श्री गजानन महाराज लीला दर्शन 2

Nov 11, 2021 | मराठी, संत गजानन महाराज

Share

 

श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
आपण पहिल्या लीलेत पाहिले कि ब्रम्हांड नायक श्री गजाजन महाराज कचरा कुंडी मध्ये फेकलेल्या उष्ट्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात होते… आता हे दृश्य येणारे जाणारे लोक पाहत होते… परंतु त्यांच्यापाशी जाऊन कोणी त्यांच्याशी बोलले नाही… त्याच वेळेस त्या तिथून श्री बंकटलाल व त्यांचे स्नेही श्री दामोदरपंत कुलकर्णी तिथून जात होते… श्री बंकटलाल अग्रवाल यांनी पहिले कि महाराज कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत उचलून खात आहेत… हे पाहून ते श्री दामोदरपंत कुलकर्णी यांना म्हणाले कि आपणस दिसताना हे सर्वसामान्य व्यक्ती वाटत आहेत परंतु नक्कीच हे सामान्य व्यक्ती नसावेत कारण जर हे सामान्य व्यक्ती असते तर त्यांनी अन्न मागून खाल्ले असते आणि श्री पातुरकर यांनी सुद्धा त्यांना जेवण दिले असते… हे नक्कीच कुणीतरी मोठे संत असावेत… त्यानंतर श्री बंकटलाल श्री महाराजान जवळ गेले… आणि विनयपूर्वक श्री महाराजांना विचारले कि ” महाराज आपण हे काय करत आहात ? आपणस भूख लागली आहे का ? मी आपल्या साठी भोजन घेऊन येऊ का ? श्री महारांजानी त्यांच्याकडे पहिले… त्यांची तेजः पुंजः मुद्रा पाहून श्री बंकटलाल यांना काय बोलावे हे सुचलेच नाही व ते लगेचच श्री पातुरकर यांच्या कडे गेले व त्यांच्या कडून भोजनाचे ताट घेऊन आले… त्यात विविध पदार्थ होते.. सर्वांनी श्री महाराजांना भोजन करण्याची विनंती केली… महाराजांनी ताटातील सर्व पदार्थ एकत्र केले व भोजन केले… हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले… आणि त्याच वेळी श्री श्री बंकटलाल म्हणत आहेत आपले शेगांव धन्य आहे… ब्रम्हांड नायक योगीराज शेगांव मध्ये आले आहेत .
| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध -वरील लीलेच्या माध्यमातून आपणस अनेक बोध प्राप्त होत आहेत… ब्रम्हांड नायकाची प्रत्येक लीला आपणस शिकवण देण्यासाठीच असते… परंतु ती समजण्यासाठी श्री बंकटलाल अग्रवाल यांच्या सारखी भक्ती असावी लागते… पहा ना वरील लीलेत असंख्य लोक त्या रस्त्यावरून गेले… परंतु प्रत्येकाने हाच विचार केला कि कुणीतरी सामान्य व्यक्ती आहे… भूख लागली असेल त्या कारणाने… कचरा कुंडीत टाकलेल्या पत्रावळी वरील भाताचे शीत खात असतील… त्याच रस्त्याने श्री बंकटलाल अग्रवाल त्यांच्या स्नेह्या सोबत जात असताना त्यांनी पाहता क्षणी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती नसावेत… पहा त्यांची चेतनेची अवस्था कि उच्च होती… तत्यांची लीला पाहूनच त्यांनी ओळखले कि हे कुणी सामान्य व्यक्ती असू शकत नाहीत… श्री महाराज यांनी सर्व पदार्थ एकत्र केले व त्या नंतर भोजन केले… थोडक्यात बंकटलाल यांच्या मनात जे प्रश्न निर्माण होत होते.. त्या प्रश्नाचे श्री महाराजांनी काही न बोलता उत्तर दिले… खरोखर श्री बंकटलाल यांची भक्ती ची अवस्था किती उच्च्तम असेल कि त्यांनी श्री महाराजांची लीला पाहूनच समजून गेले कि … हे कुणी सामान्य व्यक्ती असूच शकत नाहीत… आपणस श्री महाराज हा सुद्धा बोध देत आहेत कि.. अनेकदा काय होते कि आपणस अनेक पदार्थ आवडत नसतात त्यामुळे आपण ते खात नाहीत… परंतु श्री महाराज आपणस सांगत आहेत कि कोणत्याही पदार्थाचा स्वाद हा जीभेपर्यंत मर्यादित असतो… अन्न हे आपल्या शरीराची गरज आहे… त्याचे मुख्य काम आपल्या पोटाची तृष्णा शांत करणे … आणि आपणस शक्ती… स्फूर्ति देणे आहे… स्वाद घेणे हे उद्दिष्ट नाही…. त्या मुळे आपणस सर्व अन्न पदार्थांचे सेवन देवाचा प्रसाद म्हणून करायचे आहे …आणि हाच गोष्ट आपल्याला आपल्या मुलांना शिकवायची आहे … !

| अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||

चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया… श्री गजानन महाराज.. आम्ही आपली लीला समजण्यास असमर्थ आहोत… आमच्या चेतनेची पायरी( समज) फारच कमी आहे… परंतु तुमची कृपा असेल तर नक्कीच ती वाढेल … आम्ही आपणास प्रार्थना करतो कि जशी कृपा श्री बंकटलाल अग्रवाल यांच्यावर केलीत.. त्या पात्रतेचे आम्हाला बनव… ! धन्यवाद आई… धन्यवाद हि प्रार्थना करवून घेतल्या बद्दल धन्यवाद!


Share
और पढिये !!

श्री शिवमहापुराण १

श्री शिवमहापुराण १ - आज आपण प्रत्येक जण ऐकतो कि शिव महा पुराण श्रवण केले पाहिजे पण काळा नुसार आपणास ते शक्य होत नाही. पण मग आपण एक छोटासा पर्यन्त करत आहोत.. थोडक्यात कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करूया.. यात सर्व काही येईल असे नाही पण आपली भक्ती नक्कीच वाढेल अशी...

अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! संदर्भ स्वामी वाणी ३

कृष्णाप्पा हा चोळाप्पाचा मुलगा होता..त्यास महामारी रोग होऊन त्याचा मृत्यू झाला..तेव्हा घरातील सर्व मंडळी आक्रोशाने रडू लागली..तितक्यात स्वामी महाराज तेथे आले आणि बोलले “रडू नका ह्याचे लग्न व्हायचे आहे अजून .. अरे नीलकंठा..उठ उठ !! आमच्या बरोबर दोन शब्द बोल!! “ आणि...

अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल ! संदर्भ स्वामी वाणी २

स्वामी भक्त हो...स्वामी सेवा करत असताना..आपल्याला मनात अनेक प्रश्न असतात...मी स्वामी सेवा करतो..मग स्वामी मलाच कृपा करतील..समोरची व्यक्ती इतर कोणती उपासना करत असेल तर कृपा होणार नाही..पण स्वामी परब्रम्ह आहे...त्याच्या साठी सर्वच समान...पहा स्वामी प्रथम अक्कलकोट मध्ये...

“ अरे ,भितोस कशाला ,तुझे भाग्य उजळले, तुझी इच्छा पूर्ण होई पर्यंत हवे तितके घे !! ” संदर्भ स्वामी वाणी भाग १

स्वामी भक्ती हो जेव्हाही आपल्या जीवनात संकट येते तेव्हा आपणस असे वाटते कि माझ्या जीवनात इतके संकट का किंवा आपण हताश होतो.. पण खरंतर जेव्हा आपल्या जीवनात संकट येते तेव्हा स्वामी आपल्याला काहीं तरी चांगले देणार असतात.. पण आपले मन मात्र नेहमी नकारात्मक विचार करते आणि जे...