महिमा राम नामाचा – श्री रामचरित मानस मध्ये संत श्रेष्ठ तुलसी दासजी महाराज राम नामाचा महिमा वर्णन करत आहेत… सर्वप्रथम राम नामाला वंदन असो… खरंतर राम नामाचा महिमा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे… हा महामंत्र आहे.. इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि ती हि कि भगवंताचे प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे.. नाही तर काय होते आपण तुलना करत बसतो… पहा श्री वाल्मिकी ऋषींनी राम नाम उलटे घेतले म्हणजे त्यांनी राम.. राम जप करण्याऐवजी.. मरा.. मरा असा जप केला तरीहि नाम जपाच्या प्रभावाने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले हे आपण सर्व जाणताच.. राम नाम जपाने आपल्यात भक्ती जागृत होते.. याचा जप करणे खूप सोपे असे आहे.. कुठेही आपण जप करू शकतो.. याला काळ ,वेळ, स्थळ याचे बंधन नाही.. नाम जपा मुळे इहलोकी तर कल्याण होतेच पण त्याच प्रमाणे परलोकतही आपले कल्याण होते.. जीव आणि ब्रम्ह यांची अनुभूती घेण्याचा मार्ग म्हणजे नाम सेवा… आपली जीभ जशी चांगली चव हवी असते तसेच एकदा आपल्या जिभेला राम नामाची चव लागली कि मग इतर कोणत्याच चवीची अपेक्षा राहत नाही… तुलसी दास महाराज म्हणतात राम नामाची दोन्ही अक्षरे हि अत्यंत श्रेष्ठ अशीच आहेत..आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो कि राम नाम व प्रभू श्री राम हे एकच आहेत कि वेगळे आहेत ? याचे उत्तर आहे ते एकच आहेत.. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो कि मग नामच का घ्यावे… याचे उत्तर देताना तुलसी दास महाराज म्हणतात पहा एखादा सेवक असतो तो आपल्या स्वामींच्या मागेच असतो तसाच जिथे नाम तिथे श्री राम… थोडक्यात भगवंत हे नामाच्या आधीन असतात.. पहा आपणास कोणत्याही वस्तूचे स्वरूप समजण्यासाठी तिचे नाव माहित असणे आवश्यक आहे त्याशिवाय आपण तिला ओळखू शकत नाही तसेच राम नामाशिवाय आपण रामाला ओळखू शकत नाही… सगुण असो वा निर्गुण असो स्वरूप समजण्यासाठी नामच मार्ग आहे… तुलसीदास महाराज म्हणतात जर आपणस आंतर्बाह्य प्रकाश हवा असेल तर आपणस आपल्या मुखात कायम राम नामाचा वास असणे आवश्यक आहे… नामाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते… वेद सुद्धा नामाचा महिमा गातात.. कलियुगात ईश्वर सेवेचा सर्वात सुलभ सोप्पा मार्ग म्हणजे नाम सेवा… नाम म्हणजे सर्व काही… नाम हे सर्वव्यापक आहे.. भगवंताचा निवास आपल्या हृदयात आहे.. त्याचे दर्शन हे नाम जप सेवेने सुलभ होते.. राम नाम हे रामपेक्षा हि मोठे आहे… नामाने आपला उद्धार होतो… आपले आचार विचार यांत बदल होतो… आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग नाम रुपी सेवा… आपल्या मनास पवित्र करण्याचे साधन राम नाम… सेतू बांधताना राम नाम रूपीच सेतू बांधावा लागला व तो तयार झाला हे आपण सर्वच जांणतोच म्हणजेच यशाचा सेतू म्हणजे राम नाम… थोडक्यात निर्गुण निराकाच्याही पलीकडे जे काही आहे ते राम नाम थोडक्यात श्री रामांना जाण्याचं असेल तर राम नामाशिवाय ते शक्य नाही म्हणून आपणस राम नाम घ्यायचे आहे.. !
