प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ?

प्रार्थना – प्रार्थना म्हणजे काय ? खरंतर आपण लहान पणा पासून प्रार्थना करत आलो आहोत..  तरी देखील आज यावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे.. कारण अनेकदा आपण प्रार्थना करतो तरी देखील आपण पहातो कि काही प्रार्थना पुर्ण होतात काही होत नाही असे का ? खरंतर आपण प्रार्थना काय करतो यावर सर्व अवलंबुन आहे.. सर्वप्रथम प्रार्थना म्हणजे काय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.. प्रार्थना म्हणजे सृष्टीतील प्रत्येकांच्या हितावह सृष्टीला घातलेले शाब्दिक… मानसिक… वैचारिक.. हृदयातून घातलेली साद म्हणजे प्रार्थना.. पहा खूप खोल असा अर्थ आहे..आपण म्हणाल असे कसे पहा आपण लहानपणी प्रार्थना करण्यास शिकलो.. दिवे लावताना आपणस प्रार्थना शिकवली ती आठवूया.. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते । दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार । दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥ दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी । माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥ ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे । तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात । घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो । घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥ दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन । दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥ अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति । इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम्‌ । मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: । अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥ हि प्रार्थना आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत.. यावर जर चिंतन मनन आपण केले तर आपणस जाणवेल कि प्रार्थना हि सृष्टीतील सृष्टीला प्रत्येकासाठी असते.. व्यक्तिगत नसते.. कसे पाहूया.. सर्वांचे कल्याण कर.. आरोग्य मिळू दे.. कुणाविषयी मनात वाईट विचार येऊ नयेत…आपण नमस्कार कुणाला करतो जो अंधार दूर करतो अश्या दिव्याला.. आपण दिवा तुळशीपाशी लावला आहे पण उजेड संपूर्ण घरात पसरला आहे.. म्हणजेच आपण प्रार्थना करत आहोत याचा परिणाम सर्व सृष्टीवर होत आहे..आपण यात घरातील वडील धाऱ्या माणसांना उदंड आयुष्य लाभो या साठी प्रार्थना करतो म्हणजे यात व्यक्तिगत स्वार्थ आहे का नाही… कारण घरचा धनी म्हणजे फक्त आपल्या घरातील व्यक्ती असा मर्यादित अर्थ नसून सर्वसामावेशक असा अर्थ आहे .. पहा तो कसा आपले कुटूंब प्रार्थना करते तेव्हा आपण अर्थ घेतो घरातील कर्ता म्हणजे जी कमावती व्यक्ती आहे तिच्या साठी.. जेव्हा कमवणारी व्यक्ती प्रार्थना करते तेव्हा अर्थ होतो तो समजा नोकरी करत असेल तर त्याचा धनी म्हणजे कंपनीचा मालक.. मालक प्रार्थना करत असेल तर त्याचा धनी आहेत त्याचे ग्राहक.. म्हणजेच हि एक साखळी आहे.. आपण प्रार्थना करताना जितकी ती सर्व समावेशक करू तितका अधिक चांगला व लवकर परिणाम आपणस प्राप्त होतो.. म्हणून नेहमी प्रार्थना करताना सर्वांसाठी करूया.. म्हणजेच संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करूया.. नक्कीच आपणस प्रार्थनेचा अर्थ समजला असेलच त्यावर कार्य करून आजपासून सर्वहितकारी प्रार्थना करूयात … !

चला आपण प्रार्थनेसाठी समर्थाला प्रार्थना करूया.. हे समर्था आज तू आम्हाला प्रार्थना म्हणजे काय हि समज दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. नेहमी आमच्याकडून संपूर्ण सृष्टीसाठी हितकारीच प्रार्थना करून घे… प्रत्येक प्रार्थनेत व्यक्तिगत हिताचा नाहीतर.. संपूर्ण सृष्टीच्या हिताच्या प्रार्थना ह्रद्यातून प्रगट कर.. कारण तीच प्रार्थना तू पूर्ण करतो जी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाची असते ..हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद

वेळ

भगवंताने सर्वांना एक गोष्ट सारखीच दिली आहे ती म्हणजे दिवसाचे २४ तास त्यामुळे आपण असे कधीच म्हणू शकत नाही कि माझ्या कडे वेळ नाही.

