अक्कलकोटी आलो देवा

स्वामी वाणी पुष्प ५४३(पर्व ४ थे भाग ४७)

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

www.SwamiVaani.com

आजचे चिंतन-मनन

अक्कलकोटी आलो देवा ,
तुझ्या दर्शने तृप्त झालो देवा !
अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा ,
प्रसादरूपे दिलासी !

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी म्हणजे प्रार्थना आहे.. आपण सर्वजण अक्कलकोट ला जातो स्वामींचे दर्शन घेण्यासाठी.. खरंतर हि स्वामी कृपाच आहे.. समर्था तुझ्या कृपेनेच तुझ्या द्वारी येण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.. खूप खूप धन्यवाद.. तुझे दर्शन आज मनाला खूप खूप आनंद झाला.. इथे कधी कधी आपली चूक होते आपण कुठल्याही स्थळी जातो तिथे स्वामी दर्शन घेण्यापूर्वी फोटोच काढत बसतो.. सरश्री नेहमी सांगतात जेव्हा आपण जिथे कुठे जाल तिथला अनुभव जो आहे त्याचा आनंद घ्या पण आपण काय करतो फोटो काढत बसतो..असे न करता आपण जिथे जाल तिथला अनुभव अनुभवा.. स्वामी च्या दर्शना ला गेलात तर स्वामी नाम घ्या.. थोडा वेळ स्वामी नामाचे ध्यान करा.. आपण जेवण केले कि कसे म्हणतो पोटभर जेवण करून तृप्त झालो.. पण हि तृप्ती दुसऱ्यादिवशी परत निर्माण होते.. स्वामी दर्शन घेताना.. सेवा करताना अशी करा कि हि दर्शनाची तृप्ती आपली.. कायम असावी.. स्वामी आपणास अनन्य भक्तीचा अनमोल ठेवा प्रसादरूपे देत आहेत आपणस तो जतन करायचा आहे.. तो आपण जतन कसा करू शकतो तर त्यासाठी आपणस सेवेत सातत्य असणे आवश्यक आहे.. आपण जसे रोज जेवण करतो.. रोज झोपतो.. तसेच असा एकही दिवस जाऊ नये ज्या दिवशी आपली स्वामी नाम सेवा होणार नाही..स्वामी भक्तहो स्वामी नाम सेवा करा.. रोज स्वामींना प्रार्थना करा स्वामी आमच्याकडून सेवा करून घ्या.. स्वामी सेवेचा विशिष्ट असा संकल्प घ्या.. स्वामी सेवेत सातत्य ठेवा.. नक्कीच स्वामी सेवा करून घेतील.. धन्यवाद स्वामी.. हि समज दिल्याबद्दल धन्यवाद.. हि प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद

नवीन वर्ष..नवीन संकल्प

स्वामीं भक्तहो.. नवीन वर्ष..नवीन संकल्प..आपण अनेक संकल्प करतो…पण ते फक्त एकाच दिवसासाठी..हा आपल्या मनाचे आपल्यावर किती राज्य आहे हे सिद्ध करते..असो..आपण खरंच एक संकल्प करू शकतो..जो आपणस आपल्यावर काम करण्यास मदत करेल..चला या नवं वर्षाला संकल्प घेऊया रोज स्वामीं नाम घेण्याचा..!
१) रोज किमान १ , ५,७,११ माळी स्वामीं नाम सेवा करण्याचा संकल्प घेऊया
२)११ माळी जप करण्यास साधारण २०.मिनिटे लागतात
३) संकल्प असा घ्या की स्वामीं नाम सेवा झाल्याशिवाय झोपणार नाही
४) स्वामीं कडे बाकी काही न मागता स्वामीं नाम सेवा मागा
५) जर आपण रोज ११ माळी जप केलात तर..महिण्याचा जप होतो साधारण ३५,००० आणि अखंड वर्ष भर केलात तर ४,३३,०००
६)स्वामीं नाम हे असे साधन आहे जे स्वामीं कृपेनेच प्राप्त होते..ती कृपा ग्रहण करण्याची आपली तयारी आवश्यक आहे
७)सर्वांना विनंती आहे..स्वामीं नाम सेवेचा संकल्प घ्यावा..नुसता घेऊ नका तर त्यावर अखंड कार्य करा..!
८)स्वामीं आमच्या सर्वांकडून स्वामीं नाम सेवा अखंड करून घ्या..यात कोणताच सेवेकरी कमी पडू नये..हीच प्रार्थना..!
९)करणार ना सर्वजण स्वामीं नाम सेवा …👍👍👍👍..आपली तयारी