बोध – वरील नाम महिमा यावर आपण चिंतन मनन केले तर आपणस नक्कीच हा बोध होतो कि… सर्वांत सुंदर.. सोपी ईश्वर सेवेचा मार्ग म्हणजे नाम जप रुपी सेवा.. हि सेवा आपण जितकी अधिकाधिक करू तसे आपल्यातील वृत्ती, विषय , विकार नाश होतील.. नक्कीच आपणस त्यावर चिंतन मनन करून आपल्यातील जे दोष दिसत आहेत.. ते हळू हळू करून नष्ट करायचे आहेत… या साठी आपणस नाम रुपी सेवा मदत करणार आहे.. फक्त यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपणस सेवेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.. चला तर आज पासून नाम रुपी सेवेस सुरवात करूया
१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास
आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना वंदन करत आहेत.. ते म्हणत आहेत प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करताना जो आनंद होत तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.. यात मला जो आनंद प्राप्त होत आहे त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही… श्री गणपती बाप्पा मला या कार्यात यश द्या.. भगवान श्री नारायण यांचा निवास माझ्या ह्रदयात आहे.. भगवान श्री शंकराची माझ्यावर कृपा आहे.. सद्गुरूच्या चरणी वंदन करत आहे.. ज्याच्या हृदयात गुरूंचा वास आहे त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो.. हा अंधार नाहीसा झाल्याशिवाय सत्याचे दर्शन होऊ शकत नाही..ब्राम्हणांच्या चरणी वंदन असो.. संत हे स्वतः दुःख सहन करतात परंतु समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात.. म्हणूनच संत हे वंदनीय आहेत.. संत म्हणजे चालते बोलते तीर्थ क्षेत्रच… जो मनुष्य संतांच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते.. याचा फायदा काय तर कावळे देखील कोकिळे प्रमाणे बनतात.. कारण सत्संगाचा महिमाच असा आहे.. स्व उद्धार करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.. सत्संगती ने जसे परीस मुळे लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे आपल्यातील अवगुणांचा ऱ्हास होतो.. आपला उद्धार होतो.. संतांचा महिमा वर्णन करताना सर्वांचीच मती कुंठित होते.. ज्याचा कोणी मित्र नाही , शत्रू नाही.. कुना बाबत मनात किंतु परंतु नाही अश्या संतांच्या चरणी वंदन असो.. संत हे जगाचे हित करण्यासाठी झटत असतात.. अश्या संतांना मी प्रार्थना करतो कि श्री रामचे चरित वर्णन करण्याची शक्ती मला द्या… भक्ती द्या..दुष्ट प्रवृतीना सुद्धा मी वंदन करतो.. त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा दुष्टमधील दुष्ट पणा खरे तर स्वतःचे नुकसानच करतो जसे गारा पडल्याने नुकसान होते पण त्या गारा सुद्धा नंतर स्वतः नष्ट होतात त्या प्रमाणे आपल्यातील दुष्ट पणा आपला नाश अधिक करतो.. संत आणि दुष्ट दोघाच्या चरणी वंदन आहे.. दोघेही लोकांना दुःख देतात.. दुष्ट आपल्या वाईट कर्माने तर संत त्यांच्या वियोगाने लोकांना दुःख देतात.. आपण सर्वानी जे चांगले आहे ते सर्व घ्यावे… आपणास कसा संग मिळतो त्या प्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून आपण नेहमी सत्संगाची कास धारावी …सर्वांमधील चैतन्याला वंदन असो.. सर्व जीवांना वंदन असो.. प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र अगाध आहे ते वर्णन करण्याची बुद्धी मला प्राप्त होवो.. ज्याप्रमाणे लहान बाळाचे बोल हे आई वडील समजून घेतात तसेच आपण हि माझी वाणी समजून घ्यावी.. हि कथा ऐकून सर्वजण सुखी होतील यात काही शंकां नाही.. मनात कोणतेही तर्क वितर्क ना लावता हि कथा श्रवण करावी तरच ती समजू शकेल.. कोणत्याही गोष्टीला राम नामाशिवाय शोभा नाही.. या मध्ये नेमके काय आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर यात प्रभू श्री रामाचा प्रताप .. महिमा आहे .. प्रभू श्री रामाची कथा हि कल्याण करणारी अशी आहे.. गाईचे दूध हे जसे पोषक असे असते मग ते काळ्या गाईचे असो वा इतर कोणत्याही तसेच प्रभू श्री रामचंद्रांची कथा हे