शिव पुराण कथा २

Oct 1, 2023 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

 

समुद्राच्या जवळ एक बाष्कळ नावाचे गाव होते…तिथे धर्माचे आचरण सोडून वागणारे दोघेजण राहत होते….ते खूपच वाईट होते…त्यांचे मन दूषित होते…कायम विषयासक्त होते..ईश्वरावर त्यांचा विश्वास नव्हता..तिथे राहणारे लोक सुद्धा तसेच होते…त्या गावात एक बिंदुग नावाचा व्यक्ती राहत होता…तो फारच कुमार्गी होता…त्याची पत्नीचे नाव चंचुला होते…ती धार्मिक वृत्ती ची होती…पण पती मात्र दुराचारी होता..तरीही तीने तो त्रास सहन केला..त्यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या..इतका की ती आपल्या पतीसोबत ती सुद्धा अधार्मिक बनली…अशीच अनेक वर्ष झाले..काही काळा नंतर बिंदुग मरण पावला…अनेक यातना झाल्या..त्याला पिशाच्च योनी मिळाली…पती च्या मृत्यू नंतर त्याची पत्नी आपल्या मुलांच्या सोबत रहात होती…एक दिवस काही कारणास्तव गोकर्ण इथे गेली…फिरता फिरता ती एका शिव मंदिरात गेली…तिथे..शिव कथा सुरू होती…ती कथा ऐकत असताना त्यात आपल्या कर्माचे फळ कसे मिळते याची समज तिला मिळाली… हे सर्व ऐकून तिच्या मनात भीती निर्माण झाली…कथा पूर्ण झाल्यानंतर ती जे कथाकार होते त्यांच्या कडे जाते…आणि आज पर्यंत ज्या काही चुका झाल्या त्या कथाकार आहेत त्यांना सांगते..तिचा तो भाव पाहून तिला समजावून सांगतात की  शिव कथा श्रवण करून तुला तुझी चूक लक्षात आली ही खूप मोठी  शिव कृपा आहे…हा निर्भय पण आहे..कारण सत्य स्वीकारणे खूप मोठी गोष्ट आहे…कारण चित्त शुद्ध असल्या शिवाय शिव पार्वती यांचा वास आपल्या ह्रदयात होऊ शकत नाही…कारण चित्त शुद्धी झाली की आपल्या ह्रदयात भगवान शिव जी यांच्या भक्ति चे दोन पुत्र म्हणजे.. ज्ञान आणि वैराग्य प्रगट होते…यात काही संशय नाही..यासाठी तू शिव भक्ती कर..शिव चरित्र वाच.. त्यावर चिंतन मनन कर नक्कीच..तुझी चित्त शुद्ध होईल आणि शिव कृपेस पात्र होशील…हे सर्व ऐकून चंचुला तिथेच राहते..शिव कथा श्रवण करते…तिला स्वानुभव प्राप्त झाला आणि ती विनाकष्ट शिवलोक प्राप्त झाले  .. बोला उमा महेश्वर देवता कि जय

बोध – शिव पुराण ची हि कथा आपणस मनावर कार्य करण्याची प्रेरणा देत आहे.. बिंदुग बरोबर राहून त्याची धार्मिक पत्नी चंचूला सुद्धा अधार्मिक झाली म्हणजेच या ठिकाणी आपणस बोध होतो कि.. आपली संगत कशी असावी.. कारण आपण ज्या संगतीत राहतो त्या नुसार आपले आचार विचार आणि विहार होतो.. त्या मुले आपणस सत्संगाची कास धरायची आहे.. इथे जी चंचुला ती आपल्या सर्वांमध्ये आहे.. पहा आपले मन कायम चंचल असते.. आता  इथे तर थोड्या वेळात दुसरी कडे जाते अश्या चंचल मनावर आपणस कार्य करायचे आहे.. म्हणजे चंचल मन अचल करायचे आहे..शिव पुराण कथा श्रवण केल्या नंतर चंचुला हिला आपल्या सर्व चुका लक्षात आल्या.. पहा अनेकदा असेच ईश्वर आपणस आपल्या चुका दाखवत असतो पण आपले चंचल मन त्या चुका दुर्लक्षित करतो आणि आहे ते चुकीचे वर्तन सुरु ठेवतो.. जो पर्यंत आपणस आपल्या चुका दिसत नाहीत आणि चुकीच्या वर्तनाच्या परिणामांची जाणीव आपणस होत नाही तो पर्यंत.. आपली चित्त शुद्धी होऊ शकत नाही.. पहा चंचुला हिला आपल्या चुका लक्षात आल्या.. मग तिने फक्त शिव पुराण ऐकले का ? नाही तिने शिव पुराणात सांगितल्या प्रमाणे आपल्या चित्तातील चुकीचे आचार विचार दूर केले.. हे करणे इतके सोपे नाही त्यासाठी आपल्यात निर्भयता हा गुण विकसित झाला पाहिजे तरच हे शक्य आहे.. आपणस शिव कृपेचा अनुभव हा तेव्हाच येईल जेव्हा आपले चित्त शुद्ध होईल.. यासाठी आपणस आजची लीला आपले चित्त शुद्ध करण्याची प्रेरणा देत आहे.. धन्यवाद समर्था.. बोला श्री उमा महेश्वर देवता कि जय..!

प्रार्थना – हे महादेवा – ज्या प्रमाणे चंचूला हिला शिव पुराण कथेस  निमित्त करून तिचे चित्त शुद्ध केलेस तसेच आमचे चित्त सुद्धा शुद्ध कर.. आमच्या ह्रदयात ज्ञान आणि वैराग्य प्रगट कर.. तुझ्या कृपेशिवाय हे शकय नाही.. धन्यवाद उमा महेश्वर देवता कि जय..

www.chetanakeswar.com

 


Share
और पढिये !!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...

स्वामींची भक्ती

स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून...