आपण सर्व जाणतो का ?

Feb 5, 2023 | प्रार्थना व प्रेरणादायी विचार, मराठी

Share

स्वामी वाणी पुष्प ५७९(पर्व ४ थे भाग ८३)

आजचे चिंतन-मनन

न शास्त्र जाणतो , न धर्म जाणतो ,
न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो !
मुठमती मी अज्ञानी,
तुझ्या चरणापेक्षा काहीही मोठे नाही
इतुके मात्र जाणतो !
www.SwamiVaani.co.in

स्वामी भक्तहो.. आजची स्वामी वाणी समज हि आहे आणि प्रार्थना हि आहे.. हे समर्था मी शास्त्र जाणत नाही.. पहा आपण एखादे शास्त्राचा जरी आपण परिपूर्ण अभ्यास केला तरी देखील त्यातील काही तरी ज्ञान आपण जाणत नसतो.. पहा जसे आपणस एका जीव शास्त्राचे ज्ञान आहे तर भौतिक चे नाही.. हाच नियम अध्यात्मात हि लागू होतो.. न धर्म जाणतो.. इथे आपण म्हणू असे कसे मला माहित आहे कि मी अमूक अमुक धर्मात जन्म घेतला आहे हे मी जाणतो कि.. अहो पण इथे धर्म याचा अर्थ आहे आपणस मुख्य मनुष्य जन्माचा धर्म कोणता आहे.. नक्की कोणता धर्माचे पालन स्वामींना अपेक्षित आहे.. याचे आपल्या माहिती नाही.. न भक्ती जाणतो , न सेवा जाणतो ! आपण भक्ती कशी करावी सेवा कोणती करावी हे पण जाणत नाही..पहा आपण एका देवाची भक्ती करतो का नाही.. आपण या देवाची भक्ती करतो कधी त्या देवाची सेवा करतो.. म्हणजेच आपले चित्त एका ठिकाणी स्थिर होते का नाही..म्हणजेच आपण सर्वच गोष्टीत अज्ञानी आहोत.. पण मग या सर्वांवर उपाय काय.. स्वामी चरण सेवा.. कारण आपण कितीही ज्ञान प्राप्त केले तरी जो पर्यत आपणस सत्याचे ज्ञान मिळत नाही तो पर्यंत सर्व व्यर्थ आहे..यावर उपाय काय स्वामी नाम सेवा.. रोज स्वामी नाम घ्या.. वेळ मिळाला कि स्वामी नाम घ्या.. स्वामी नाम साठी वेळ द्या.. स्वामी नाम ध्यान करा.. पहा स्वामी कृपेचा वर्षाव कसा होतो .. हा स्व अनुभव आहे.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...