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !

स्वामी वाणी पुष्प ५४२(पर्व ४ थे भाग ४६)

आजचे चिंतन-मनन

मनातील सुख दुःख स्वामींना सांगावे !
माता म्हणोनिया !!
प्रपंचाची चिंता स्वामींवर सोडावी !
कुटुंब प्रमुख म्हणोनिया !!

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो.. आजची स्वामीं वाणी म्हणजे..सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.. मन आणि सुख दुःख यांचं सुंदर असे नाते आहे..आपण नेहमी सुख दुःख इतरांना सांगत असतो..समोरची व्यक्तीला ते ऐकण्यात रस असतो की नाही ह्याचा आपण विचारही करत नाही..लहानपणी आपले सर्व सुख दुःख कुणाला सांगत होतो? आपल्या आईला.. आज आपण आपल्या आईशी बोलत नाही..खरंतर तर बोलले पाहिजे..असो नाही आईशी तर..स्वामीं आईला आपली सुख दुःख सांगा.. पहा आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात की नाही…फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा..फक्त दुःख सांगता बसू नका..स्वामीं आपण कसे दुःखातून बाहेर काढले हे स्वामीं ना सांगा..पहा काय अनुभव येतो..कुटुंबातील प्रमुख व्यक्तीवर सर्व चिंता सोडा..पहा आपण घरातील ज्येष्ठ व्यक्तीवर जबाबदारी देतो की नाही..आपण किती निवांत असतो..पण आपल्या मनाला वाटते की मीच सर्व करत आहे..घरातील कुटुंब प्रमुख पद स्वामीं ना द्या..पहा काय अनुभूती येते..इथे महत्वाची गोष्ट लक्षात असावी..आपणस आपले कर्म करायचेच आहे..हे सर्व जेव्हा आपण आचरणात आणू.. तेव्हाच आपणस याच्या आनंदाची अनुभुती येईल.. स्वामीं नाम घ्या..धन्यवाद स्वामीं..!

नामाचा नको कंटाळा !

स्वामी वाणी पुष्प ५४१(पर्व ४ थे भाग ४५)