वॉरन बफे म्हणतात – श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात गरीब लोक पैशाची गुंतवणूक करतात

मायकल आल्थसूलर – वेळ उडतो आपण त्याचे पायलट आहोत

प्रत्येक क्षण असा जगू जणू तो आपल्या जीवनाचा शेवटचा क्षण आहे

www.chetnakeswar.com

राखी पौर्णिमा

राखी पौणिमा म्हणजे नात्याला घट्ट करण्याचा उत्सव..आपण वयाने मोठे झालो की काही कारणास्तव या नात्यात दुरावा येतो..या मागे कारण असते वडिलोपार्जित संपत्ती..जी खरं तर नात्यात दुरावा निर्माण करते..खरंतर या साठी कष्ट करणारा मरून जातो..आणि मेल्यावर विचार करतो यासाठीच केले होते का हे सर्व..नक्कीच तो मुक्त होईल का जर त्याच्या पोटी जन्म घेणारे भाऊ बहीण माझ्या संपत्ती साठी भांडत आहेत.. खरंच यासाठीच मी कष्ट केले का ? कुठेतरी माझे संस्कार कमी पडले का? अरे बाळांनो भांडू नका रे..माझ्यासाठी तुम्ही दोघेही समानच आहात.. चूक कुणाची हे माझ्यासाठी महत्वाचे नाही…कारण मी तुम्हाला सांभाळताना दुजाभाव केला नाही..पण माझ्या संपत्ती साठी तुम्ही भांडता..थोडीशी जरी तुम्हाला माझा आदर असेल..मला मुक्ती मिळावी असे वाटत असेल तर कृपा करून भांडू नका रे..मी तरच मुक्त होईल जर तुम्ही न भांडता राहिलात..नाही ना रे बाळांनो भांडणार..हीच मला श्रद्धांजली असेल..चला या राखी पौर्णिमेस आपले नाते दृढ करूया…!

आपण स्व आदर करतो का

आपण स्वतः ला काय समजतो – खरंतर हा प्रश्न आज पर्यंत आपण आपल्या स्वतःला विचारला आहे का ? विचारला असेल तर आपले आपल्या स्वतः बद्दल मत काय आहे? आपण स्वतः स्वतःचा आदर करता का ? याचे उत्तर काहींचे हो असेल काहींचे नाही असे असेल.. खरंतर जो पर्यंत आपण स्वतः आपला आदर करत नाही तो पर्यंत आपणस इतरांकडून आदराची अपेक्षा करण्याचा काहीच अधिकार नाही.. मी जसा आहे तसा मी माझ्या स्वतःचा स्वीकार करतो का ? अनेकदा आपण स्वतःच आपल्या स्वतःचा स्वीकार करत नाही.. आपण स्वतःला आरश्यात पहा.. किती सुंदर असा देह भगवंताने आपणस दिला आहे.. अनेक जण म्हणतात कि मी दिसायला सुंदर नाही वा माझे शरीर असेच आहे.. खरंतर भगवंतांना आपणस इतके सुंदर असे शरीर दिले आहे त्याचा आपणच आदर करत नाही.. आपणस जे शरीर मिळाले आहे त्या बद्दल भगवंताला धन्यवाद व जे शरीर मिळाले आहे त्याची योग्य ती काळजी आपण घेणे आवश्यक आहे.. पहा भगवंताने आपणस निरोगी शरीर दिले आहे म्हणजेच आपण किती भाग्यवान आहोंत.. हा आता त्याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे.. हे झाले आपल्या शरीरा बाबत..आता एखाद्याला शुगर चा त्रास अचानक सुरु होतो.. असा काही त्रास झाला कि इतरांचे ऐकून वा आपल्या मनातील चुकीच्या समजुति मुळे आपण आपल्या स्वतःला दोष देतो वा आपल्या नशिबाला दोष देतो.. म्हणजेच आपण आपला आदर करत नाही.. अहो खरंतर आपणस शुगर चा त्रास झाला म्हणजेच आपण किती गोड आहात.. अश्यावेळी शुगर शुगर करत न बसता आपण योग्य उपचार घेऊन शुगर कंट्रोल करू शकता या कडे लक्ष द्या… म्हणजेच कोणत्याही कारणास्तव स्वतःचा आदर करणे बंद करू नका.. कारण स्वतःचा आदर हा आत्मविश्वासाचा प्रथम पायाआहे.. चला तर सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःचा आदर करूया .. धन्यवाद !!