सर्वांना प्रेरणा देणारी अशी आहे.. प्रभू श्री रामाचे चरित्र हे गुणांची खान आहे परंतु ती फक्त इतरांना सांगण्यासाठी आहे का तर नाही ती आपल्या जीवनांत आचारणात आणण्यासाठी आहे.. मी काही कवी नाही नाही वा लेखक हि नाही तरी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे… कारण शास्त्रा नुसार आपण जाणताच भजनाचा महिमा किती अगाध आहे… मग प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र वर्णन करण्याचा मोह मी कसा सोडू… भगवंत एकच आहे.. ज्याला आपण निराकार निर्गुण म्हणत असतो तो वेळोवेळी मनुष्य शरीर धारण करत असतो.. उद्दिष्ट असते जगत कल्याण.. अश्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून प्रभू श्री रामाची कथा आरंभ करत आहे… सुरुवातीला हि कथा व्यास वाल्मिकी यांनी सांगितली आहे… त्यावरच मी वर्णन करत आहे… ज्या सर्व कवींनी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे त्या सर्वांनां वंदन करत आहे… आपण सर्वानी माझ्यावर कृपा करावी.. ज्या वाल्मिक ऋषींनी हि रचना केली त्यांच्या चरण कमलानं वंदन असो.. चारही वेदांना वंदन असो… ब्रम्ह देवांच्या चरणी वंदन असो… श्री गंगा मातेच्या चरणी वंदन असो… श्री शंकर पार्वती… माझे माता पिता यांच्या चरणी वंदन असो… आयोध्या पुरीला वंदन असो.. शरयू नदीला वंदन असो… पर्व दिशेला वंदन असो राजा दशरथ व त्यांच्या राण्यांना वंदन असो… राजा जनकाला हि वंदन असो… राजा भरताच्या चरणी वंदन असो… लक्ष्मणाच्या चरणी वंदन असो… कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण यांना वंदन असो.. हनुमानाच्या चरणी देखील वंदनवानरांचे राजा सुग्रीव , अस्वलांचे राजे जांबवान राक्षस राजे बिभीषण आणि अंगद यांच्या चरणी वंदन… सर्व प्रभू श्री रामाचे उपासक सेवक सर्वांच्या चरणी वंदन.. शुकदेव , सनकादि , नारदमुनी या सर्वांनां वंदन आपण कृपा करा… जानकीमातेच्या चरणी वंदन… श्री सीता रामचंद्रच्या चरणी वंदन .
अश्या प्रकारे तुलसीदासांच्या मंगलाचरण केले आहे.. धन्यवाद तुलसीदास महाराज आपण आम्हाला हे मंगलचरण समजण्याची बुद्धी दिलीत.. असेच आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र समजण्याची बुद्धी द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना
देवी भगवतीला प्रार्थना –
हे देवी भगवती.. राजा सुरथ आणि समाधी यांना निमित्त करून तू आम्हाला आमच्यातील मोह, लोभ, मायेचे दर्शन करून दिलेस त्याबद्दल धन्यवाद मधू आणि कैटभ ज्या प्रमाणे बलवान होते त्याप्रमाणे आमच्यातील हे लोभ , मोह , माया हे विकार आमच्यात खोलवर रुजले आहेत.. त्याच्याशी युद्ध करणे खूपच कठीण असे कार्य आमच्यासाठी आहे.. हे विकार दूर करण्यासाठी आम्हाला मदत कर.. कारण तुझ्या चरित्राची प्रत्येक कथा आमच्यातील दोषांवर कार्य करण्यासाठीच तर आहे.. आम्हाला मदत कर.. या नऊ दिवसात आमच्यातील लोभ , मोह ,माया दूर कर.. आमच्यातील मधू कैटभाचा नाश कर आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती आमच्याकडून करून घे.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद.. !
www.chetanakeswar.com
ध्यान म्हणजे काय?
ध्यान..ध्यान म्हणजे काय? खरंच ध्यान म्हणजे काय..आपण अनेकदा ऐकतो ध्यान केले पाहिजे..पण ध्यान म्हणजे काय..आपण याचे अनेक फायदे ऐकतो..मग आपणासही वाटते ध्यान करावे..मग प्रत्येक जण म्हणतो की अमुक अमुक ध्यानाची पद्धती श्रेष्ठ आहे..आणि मग ध्यान ध्यान न राहता एक तांत्रिक पद्धत बनते..खरंतर ध्यान म्हणजे सृष्टीची अशी व्यवस्था ज्यात आपण..आपल्या स्व अवस्थेवर जाण्यासाठी केलेला प्रयत्न..म्हणजेच काय ज्या अवस्थेत आपण आपल्या स्वतःशी संवाद साधू शकतो अशी पद्धती म्हणजे ध्यान..असो..जशी व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगळी वेगळी पद्धती असणार..आणि ती चुकीची असू शकत नाही..म्हणून सर्वप्रथम आपणस अमुक एक पद्धतीच योग्य असा जर आपल्या मनात असेल तर आपणस सर्वप्रथम काढून टाकायचा आहे..कारण ध्यानाची सुरवातच विना अट होते..
ध्यानात सुरवातच मुळात मनावर होते..आपण ध्यान करण्यास सुरुवात करतो..आपले मन पहिल्या दिवशी विरोध करत नाही..पण एक दोन दिवसात आपणस नको नको वाटते..आपले मन आज नको उद्या करू असा प्रतिसाद देते..म्हणुन सर्वप्रथम आपणस मन नाही म्हंटले तरी ध्यान करण्यासाठी बसायचे आहे..ध्यान करण्यास बसले की मनात विचारांचा काहूर सुरू होईल..जसे विचार येतील तसे जातील ही..पण आपले काय होते..मी आज ध्यान केले म्हणजे लगेचच माझे मन निर्विचार झाले पाहिजे..खरंतर असे एका दिवसात होऊ शकत नाही..या साठी अनेक वर्षे आपणस दयावे लागतील..काही जण ध्यान या मुळे करत नाहीत कारण मनातील विचार थांबत नाहीत..खरंतर आपण कधीच निर्विचार होणार नाही मग आपण कधीच ध्यान करणार नाही का..सर्वप्रथम हा विचार मनातून काढून टाका की..ध्यान करताना विचारच मनात आले नाही पाहिजे..जसे विचार येतील तसे ते निघूनही जातात..फक्त गरज आहे आपण बसण्याची..आता मनात प्रश्न येतो की ध्यान किती वेळ करावे.. दिवसातील किमान २० मिनिटे आपण ध्यान करावे…सुरवातीला ही वेळ खूप मोठी वाटेल..पण सराव केल्यानंतर ही वेळ फार कमी वाटेल..म्हणून आज पासून किमान २० मिनिटे स्वतः साठी देऊया…ध्यान करताना अनेकांच्या मनात प्रश्न असतो की कुठे बसून ध्यान करावे.. कसे बसावे..खरंतर ज्या ठिकाणी २० मिनिट आपण बसू शकतो..ज्या आसनात आपणस त्रास होत नाही..अश्या ठिकाणी..आसनात बसून ध्यान करावे…मग खुर्चीवर बसूनही आपण ध्यान करू शकतो…
आता ध्यान कोणते करावा हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो..खरंतर वर सांगितल्याप्रमाणे आपणस जे योग्य वाटेल..त्या पासून सुरवात करा..सुरवात महत्वाची..इथे पद्धती सांगत आहोंत..
१)श्वासावर ध्यान- यात आपण केवळ आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो..म्हणजे आपणस डोळे मिटून बसायचे.. मोबाईल।मध्ये २० मिनिटांचा टाईमर लावा.. हळूहळू डोळे बंद करा..आपले लक्ष श्वासावर केंद्रित करा..आपणस लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे..अनेकदा आपले लक्ष विचलित होते..परत आपणस त्याला श्वासावर केंद्रित करायचे आहे..ही पद्धत आपण वापरू शकता..!
2) दुसरी पद्धत प्रत्येकाची कोणत्या तरी देवावर श्रद्धा..विश्वास असतो..आपण त्या देवतेचा मंत्राचा जप करत असतो..जसे श्री स्वामी समर्थ..इथे आपणस आपल्या इष्ट देवतेचा मंत्र जप श्वासावर करायचा आहे..इथे जप।मोजायचा नाही..फक्त प्रत्येक श्वासावर जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे..प्रत्येक नामावर आपणस अधिकाधिक नामावर ध्यान करायचे आहे…ही खूपच छान अशी ध्यानाची पद्धती आहे..!
आपण आपणस जी योग्य वाटेल.. ती पद्धत आपण निवडू शकता..गरज आहे फक्त ध्याना साठी बसण्याची.. बाकी सर्व समर्थ करून घेतात..!
चला आपण समर्थांना ध्यानासाठी प्रार्थना करूया…!
हे समर्था..आज ध्यानवर चिंतन.. मनन करून घेतले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..ह्रदयात तुझा वास आहेस..परंतु दिसत नाहीस..त्या दर्शनासाठीचं तर ध्यानाची सुविधा तू निर्माण करून दिली आहेस..माझ्या मनाला ध्यानासाठी तयार कर..आम्हाला ध्यानावर स्थिर कर…आमचा प्रत्येक श्वास स्वामीमय बनव..ही समज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!
जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !
श्री गजानन महाराज म्हणत आहेत… जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… !
