मन निर्भय कसे बनवावे

May 4, 2025 | Uncategorized

Share

स्वामी भक्त हो तारक मंत्रातील दुसरा मंत्र आहे.. निर्भय हो.. पहा तारक मंत्रातील प्रत्येक शब्द आहे आपल्याला निर्भयता हा गुण धारण करण्याचे शिकवतो.. आता आपल्या मनात येते कि आम्ही तर निर्भय आहोत.. आता आपण खरंच निर्भय आहोत का ? हा प्रश्न आपण आपल्याला स्वतः ला विचारायचा आहे.. पहा जर प्रामाणिक पणे विचारला तर उत्तर काही प्रमाणात हा येईल .. काही प्रमाणात नाही येईल.. आता निर्भयता म्हणजे काय ? आपल्या मनात असणारी भीती दूर करणे.. आता नेमकी भीती कशा कशाची असू शकते किंवा असते.. मला अपयश येईल का ? कोणतेही काम करण्या पूर्वी हि मनांत भीती निर्माण होते.. मी जर एखादे चांगले काम केले आणि त्यात अपयश आले तर लोक काय म्हणतील.. मी एकटाच आहे मी हे काम कसे करू… माझे भविष्यात कसे होईल .. मी एखादे काम करताना पडेल का.. अश्या अनेक गोष्टी असतात ज्याची आपल्या मनात भीती असते.. मग हीच भीती आपल्या मनात बसते.. आपले मन भीतीने ग्रस्त होते.. मग आपण अपयशी होतो.. अनेकदा आपण स्वामी सेवा हि करत असतो पण तरी आपल्या मनात असणारी भीती मुळे आपली सेवा सुद्धा यांत्रिक होते.. मग कधी अपयश आले कि मन म्हणते मी इतकी सेवा करतो .. असे करतो तसे करतो पण तरी मी अपयशी होतो.. आता पहा खरंतर स्वामी आपणस निर्भयता हा गुण विकसित करण्यास सांगत आहेत .. जिथे निर्भयता तिथे यश.. आता इथे एक गोष्ट आपणस सांगावीशी वाटते ती म्हणजे निर्भयता म्हणजे लोकांवर अन्याय करणे नव्हे .. आता हा निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी काय करावे यावर आपण चिंतना करू.. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आपल्यात प्रामाणिकपणा हा गुण विकसित करावा.. अपयश जरी आले तरी मी त्यातुन शिकणार आहे.. निर्भयता येण्यासाठी जे काही चरित्र असतील ते वाचाव्यात .. त्या चरित्रावर पुन्हा मनात चिंतन मनन करावे.. नेमके आपल्या मनात जी भीती आहे ती का आहे.. त्या भीतीच्या मुळावर काम करावे.. जसे मनात भीती आहे मी चुकलो तर.. मग विचार करा मी जरी चुकलो तरी त्या चुकेवर चिंतन मनन करून जी काही चूक झाली आहे ती चूक पुन्हा होऊ देणार नाही आणि मी यशस्वी होईलच.. रोज थोडा वेळ स्वामी नाम घ्या.. थोडावेळ ५ मिनिटे ध्यान करा.. स्वामींना प्रार्थना करा .. मला निर्भय बनव.. निर्भयता हा गुण विकसित करण्यासाठी मला मदत करा.. पहा रोजच्या सरावाने आपल्यातील मनांतील भीती दूर होईल.. आपल मन निर्भय होईल.. मग यश आपले दार ठोठावेल.. पहा आपणही यावर चिंतन मनन करावे आणि स्वामी सेवा आणि निर्भय मनाने यशाला गवसणी घालावी.. धन्यवाद स्वामी .. कोटी धन्यवाद .. हि सेवा करून घेतल्या बद्दल धन्यवाद

www.chetankeswar.com


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...