आजचे चिंतन-मनन

नामाचा नको कंटाळा !
स्वामींचा असावा जिव्हाळा !!
प्रेमभावे नित्य आळवावा !
स्वामी माझा !!
www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..आपणस कंटाळा येत नाही..गप्पा गोष्टी , व्हाट्स अप, फेसबुक,वा सोशल मीडियाचा,टीव्ही ,रेडिओ, चर्चा वा इतर गोष्टीचा पण स्वामीं नाम घ्यावे म्हंटलं की झोप येते, कंटाळा येतो..मग आपण स्वामीं नाम घेत नाही..खरंतर दिवसभरात किमान १ तास आपण सोशल मीडियावर असतो..हा १ तास आपण स्वामीं नाम सेवे साठी देऊ शकतो..पण आपला जिव्हाळा आहे..भौतिक वस्तू मध्ये..स्वामीं नामा वर जिव्हाळा निर्माण होण्यासाठी प्रथम आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..आपल्या मनाला घेऊन आपणस रोज १ माळ, 3 माळ ११ माळ, २१ माळ जप सेवा करावी लागेल..तेव्हा हळूहळू स्वामीं नामात आपणस प्रेम, जिव्हाळा निर्माण होईल..एकदा स्वामीं नामात प्रेम निर्माण झाले की..आपले जीवन म्हणजे..आनंददायी असणार यात काहीच शंका नाही…जर चिर आनंद हवा असेल तर स्वामीं नाम घ्या..आपला प्रत्येक श्वास हा स्वामीमय बनला पाहिजे..स्वामीं नाम सेवेला पर्याय नाही..आणि जेव्हा आपल्याला स्वामीं नाम।महिमा समजेल तेव्हा.. ह्रदयातून स्वामीं नामाचे प्रेम अश्रू येतील..स्वामीं आपल्याला मिठीत घेण्यास तयार आहेत..पण आपण इतरत्र भटकत आहोत..अमुक गोष्ट केली तर स्वामीं खुष होतील..आणि माझे अमुक अमुक काम होईल..अहो आपले काम तर होणारच आहे..पण स्वामीं त्या पेक्षा मोठी गोष्ट आपणस देऊ करत आहेत..आपण फक्त प्रेम भावनेने स्वामीं नाम घेणे आवश्यक आहे..आपणस विनंती आहे..स्वामीं नाम घ्या..बाकी कोणती सेवा करण्याची गरजच भासणार नाही..फ़क्त स्वामीं नामला मिठी मारा..जर स्वामीं नी मिठीत घेतले नाही तर सांगा..स्वामी माझा कधीच निराश करत नाही..फक्त गरज आहे स्वामीं नाम सेवेची..धन्यवाद स्वामीं..!

अनन्य भक्ती दे समर्था ! अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!

स्वामी वाणी पुष्प ५४०(पर्व ४ थे भाग ४४)

आजचे चिंतन-मनन

अनन्य भक्ती दे समर्था !
अतूट अभेद्य श्रध्दा दे समर्था !!
निरंतर ध्यास दे समर्था !
आनंदी अविश्रांत सेवा दे समर्था !!

www.SwamiVaani.com

स्वामी भक्तहो .. वरील प्रार्थना आपणस स्वामींना काय मागावे हे शिकवत आहे.. स्वामी आपणस आवश्यक असणारी भौतिक वस्तु आपण मागतं असतो .. पण आपली भौतिक गरज कधीच संपत नाही.. एक गरज संपली कि आपण दुसरे काही तरी मागतच असतो.. इथे आपण स्वामींना जे खरंच मागायचे आहे ते मागत आहोत.. अनन्य भक्ती.. अशी भक्ती जी भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे..इथे संपूर्ण समर्पण भाव आहे..काही होवो स्वामी जे करणार ते योग्यच आहे.. असा भाव.. अनन्य भक्ती ची अवस्था स्वामी कृपेशिवाय नाही प्राप्त होऊ शकत.. त्या साठी कायम आपणस स्वामी चरित्रावर चिंतन मनन करणे आवश्यक आहे..अतूट अभेद्य श्रध्दा.. हि श्रध्दा ची उच्च्तम अवस्था आहे.. म्हणजेच कोणताही प्रसंग असो.. मुखातून फक्त स्वामी नामच येते.. किती अडचण असो.. समस्या असो.. स्वामी नामच येते..म्हणजेच इथे आपली श्रद्धा इतकी असावी कि काही होवो स्वामी सेवा सुटता कामा नये…आपल्या मनाला फक्त स्वामी सेवेचाच ध्यास लागावा.. जेव्हा अनन्य भक्ती,अतूट अभेद्य श्रध्दा, निरंतर ध्यास निर्माण होईल तेव्हा आपले जीवन हे आनंदी बनेल.. आणि आपली सेवा हि सेवा न राहता सेवेचा महायज्ञ होईल.. म्हणूनच स्वामींना भक्ती श्रद्धा , विश्वास आणि स्वामी सेवेचा ध्यास मागा.. हे सर्व एका दिवसात मिळेल का? नाही या साठी आपणस अखंड स्वामी नाम सेवा करणे आवश्यक आहे.. आज आता पासून स्वामी सेवेस सुरवात करूया.. धन्यवाद समर्था… !