निःशंक तारक मंत्र काय सांगतो आपणस

स्वामी भक्त हो…आपण तारक मंत्र म्हणतो त्यातील पहिला मंत्र आपणास सांगतो…निःशंक..स्वामी भक्तीत मन कसे झाले पाहिजे निःशंक…म्हणजे मनात शंका नको…पहा..आपले मन शंका निर्माण करतेच…माझे अमूक काम होईल का? नाही होणार…होईल…मन म्हणते होईल…मध्येच म्हणते नाही होणार…मग आता इथे आपल्याला…पहिले काम करावे लागेल ते आपल्या मनावर..मग आता मनावर कार्य कसे करणार…आता या बाबत आपण अनेक उपाय वापरू शकतो…पहा आपल्या घरात भांडी असतात…जी भांडी आपण वापरतो ती रोज आपण धुतो…जी वापरत नाही ती आपण धूत नाही त्या भांड्यावर घाण..धूळ जमा होते…म्हणजेच काय आपणास भांडे जसे स्वच्छ करतो..तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणे आवश्यक आहे…आता आपल्याला मन स्वच्छ करायचे आहे…याला उपाय आहे स्वामी नाम..रोज स्वामी नाम घ्यावे…आता..मनात येईल की आपण इतक्या काळा पासून स्वामी नाम घेत आहोत…पण मन निःशंक होत नाही…पहा आपणास हे कार्य अखंड चालू ठेवणे आवश्यक आहे…आता स्वामी नाम तर घेतले…दुसरे कार्य आपणास कार्य करायचे आहे…प्रार्थना..स्वामीना प्रार्थना करायची आहे…स्वामी आमचे मन निःशंक करा…हे आम्ही करू शकता नाही. हे आपल्या कृपेनेच शक्य आहे…तिसरे कार्य आपणास करणे आवश्यक आहे…रोज आपणास स्वामी लीला असतील किंवा जे काही सकारात्मक असेल त्याचे वाचन करायचे आहे…आता नुसते वाचन करुन आपणास थांबायचे नाही तर…नेमके आपण आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो यावर आपणास कार्य करायचे आहे… यावर आपणास स्वतः चिंतन मनन करावे लागेल…हे जेव्हा आपण अखंड करू तेव्हा नक्कीच आपले मन निःशंक होईल आणि स्वामी कृपेने स्वामी चरणी निःशंक होईल…धन्यवाद स्वामी..कोटी कोटी धन्यवाद…!
www.chetnakeswar.com