लीला -श्री गजानन महाराज बंकटलाल यांच्या घरी शेगांव येथेच रहात होते.. ते काशी चे गोसावी होते.. त्यांनी श्री गजानन महाराज यांची महिमा ऐकून एक व्रत घेण्याचा निर्णय घेतला.. त्यांनी असे व्रत घेतले कि जर माझे अमुक अमुक काम झाले तर अमुक अमुक वस्तू श्री महाराजांना अर्पण करेल.. त्यांनी अमुक अशी वस्तू अर्पण करण्याचा निर्णय या साठी घेतला होता या मागे कारण असे होते कि ती वस्तू त्यांना फार आवडत होती.. काही दिवसातच त्यांचे काम झाले.. आता व्रताची पूर्ती करण्याचा दिवस आला त्यासाठी शेगांव मध्ये आले… आल्या नंतर त्यांनी पाहिले कि श्री महाराजांच्या दर्शनासाठी तर फारच गर्दी आहे.. त्यांनी विचार केला कि इतक्या गर्दीत माझे दर्शन कसे होणार… आणि इतक्या गर्दीत दर्शन झाले तरी मी जी वस्तू अर्पण करणार आहे ती इतक्या गर्दीत कशी अर्पण करणार.. कारण हि वस्तू पाहूनच लोक मला मारण्यास देखील कमी करणार नाहीत.. त्याच्या मनात हे विचार सुरु होते… त्याच वेळी श्री महाराजांना त्याच्या मनातील विचार समजले.. श्री महाराजांनी तिथे असणाऱ्या एका भक्ताला श्री गोसावी यांना बोलवण्यास सांगितले.. श्री गोसावी नम्रता पूर्वक श्री महाराजांच्या समोर हाथ जोडून उभे राहिले.. तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणतात.. तू आणलेली भेट आम्हाला दे.. जी तीन महिण्यापासून तुझ्या पिशवीत आहे.. श्री महाराजांची हि वाणी ऐकून तो अचंबित झाला… त्याच प्रमाणे श्री महाराज त्यांना म्हणाले ” जेव्हा व्रत घेतले तेव्हा विचार नाही केला.. आता व्रताच्या पूर्तीची वेळ आली तेव्हा का विचार करत आहेस… ! अश्या पद्धतीने योग्य समज देऊन श्री महाराजांनी श्री गोसावी यांच्या व्रताची पूर्ती करून घेतली.. बोला श्री गजानन महाराज कि जय … !
बोला – अनंत कोटी ब्रम्हाण्ड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चितानंद
भक्त प्रतिपालक शेगाँव निवासी समर्थ सदगुरु श्री संत गजानन महाराज की जय ||
बोध – वरील लीला तर आपल्या साठी ज्ञानाचा भंडार आहे.. श्री गोसावी यांना समस्या होती ती समस्या सुटण्यासाठी त्यांनी व्रत घेतले.. व्रत असे घेतले कि जे त्यांना आवडत होते… जेव्हा त्यांचे काम होते व व्रत पूर्ती करण्याची वेळ येते तेव्हा ते घाबरू लागेल… अशीच स्थिती आपली सुद्धा होते… आपणस देखील काही समस्या आली तर आपण सुद्धा काही तर व्रत म्हणा किंवा संकल्प घेतो परंतु तो घेताना देखील आपण आपणस आवडणारा संकल्प घेतो… यातून महाराज सांगत आहेत.. व्रत घ्यायचे असेल तर असे व्रत घ्या ज्यातून आपल्यात जीवनात बदल घडेल.. वास्तविक भगवंताला आपल्याकडून कोणतीच भौतिक वस्तू नको आहे भगवंताची इच्छा आहे कि व्रताला निमित्त करून आपण आपल्यातील वाईट सवयींचा त्याग करून आपले जीवन आनंददायी बनवावे… काही जणांना तर सवयच असते कि काहीही समस्या आली कि लगेचच काही तर व्रत घेतात म्हणजे माझे अमुक काम झाले तर अमुक एखादी वस्तू अर्पण करेल.. खरंतर भगवंत व आपल्यातील नाते हे व्यवहारिक नाते आहे का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.. जर याचे उत्तर नाही असे असेल तर भगवंताला मागायचे असेल तर भक्ती मागा… त्यासाठी कणखर पणा मागा.. त्यावर चालण्याचा संकल्प घ्या… ज्याने ब्रम्हांड निर्माण केले त्याला आपल्याकडून कोणत्याच भौतिक वस्तू नको आहेत.. तो तर म्हणत आहे उच्चतम अभिव्यक्ती कर.. किती खोल असा संदेश श्री महाराज आपणस देत आहेत… !
चला आपण श्री महाराजांना प्रार्थना करूया – श्री गजानन महाराज आम्हाला आपल्याकडे काय मागावे याची समज नाही… आजच्या लीलेतून आपण आम्हाला हि समज दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद… आम्हाला व्यवहारिक नाही तर आम्हाला तुझी प्रेमळ भक्ती दे… आम्हाला काही मागण्याची नाही तर देण्याची सवय आमच्यात दृढ कर.. आमच्यातील विकार अर्पण करण्याची शक्ती .. समज आम्हाला दे.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद .. !