गजानन महाराजांचा जयजयकार केला बोला श्री गजानन महाराज यांचा जयजयकार असो.

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

बोध

वरील लीलेच्या माध्यमातून आपणास श्री महाराज अनेक बोध देत आहे तसे पहिला गेले तर प्रत्येक लिलेचा  बोध वेगळा असेलच परंतु श्री  महाराज आपल्याला वेगवेगळा बोध देतात येथे श्री महाराज यांना बंकटलाल आणि पितांबर यांनी विचारले की तुमच्या साठी जेवण घेऊन येऊ का ?तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन…  येथे महाराज सांगतात की तुम्ही ज्या देवाची सेवा करतात ती कशासाठी ?तर ती तुमच्यासाठी परंतु आपण म्हणतो की मी देवाची सेवा केली आणि हीच चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून श्री महाराज आपल्याला सांगतात की तुम्हाला गरज असेल तर या घेऊन म्हणजेच देवाची ची सेवा करा श्री महाराज यांनी सांगितले की झुणका भाकरी घेऊन या पहा येथे श्री महाराज आपल्यला सांगतात की भाकरीच्या पिठासारखे मऊ आणि चटणी सारखे कणखर बना तरच आपले जीवन आनंदमय होईल.. येथे पितांबर च्या कृतीतून आपल्याला कळते की गुरूच्या आज्ञेचे पालन कश्या प्रकारे केले पाहिजे मनात कोणत्याही प्रकारे शंका न घेता गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे आणि त्याच श्रद्धेचे फळ म्हणजे त्यांना स्वच्छ म्हणजे शुद्ध पाणी प्राप्त झाले ह्याच्यावर आपण मनन  चिंतन करू या

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||


Share
और पढिये !!

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...

अहंकार

हे समर्था... माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे... माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत...

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!

आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..! श्रावण मासी हर्ष मानसी...आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास...आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले )...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २४ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- जर असशील पैलवान तर मला उठव ( उचल ) शेंगांव मध्ये पाटील घराण्याचे खूप मोठे प्रस्त होते.. पाटलांना दोन मुले होते.. कडताजी आणि कुकाजी.. कडताजी यांना ६ मुले होती तर...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २३ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ गजानन महाराज बंकटलाल ला म्हणत आहेत- मी आता मंदिरात राहणार आहे जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येईल.. ! शेगांव चे पूर्वी नाव होते शिवगाव.. नंतर काळानुरूप त्याचे नाव शेगांव झाले.. महाराज शेगांव मध्ये...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २२ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६ श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे वज्रभूषणा तुझा सदैव जयजकार होईल.. कर्म मार्ग सोडू नकोस मात्र त्यात अडकू नकोस! शिवर गावात वज्रभूषण नावाचा पंडित राहत होता.. त्याला चारही वेदांचे ज्ञान होते.. तो...

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २१ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ६

श्री गजानन महाराज म्हणत आहेत- अरे नरसिंगा तू उत्तम केलेस प्रपंचात राहिलास.. ! शेगावच्या जवळ असणाऱ्या अकोट गावी श्री गजानन महाराज श्री नरसिंग यांची भेट घेण्यासाठी जातात.. श्री नरसिंग यांना श्री महाराज बंधू मानत असा उल्लेख चरित्रात येतो.. असो नक्कीच श्री नरसिंग हे...

हे स्वामीं चे घर आहे…आम्ही स्वामीं च्या घरात राहतो

स्वामीं भक्तहो... अनेकदा आपण ऐकतो की वास्तू दोष आहे.. मग तो दोष घालवण्यासाठी आपण अनेक उपाय योजना करतो..आणि त्या केल्याचं पाहिजेत...पण मग याचाच एक भाग म्हणून आपण जर विचार केला की हा दोष आपण कसा दूर करू शकतो.. दोष कोणताही असो तो दूर होऊ शकतो पण जर आपले विचार बदलत नसतील...