श्री स्वामी समर्थ तारक मंत्र..मनन 4

Nov 13, 2021 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

खरा होई जागा श्रद्धे सहित आपण अनेकदा म्हणतो कि मी स्वामींचा सेवेकरी आहे…असे म्हणत असताना आपल्या मनात श्रद्धा जागृत असते… पण अनेकदा काय होते संकट आले वा काही अडचण आली कि आपण विसरून जातो कि… आपण स्वामींचे सेवेकरी आहोत… कारण आपल्या मनात भीती निर्माण झालेली असते संकटा  विषयी आणि आपल्या अंतर्मनातील श्रद्धे ची जागा भीती नि घेतली असते… त्यामुळे आपल्या मधील श्रद्धा भाव कमी होतो… हि श्रद्धा कमी होऊ नये या साठी आपणस स्वामी नामाची कास धरायची आहे… आणि आपल्या अंतर्मनात श्रद्धा भाव पोहोचवायचा आहे.

कसा होशी त्या विन तू स्वामी भक्त

मनात नाही भाव आणि स्वामी मला पाव… असे कसे होईल… फक्त आपण स्वामी सेवेकरी आहोत असे म्हणून.. आपण स्वामींचे सेवेकरी होणार आहोत का ? नाही त्या साठी आपणस आपल्यातील श्रद्धा हा गुण  वाढवायचा आहे… आता हा गुण  कसा वाढेल… सोपे आहे… रोज एक तरी स्वामी लीला वाचावी… त्यावर स्वतः चिंतन … मनन करावे… रोज किमान ५ मिनिटे स्वामी नाम जप रुपी सेवा करावी.. पहा नककीच आपली श्रद्धा वाढेल… आणि आपल्या अंतर्मनातून आवाज येईल मी स्वामींचा बाळ आहे .. आता  भीतीचे काय कारण .

किती दा दिला बोल त्यानीच हाथ आज पर्यंत आपणस अनेकदा संकट..  दुःख आली… आपणस  त्यातुन कुणी वाचवले… स्वामींनी च वाचवले ना.. मग आज जेव्हा संकट आले आहे तेव्हा आपले मन का बरे विसरले आहे..आपले मन हे विसरल्यामुळे काय होते.. आपणस आपले दुःख मोठे वाटू लागते आणि सर्व मार्ग आपणस बंद दिसतात… या मुळे संकट आले कि सर्वप्रथम मनास सांगा… हे संकट नसून मला शिकण्याची संधी आहे… कारण यातून बाहेर तर मी सहजच पडणार आहे… कारण स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत.. आज पर्यंत त्यांनीच तर मला  हाथ दिला आहे… आणि स्वामींनी एकदा हाथ धरला कि ते सोडत नाहीत.

नको डग मगू स्वामी देतील साथ हे मना तू डगमगू नकोस… कारण आज पर्यंत प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांनी साथ दिली आहे… आपले मन डगमगले कि आपले होणारे काम होत नाही… आणि आपला एक नकारात्मक विचार…आपले यश आपल्या पासून दूर नेऊ शकते… त्यामुळे न डगमगता  संकटांना  सांगा… स्वामी महाराजांची साथ माझ्या सोबत आहे… डगमगू नकोस… भिऊ नकोस.


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...