अशक्य ही शक्य करतील स्वामी

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५२६(पर्व ४ थे भाग ३०)

आजचे चिंतन-मनन

अशक्य ही शक्य करतील स्वामी
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा ,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा |

www.SwamiVaani.com

स्वामीं भक्तहो..वरील ओवी वर चिंतन मनन काय करणार..कारण तारक मंत्रातील प्रत्येक शब्द हा..तारणहार आहे..स्वामीं भक्त आणि तारक मंत्र.. हे स्वामीं आणि स्वामीं भक्ताच्या नात्याला घट्ट करणारा दोर म्हणा साखळी म्हणा..काय ते भाव आहेत.. मनाला टॉनिक..बुडत्याला आधार..तारक मंत्र म्हणजे..जो स्वामीं भक्ताला तारतो.. भक्ती भाव ह्रदयात उत्पन्न करतो..या विषयी किती ही लिहिले तरी शब्द भांडार कमी पडेल..असो..आपण रोज तारक मंत्र सेवा करत असालच..करत नसाल तर सुरू करा..जगी.. म्हणजे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण सृष्टीत..प्रत्येक जीवाच्या जन्म आणि मृत्यू ही स्वामीं ची लीला आहे..आणि अश्या या ब्रम्हांड नायकाचे आपण बालक आहोत..इथे बालक म्हणजे आपण त्यांचे बाळ आहोत..पहा आपण आपल्या बाळाची कशी काळजी घेतो..हातावरच्या फोडा पेक्षा अधिक..आपण आपल्या बाळाची काळजी घेतो..मग विचार करा आपण स्वामीं आईचे बाळ आहोत..स्वामीं आपली किती काळजी घेतात…हा अनुभव आहे..जो सूक्ष्म असतो..जो अनुभवता आला पाहिजे..कारण आपले मन चांगले झाले की कधी म्हणते का? स्वामीं मुळे झाले ? जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत शोधू तेव्हा आपणस याचा अनुभव येतो..आपल्याला मनाला सांगता आले पाहिजे..घाबरू नकोस तू स्वामीं चा बाळ आहेस..हा पण इथे ही गोष्ट लक्षात असावी आपले कर्म स्वामीं ना भूषणावह असावे…एखादी गोष्ट आपणस अशक्य वाटत असेल तर..मनाला सांगा अशक्य असे काहीच नाही..कारण अशक्य हा शब्दच मुळात स्वामीं भक्ताला लागू होत नाही..मी फक्त १००% प्रयत्न करणार..आणि जो पर्यंत यश मिळत नाही..तो पर्यंत थांबणार नाही..कारण.. प्रत्येक वेळेस स्वामीं सांगतात की तू या पेक्षा चांगले करू शकतोस.. थांबू नकोस..पहा..सर्व काही शक्य होताना आपणस दिसेल.. धन्यवाद समर्था..! चला स्वामीं ना प्रार्थना करूया..हे समर्था..मी जाणतो की संपूर्ण ब्रम्हांड चा तूच तर चालक आहे..पण माझे मन।हे विसरते.. हे विसरल्या मुळे.. घाबरते..या मनाचा हा विसराळू पणा कायमचा दूर कर..अशक्य हा शब्द आमच्या मनातून..विचारातून काढून टाक.. कारण मी तुझे बालक आहे..आणि तू कधीच आम्हाला भरकटू देत नाहीस..ही समज दिल्याबद्दल धन्यवाद.. ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद…!


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...