आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत

Feb 18, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५९२(पर्व ४ थे भाग ९६)

प्रेरणादायी बोल
आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत..तो आपला पालनकर्ता आहे.. हा विश्वास ठेवा.. जग सूंदर दिसू लागेल..!!
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो आजच्या स्वामी वाणी चा बोध घेण्यासाठी स्वामींची लीलाच पाहूया…अक्कलकोट गावात स्वामी प्रथम गावा बाहेरील खंडोबाच्या मंदिरात आले. तीन दिवस हे परब्रम्ह उपाशी होते. अहमद अलीखान ह्या रिसालदार ने स्वामींना एक वेडा व्यक्ती समजून मजाक मध्ये रिकामी चिलीम देऊन ” हुक्का पीता का?” असे विचारले…तेव्हा स्वामीनी ‘ हो मी हुक्का पितो !!’ असे म्हणून रिकामी चिलीम हातात घेतली आणि ओढण्यास सुरुवात केली तर चमत्कार असा घडला कि त्या चिलीम मधून धूर यायला लागला… हा चमत्कार बघून रिसालदार आश्चर्य चकित झाला आणि महाराज कोणीतरी अवलिया असावेत ह्याची त्याला खात्री झाली ..ह्या नंतर स्वामी तीन दिवस उपाशीच आहे हे समजल्या नंतर चोळप्पाच्या घरी स्वामींना जेवणासाठी नेले …
चोळप्पाच्या घरी जेवणास गेल्या नंतर स्वामीनी सर्वप्रथम रीसालदारास ताटाला हात लावण्यास सांगितले ..पण मी मुसलमान ताटाला हात कसा लावू म्हणून त्याचे धाडस झाले नाही ..पुन्हा स्वामीनी पुन्हा आज्ञा केली अरे! रिसालदार माझ्या ताटाला हात लाव !! तूझ्या हाताने जेवणाला चव येईल !! मग मात्र रिसालदाराने ताटाला हात लावला.. आणि त्या नंतर स्वामींनी जेवण केले .


बोध

स्वामी तर परब्रम्ह आहे..खोल महासागराच्या तळाशी असलेल्या छोट्याश्या मासोळीच्या अन्नाची सोय स्वामीनी केली आहे मग त्यांना तीन दिवस उपाशी राहण्याची गरज काय ? हा प्रश्न सहाजिकच आहे .. खरे तर..स्वामीच्या मनातील आपण काय ओळखणार? पण भक्तीयुक्त अंत:करणाने स्वामिनीच जे मनन करवून घेतले त्यातून असे समजते कि , ह्या आगळ्या वेगळ्या अवतारात स्वामीनी अक्कलकोट हे स्थान पुढील कार्या साठी निश्चित केले होते.. ह्यातूनच अहमद अलीखान च्या हाताने एका हिंदू घरात स्वामीनी जेवण करून “ईश्वरा समोर कुणी हिंदू नाही अथवा कुणी मुसलमान नाही तो फक्त भक्ती भावनेचा भुकेला आहे ” हा स्पष्ट संकेत दिला आणि विशेष म्हणजे अशा काळात कि ज्या काळात हे स्पृश्य अस्पृश्य असे कर्मकांड स्तोम जास्त माजलेले होते..


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...