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

श्री गजानन महाराज श्री खंडू पाटील यांचे बंधू कृष्णाजी पाटील यांच्या घरी राहत होते.. श्री भास्कर पाटील आणि तुकाराम कोकाटे श्रीं ची सेवा करत होते.. अचानक एकेदिवशी त्या मळ्यात काही गोसावी आले आणि कृष्णाजी पाटील यांना म्हणाले आम्ही अनेक तीर्थ यात्रा करून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रम्हगिरी सुद्धा आहेत.. आम्ही तीन दिवस इथे राहणार आहोत आमची सेवा करावी..आपण त्या महाराजांची सेवा करता अहो त्या पेक्षा आमची सेवा करा.. त्यांचे बोलणे ऐकून कृष्णाजी एवढेच म्हणाले कि आज तर आमच्याकडे भाकरी आहेत त्याचा स्वीकार करा उद्या शिरा पुरी देऊ..संध्याकाळी ब्रम्हगिरी बुवा नी प्रवचन सुरु केले अनेक वस्ती वरचे लोक प्रवचन ऐकण्यास आले होते.. त्यांनी प्रवचनास भगवद गीतेचा श्लोक घेतला ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ त्यावर निरूपण करू लागले.. त्यांचे निरूपण ऐकून लोकांना काही समजत नव्हते कि महाराज काय सांगत आहेत.. त्या मुळे सर्व लोक उठून श्री गजानन महाराजांकडे गेले.. हे सर्व पाहून गोसाव्याला राग आला.. तेव्हा श्री महाराज पलंगावर बसून चिलीम ओढत होते.. अचानक चिलिम मधील एक ठिणगी पलंगावर पडली आणि पलंगानी पेट घेतला.. हे सर्व पाहून तेथील लोक घाबरले आणि श्री महाराजांना खाली उतरण्याची विनवणी करू लागले.. भास्कर पाटील पाणी आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा महाराज म्हणाले अजिबात पाणी आणू नकोस.. हा सर्व प्रकार ब्रम्हगिरी सुद्धा पहात होते.. तेव्हा महाराज म्हणाले ब्रम्हगिरी महाराज या बसा माझ्या शेजारी पलंगावर बसा..आताच तुम्ही सांगितले ना.. ” नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ श्री महाराज भास्कर पाटील यांना म्हणाले जा घेऊन या बुवांना या पलंगावर..हे ऐकून बुवा घाबरले आणि पळून जाऊ लागले पण भास्कर पाटील यांनी त्याला पकडले आणि महाराजांकडे घेऊन आले.. महाराज त्यांना म्हणाले अहो आपण जो श्लोक सांगितले त्यावर जे विवेचन केले ते कृतीतून करून दाखवा..बसा या पलंगावर.. तेव्हा बुवा म्हणाले महाराज मला माफ करा.. मी पोट भरू संत आहे.. शिरा पुरी खाण्यासाठी मी संत झालो आहे..लोकांनी महाराजांना विनंती केली आपण खाली उतरा.. महाराज उतरे पर्यंत सर्व पलंग जळून गेला होता केवळ महाराज बसले होते तेवढा भाग मात्र चांगला होता.. ब्रम्हगिरी बुवा महाराजांच्या चरणी लीन झाले.. तेव्हा महाराजांनी त्यांना उपदेश केला.. जर आपणस स्व अनुभव नसणारी गोष्ट इतरांना सांगू नये.. बुवाला आपली चूक समजली तो.. महारांजाच्या चरणी लीन झाला.. अश्या रीतीने ब्रहागिरी बुवा विरक्त झाला.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

बोध- वरील लीलेतून महाराज आपणस खूप खोल असे मार्गदर्शन करत आहे.. पहा अनेकदा आपणस एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसताना आपण असे दाखवतो कि मला खूप माहिती आहे.. हि गोष्ट अध्यात्म अनेकदा घडते..आपणस या गोष्टी पासून दूर राहायचे आहे.. तसेच आज आपण पाहतो कि अनेक जण अध्यात्मिक मार्गदर्शन करतात आपणस असे वाटते कि हा बरोबर तो चूक.. खरंतर आपणस कुणा वर टीका करायची नाही पण आपणस जागृत राहून ईश्वर सेवा करायची आहे.. कारण अनेक ब्रह्मगिरी बुवा आहेत.. आपणस श्री महाराजांची लीला आपल्या जीवनसाठी मार्ग दर्शन करत आहेत.. अनेकदा आपले असे होते कि बुवा प्रमाणे आपणास अनेक स्तोत्र मंत्र पाठ असतात.. आपल्यात अहंकार निर्माण होतो.. खरंतरं जो पर्यंत आपली आंतरिक शुद्धी होत नाही तो पर्यंत आपणास खरे ज्ञान मिळू शकत नाही.. त्या मुळे आपणस अनेक गोष्टी मध्ये न अडकता.. सहज सोपी साधना करायची आहे.. जसे रोज नाम जप करा.. शक्य असेल तर रोज एक अध्याय श्री गजानन विजय ग्रंथ वाचा.. आणि नुसता ग्रंथ न वाचता.. श्री महाराजांना प्रार्थना करा आम्हाला मार्गदर्शन करा.. पहा ज्या प्रमाणे बुवांना मार्गदर्शन मिळाले तसे आपणस हि मिळावे.. हाच बोध होतो.. बोला श्री गजानन महाराज कि जय.
चला आपण सर्व मिळून श्री गजानन महाराजांना प्रार्थना करूया.. श्री महाराज ज्या प्रमाणे आपण ब्रम्हगिरी बुवाना योग्य मार्ग दाखवला.. आणि सत्याचे ज्ञान प्रदान केले.. असे ज्ञान आम्हाला प्रदान करा.. आम्हाला ज्ञानी नाही तर समर्पित भक्त बनवा.. आम्हाला इतर गोष्टीत न अडकण्याची बुद्धी द्या.. आपल्या नाम सेवेची सेवा द्या..बाकी काहीच नको.. बोला श्री गजानन महाराज कि जय.

www.chetanakeswar.com

शिव पुराण कथा 6

शिव भक्तहो.. शिव पुराण कथा सांगते.. महादेवाची पूजा श्रवण, कीर्तन आणि मनन याने करावी आता काही जण म्हणतील आम्हाला हे शक्य नाही..तर मग आम्ही काय करावे..श्री शिव पुराण कथा सांगते..लिंग अथवा शिव मूर्तीचे पूजन करावे…आता इथे आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की शिव लिंग किंवा शिव मूर्ती मध्ये काय फरक…शिव पुराण कथा सांगते…भगवान शिव हे ब्रह्मरूप आहेत..त्यामुळे त्यांना निष्कल म्हणजे निराकार आहेत..म्हणून शिव लिंग हे निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे..तसेच शिव हे साकार ही आहेत म्हणून आपण मूर्ती पुजा ही करू शकतो…आता आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की साधारण मूर्ती किंवा पिंड कशी असावी याबाबत..शिव महापुरान कथा सांगते आपल्या आर्थिक पात्रते नुसार आपण ही घ्यावी…आता पुजा कशी करावी..याबाबत ही वर्णन शिव पुराण कथेत येते..त्यात महत्वाचे भक्ती भाव ठेवून पुजन करावें यांचा उल्लेख येतो…बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – खरंतर शिव पुराण आपणस शिव भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन करते.. पहा अनेकदा आपल्या मनात आज पर्यंत प्रश्न निर्माण झाला असेल कि शिव पिंड किंवा मूर्ती यात फरक काय याचे उत्तर आपणास आजची शिव पुराण कथा देत आहे.. महादेव कसे आहेत.. निर्गुण निराकार आहेत.. म्हणून पिंडीची पूजा केली जाते.. आपण कुठेही असाल तरी सहज मातीची पिंड तयार करू शकता.. म्हणजेच सेवा करताना अडचण नसते फक्त आपली तयारी असावी.. आता आपल्या मनात देवा विषयी एक चित्र तयार असते.. आणि आपले मन देवाचे हि चित्र निर्माण करते.. महादेव म्हणजे असे दिसतात.. मग त्या साठी आपण मूर्ती पूजा करू शकतो असे शिव महा पुराण सांगते.. थोडक्यात सेवेचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.. फक्त आपली सेवा करण्याची तयारी हवी बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण महादेवाला प्रार्थना करूया.. हे महादेवा आजच्या लीलेस निमित्त करून तू आम्हाला तुझ्या साकार आणि निराकार रूपा बद्दल समज दिलीस त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या तुझ्या निराकार स्वरूपाची सेवा करून घे.. आमच्या मनातील सर्व किंतु परंतु दूर कर.. धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला श्री उमा महेश्वर भगवान कि जय .. ॐ नमः शिवाय ॐ

 

 

