१ मंगलाचरण – श्री रामचरित मानस श्री तुलसीदास

Oct 16, 2022 | चरित्र, मराठी

Share

आपण संत श्रेष्ठ तुलसी दास यांच्या श्री रामचरित मानस यावर चिंतन मनन करणार आहोत प्रथम सोपान बालकाण्ड.. सर्व प्रथम मंगलाचरण केले आहे त्यात श्री गणपती बाप्पा , श्री सरस्वती माता , भगवान श्री शंकर , कवीश्वर वाल्मिकी , श्री हनुमानजी , श्री सीता माता प्रभू श्री राम यांना वंदन करत आहेत.. ते म्हणत आहेत प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करताना जो आनंद होत तो शब्दात व्यक्त होऊ शकत नाही.. यात मला जो आनंद प्राप्त होत आहे त्याचे वर्णन शब्दात करणे शक्य नाही… श्री गणपती बाप्पा मला या कार्यात यश द्या.. भगवान श्री नारायण यांचा निवास माझ्या ह्रदयात आहे.. भगवान श्री शंकराची माझ्यावर कृपा आहे.. सद्गुरूच्या चरणी वंदन करत आहे.. ज्याच्या हृदयात गुरूंचा वास आहे त्याच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो.. हा अंधार नाहीसा झाल्याशिवाय सत्याचे दर्शन होऊ शकत नाही..ब्राम्हणांच्या चरणी वंदन असो.. संत हे स्वतः दुःख सहन करतात परंतु समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न करत असतात.. म्हणूनच संत हे वंदनीय आहेत.. संत म्हणजे चालते बोलते तीर्थ क्षेत्रच… जो मनुष्य संतांच्या वचनाप्रमाणे अनुकरण करतात त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांची प्राप्ती होते.. याचा फायदा काय तर कावळे देखील कोकिळे प्रमाणे बनतात.. कारण सत्संगाचा महिमाच असा आहे.. स्व उद्धार करण्यासाठी सत्संगाशिवाय पर्याय नाही.. सत्संगती ने जसे परीस मुळे लोखंडाचे सोने होते त्या प्रमाणे आपल्यातील अवगुणांचा ऱ्हास होतो.. आपला उद्धार होतो.. संतांचा महिमा वर्णन करताना सर्वांचीच मती कुंठित होते.. ज्याचा कोणी मित्र नाही , शत्रू नाही.. कुना बाबत मनात किंतु परंतु नाही अश्या संतांच्या चरणी वंदन असो.. संत हे जगाचे हित करण्यासाठी झटत असतात..  अश्या संतांना मी प्रार्थना करतो कि श्री रामचे चरित वर्णन करण्याची शक्ती मला द्या… भक्ती द्या..दुष्ट प्रवृतीना सुद्धा मी वंदन करतो.. त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा दुष्टमधील दुष्ट पणा खरे तर स्वतःचे नुकसानच करतो जसे गारा पडल्याने नुकसान होते पण त्या गारा सुद्धा नंतर स्वतः नष्ट होतात त्या प्रमाणे आपल्यातील दुष्ट पणा आपला नाश अधिक करतो.. संत आणि दुष्ट दोघाच्या चरणी वंदन आहे.. दोघेही लोकांना दुःख देतात.. दुष्ट आपल्या वाईट कर्माने तर संत त्यांच्या वियोगाने लोकांना दुःख देतात.. आपण सर्वानी जे चांगले आहे ते सर्व घ्यावे… आपणास कसा संग  मिळतो त्या प्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून आपण नेहमी सत्संगाची कास धारावी …सर्वांमधील चैतन्याला वंदन असो.. सर्व जीवांना वंदन असो.. प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र अगाध आहे ते वर्णन करण्याची बुद्धी मला प्राप्त होवो.. ज्याप्रमाणे लहान बाळाचे बोल हे आई वडील समजून घेतात तसेच आपण हि माझी वाणी समजून घ्यावी.. हि कथा ऐकून सर्वजण सुखी होतील यात काही शंकां नाही.. मनात कोणतेही तर्क वितर्क ना लावता हि कथा श्रवण करावी तरच ती समजू शकेल.. कोणत्याही गोष्टीला राम नामाशिवाय शोभा नाही.. या मध्ये नेमके काय आहे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होईल तर यात प्रभू श्री रामाचा प्रताप .. महिमा आहे .. प्रभू श्री रामाची कथा हि कल्याण करणारी अशी आहे.. गाईचे दूध हे जसे पोषक असे असते मग ते काळ्या गाईचे असो वा इतर कोणत्याही तसेच प्रभू श्री रामचंद्रांची कथा हे सर्वांना प्रेरणा देणारी अशी आहे.. प्रभू श्री रामाचे चरित्र हे गुणांची खान आहे परंतु ती फक्त इतरांना सांगण्यासाठी आहे का तर नाही ती आपल्या जीवनांत आचारणात आणण्यासाठी आहे.. मी काही कवी नाही नाही वा लेखक हि नाही तरी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे… कारण शास्त्रा नुसार आपण जाणताच भजनाचा महिमा किती अगाध आहे… मग प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र वर्णन करण्याचा मोह मी कसा सोडू… भगवंत एकच आहे.. ज्याला आपण निराकार निर्गुण म्हणत असतो तो वेळोवेळी मनुष्य शरीर धारण करत असतो.. उद्दिष्ट असते जगत कल्याण.. अश्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून प्रभू श्री रामाची कथा आरंभ करत आहे… सुरुवातीला हि कथा व्यास वाल्मिकी यांनी सांगितली आहे… त्यावरच मी वर्णन करत आहे… ज्या सर्व कवींनी प्रभू श्री रामाचे चरित्र वर्णन केले आहे त्या सर्वांनां वंदन करत आहे… आपण सर्वानी माझ्यावर कृपा करावी.. ज्या वाल्मिक ऋषींनी हि रचना केली त्यांच्या चरण कमलानं वंदन असो.. चारही वेदांना वंदन असो… ब्रम्ह देवांच्या चरणी वंदन असो… श्री गंगा मातेच्या चरणी वंदन असो… श्री शंकर पार्वती… माझे माता पिता यांच्या चरणी वंदन असो… आयोध्या पुरीला वंदन असो.. शरयू नदीला वंदन असो… पर्व दिशेला वंदन असो राजा दशरथ व त्यांच्या राण्यांना वंदन असो… राजा जनकाला हि वंदन असो… राजा भरताच्या चरणी वंदन असो… लक्ष्मणाच्या चरणी वंदन असो… कृपासिंधू सुमित्रानंदन लक्ष्मण यांना वंदन असो.. हनुमानाच्या चरणी देखील वंदनवानरांचे राजा सुग्रीव , अस्वलांचे राजे जांबवान राक्षस राजे बिभीषण आणि अंगद यांच्या चरणी वंदन… सर्व प्रभू श्री रामाचे उपासक सेवक सर्वांच्या चरणी वंदन.. शुकदेव , सनकादि , नारदमुनी या सर्वांनां वंदन आपण कृपा करा… जानकीमातेच्या चरणी वंदन… श्री सीता रामचंद्रच्या चरणी वंदन .

अश्या प्रकारे तुलसीदासांच्या मंगलाचरण केले आहे.. धन्यवाद तुलसीदास महाराज आपण आम्हाला हे मंगलचरण समजण्याची बुद्धी दिलीत.. असेच आम्हाला प्रभू श्री रामचंद्राचे चरित्र समजण्याची बुद्धी द्या हीच आपल्या चरणी प्रार्थना


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...