शिव पुराण कथा 5

विधवेश्वर संहिता १०.हजार श्लोक, रुद्र संहिता ,विनायक संहिता,उमासंहिता,मातृसंहिता यात प्रत्येकी 8 .हजार श्लोक एकादशरुद्रसंहिता 13 .हजार श्लोक ,कैलाससंहिता 6 हजार श्लोक,कोटी रुद्र संहिता 9.हजार श्लोक, सहस्त्र-कोटी रुद्र संहिता ११ हजार श्लोक,वायवीयसंहिता 4 .हजार श्लोक, तसेच धर्म संहिता 12 हजार श्लोक अश्या प्रकारे शिव महा पुराण कथा १ लाख श्लोकांची आहे…व्यासांनी आपल्या साठी २४ हजार श्लोकांची संक्षिप्त महा पुराण कथा लिहिली…शिव पुरणाचे स्थान ४ क्रमांकावर येते…यात सात संहिता आहेत..यातील पहिला संहिता विधवेश्वर संहिता आहे…दुसरी रुद्र संहिता, तिसरी शत रुद्र संहिता,चौथी कोटी रुद्र संहिता, पाचवी उमा संहिता,सहावी कैलास संहिता, सातवी वायवीय संहिता.. याला शैव शिरोमणी भगवान व्यास यांनी संक्षिप्त शिव पुराण निर्माण केले..याचे सर्वांनी श्रवण पठण करावे.. शिव पुराणात काय आहे…भक्ती , घ्यान आणि वैराग्य यांचा उल्लेख शिव पुराणात येतो…जेव्हा सृष्टी ची उत्पत्ती सुरू होती..जे सहा महर्षी होते त्यांच्यात वाद निर्माण झाला।की अमुक एक।गोष्ट श्रेष्ठ…त्यांच्यातील।हा वाद इतका विकोपाला।गेला की ते सर्व ब्रम्हाजी यांच्याकडे गेले…आणि त्याना विचारले की सम्पूर्ण तत्व पेक्षा वेगळा पुराण पुरुष कोण आहे??तेव्हा ते म्हणतात देवाधिदेव महादेव..यांना प्राप्त करायचे असेल तर भक्ती करावी..सर्व देव यांचीच पूजा करतात…भव सागर पार करण्याची शक्ती शिव उपासनेत आहे..शिव भक्ती कशी करावी..कानाने श्रवण..मनाने मनन.. आणि मुखाने कीर्तन हे श्रुतीचे वाक्य आपणस प्रमाण भूत आहे..पराशर मुनी यांचे पुत्र..व्यास देवजी सरस्वती..नदी काठी साधना करत होते..एके दिवशी तिथे सनतकुमार येतात..त्यावेळेस व्यास देवजी ध्यानस्थ होते..काही वेळाने ध्यानातून बाहेर आल्यावर त्यांनी..सनतकुमार यांना पाहिले…ते तात्काळ उठले.. त्यांचे आदर पूर्वक पुजन केले…आता व्यासजी.. सनतकुमार यांना सांगतात..तुम्ही शिव भक्ती करा..यात श्रवण मनन आणि कीर्तन करा..पूर्वी मी अनेक साधनांचा अवलंब केला आणि त्यात अडकलो..हाती मात्र काहीच आले नाही..पण जेव्हा मी भटकलो आणि मंदराचल पर्वतावर गेलो..तिथे मला शिव कृपेने..भगवान नंदिकेश्वर भेटले आणि त्यानी मार्गदर्शन केले..त्यांनीच मला मुक्ती चे साधन सांगितले…आपण ही सर्वांनी या तिन्ही साधनांचा अवलंब करा बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

बोध – शिव भक्तहो पहा श्री शिव महा पुराण हा ग्रंथ किती मोठा आहे.. व्यासांना त्याच वेळेस जाणवले असेल कि कल युगात लोकांना सोपे असे साधन निर्माण व्हावे त्यांना शिव तत्त्व काय आहे हे समजावे या साठी त्यांनी श्री शिव महा पुराण संक्षिप्त श्लोकात निर्माण केले.. तत्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही.. या लीलेस निमित्त करून आपण त्यांना धन्यवाद देऊयात आणि त्यांना प्रार्थना करूया कि आमच्या कडून शिव महा पुराण कथा श्रवण मनन करून घ्या… पहा वरील लीलेत येते कि सृष्टी ची निर्मिती झाली तेव्हा महर्षी मध्ये वाद निर्माण झाला कि श्रेष्ठ कोण.. खरंतर हा वाद तर आपल्या दैनंदिन जीवनात रोज घालत असतो.. जसे मी जे म्हणतो किंवा करतो ते किती श्रेष्ठ आहे खरंतर अनेकदा हा आपले खूप मोठे नुकसान करत असतो कारण आपण करतो तेव्हा आपणस प्रेरणा देणारी कोणती तरी एक शक्ती असते पण आपण मात्र ते विसरून जातो आणि खोटा अहंकार बाळगतो.. थोडक्यात आपणास आपल्यातील खोटा अहंकार दूर करायचा आहे.. श्री शिव महा पुराण कथा आपणस श्रवण, पठण आणि कीर्तन हि सेवा करण्याची प्रेरणा देत आहे.. व्यास देव स्वतः सांगतात कि ते आधी अनेक सेवा करत होते पण त्यांना मुक्तीची मार्ग म्हणा किंवा सत्य मार्ग मिळत नव्हता पण जेव्हा शिव भक्ती करू लागले तेव्हा त्यांना समजले कि श्रवण मनन आणि कीर्तन हाच मुक्तीचा मार्ग आहे.. आपणस हि मार्गाचा अवलंब करायचा आहे.. पहा रोज थोडा बदल आपले आयुष्य बदलून टाकेल.. तरी सर्वानी या वर कार्य करावे हि विनंती… बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

चला आपण सर्व मिळून महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझी भक्ती कशी करावी हे आम्ही जाणत नाही.. त्या मुळे नको त्या अनेक मार्गात आम्ही अडकतो.. आजच्या लीलेत सांगितल्या प्रमाणे आमच्या कडून श्रवण,, मनन आणि कीर्तन सेवा करून घे हीच प्रार्थना.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद बोला उमा महेश्वर भगवान कि जय.. ॐ नमः शिवाय ॐ

शिव पुराण कथा ४

शिव पुराण कथा 4

शिव पुराण कथा श्रवण किंवा वाचन करताना कोणते नियम पाळावेत याचे वर्णन श्री शिव महापुराण मध्ये येते.. सर्वप्रथम आपले आप्तेष्ट घरातील मंडळी यांच्याशी आपण चर्चा करावी कि आपणस श्री शिव महा पुराण कथा करणार आहोत तर कधी करावी.. त्यात प्रत्येकाचे मत विचारात घ्यावे कारण सर्वांच्या विचाराने झालेले कार्य सफल होते.. आपण हि घरच्या घरी वाचणार असाल तर शक्यतो सर्वांना श्रवण करता  येईल असा मुहूर्त आपण शोधावा.. जर आपण शिव मंदिरात किंवा इतर ठिकाणी करणार असाल तर याबाबत अनेक शिव भक्तांना याचा लाभ घेता येईल अशी काळजी घ्यावी.. शिव पुराणात वर्णन येते कि केळीच्या खुंटाचा मंडप असावा.. आज आपण विचार केला तर आज अनेक मंडप आहेत.. हॉल आहेत अनेक सुविधा आहेत त्याचा आपण वापर करू शकतो.. जेणेकरून ऊन , वारा , पाऊस याचा व्यत्यय कथेत येणार नाही.. कथेच्या ठिकाणी भगवान शिव यांच्या साठी आसन  असावे.. आता यात आपला भाव महत्वाचा कारण मग आपल्या मनात प्रश्न येईल असेच आसन हवे तसे नको.. इथे आपण फुलाचे आसन करू शकतो.. आता आपण जी कथा श्रवण करणार आहोत त्या ग्रंथासाठी हि उच्च आसन असावे .. म्हणजे काय तर ग्रंथ वाचताना त्या खाली चौरंग, पाट किंवा आणखी कोणते आसन असावे.. याचा फायदा जे वाचणार आहेत त्यांना हि वाचताना सोपे झाले पाहिजे.. आपल्या कडे प्रथा आहे कि ग्रंथ आणि ग्रंथ वाचक यांचे आसन नेहमी उच्च असावे आता.. यामागचे कारण आपल्यात अधिकाधिक भक्ती भाव जागृत व्हावा.. जे कथा वाचणार आहेत त्यांनी त्या ग्रंथानुसार आचारण करण्याचा प्रयत्न करावा कारण.. शिव पुराण हा नुसता ग्रंथ नसून ते शिव तत्त्व आहे.. शिव पुराण  मुळातच आपणस शुद्ध चित्त ठेवण्यास सांगते.. आता इथे आपल्या मनात प्रश्न येईल कि आम्ही तर प्रथमच शिव पुराण घरात वाचत आहोत.. मग आम्हाला कसे कळणार.. शिव पुराण वाचले कि आपणास आपल्यातील दोष जाणवतात.. ते दोष दूर केले म्हणजेच नियमांचे पालन झाले.. शिव पुराण मध्ये सांगितले आहे कि जे कुणी कथा वाचणार आहेत जर त्यांना काही अडचण आली तर दुसरे कुणीतरी ती कथा वाचू शकेल याची सुद्धा आपण काळजी घ्यावी.. आता कथेस सुरवात करण्यापूर्वी.. आपण आवश्यक त्या प्रार्थना जसे गणपती पूजा, ग्रंथ पूजा करावी.. काहीच शक्य नसेल तर भगवान महादेवांना प्रार्थना करावी कि आपल्या कृपने आम्ही ग्रंथ वाचन श्रवण करत आहोत आमच्याकडून सेवा करून घे.. शुद्ध भाव ठेवून कथा श्रवण किंवाव वाचन करावी असा उल्लेख श्री शिव महा पुराण  मध्ये येतो.. सात्विक अन्न ग्रहण करावे.. आता सात्विक अन्न म्हणजे असे अन्न  ज्याने आपले पोट नरम राहील शरीरात ऊर्जा असेल असे अन्न.. कथा श्रवण आणि वाचन याचे व्रत घेतले कि त्या बरोबर आणखी एक व्रत घेण्याचा उल्लेख श्री शिव महा पुराणात येतो.. ते व्रत म्हणजे काम, क्रोध , मोह, मंद मत्सर आणि घृणा याचा त्याग करावा.. कुणाची निंदा करू नये.. सत्य , मौन , सरळ आचरण, विनम्रता त्याच प्रमाणे मनात कोणत्याही प्रकारचे किंतु परंतु न ठेवता याचे श्रवण पठण करावे.. कथेची सांगता करताना आपल्या क्षमते नुसार अन्न दान करावे.. तसेच रोज शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा ‘ॐ नमः शिवाय’ आता सर्वांच्या मनात प्रश्न असतो कि कथा वाचून किंवा श्रवण करून काय होईल.. खरं सांगु काहीच होणार नाही जर आपल्या मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर.. कारण श्री शिव महा पुराण कथा आपणस आपल्या स्वतः वर काम करण्यास शिकवते.. पहा जेव्हा आपण आपल्यात बदल करू तेव्हा नक्कीच श्री शिव महा पुराण कथेच्या श्रवण पठण याचा जो काही फायदा होईल तो आपला आपल्यालाच जाणवेल.. नक्की आपण वाचण्याचा श्रवण करण्याचा प्रयत्न करावा.. आणि नसते वाचन किंवा श्रवण न करता त्या नुसार आपल्यात बदल करावा.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’

चला आपण सर्व मिळून श्री महादेवांना प्रार्थना करूया.. हे महादेवा तुझे चरित्र वाचन किंवा श्रवण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दे.. जसे तुझ्या चरित्रात वर्णन येते त्या नुसार आमच्या जीवनात… आमच्या स्वतः मध्ये बदल करण्याची बुद्धी आम्हाला दे.. कारण तुझे चरित्र तर आम्हाला आमच्यातील दोष करण्याची प्रेरणाच देत आहेत.. धन्यवाद महादेवा… हि समज दिल्याबद्दल धन्यवाद… हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद… बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..’ॐ नमः शिवाय’ !www.chetanakeswar.com