यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९

Jan 16, 2022 | प्रेरनादाई कथा, मराठी

Share

यत्न शिकवण – श्री समर्थ रामदास स्वामी – श्री दासबोध दशक १२ समास ९
प्रत्येक संतांनी कर्माला महत्व दिले… असा कोणतेही संत नाहीत कि त्यांनी कर्म सोडून…दे रे हरी पलंगावरी… असे कोणत्याच संतांनी सांगितले नाही… कारण प्रत्येक संत हे कर्म प्रधानच होते… कर्म न करणारे मनुष्य श्री रामदास स्वामींना करंटे वाटतात…श्री रामदास स्वामी आपणस कर्म कसे असावं याची शिकवण देत आहेत… समर्थ सांगत आहेत… सर्वप्रथम आपणास आपल्या मनाला शिकवण देणे आवश्यक आहे… म्हणजेच आपल्याला आपल्या मनावर कार्य करणे आवश्यक आहे…कारण मन हे सर्व गोष्टीचे कारक असते त्यामुळे आपणस मनावर कार्य करणे आवश्यक आहे… कार्य कोणतेही असो लहान असो व मोठे असो आपणस कर्म करणे आवश्यक आहे… मग ते कर्म करत असताना काही गोष्टी आवश्यक असतात… माणसाने सदैव तत्पर असणे आवश्यक आहे… काम कोणतेही असो आपण ते सुरु केल्या पासून ते पूर्ण होई पर्यंत न थांबता प्रयत्न करत राहणे खूप महत्वाचे असे आहे..  त्या शिवाय कामात यश प्राप्त होऊ शकत नाही… आळस पूर्णपणे सोडून देणे आवश्यक आहे.. अनेकदा आपले मन निराश होते कारण आपणस यश येत नाही… तरी देखील आपणस न थांबता न थकता प्रयत्न सुरु ठेवणे आवश्यक आहे… त्यानंतर आपणस आपल्या जीवनात काही बदल करणे आवश्यक आहे… रोज सकाळी लवकर उठावे… उठल्या नंतर प्रथम भगवंताचे नामस्मरण करावे… प्रातः कर्मे प्रथम पूर्ण करावेत… रोज काही तरी नवीन पाठ करावे… नवीन शिकावे… रोज त्याची उजळणी करावी.. असे होऊ नये पुढचे पाठ मागचे सपाट… नंतर थोडासा फलाहार घ्यावा… त्यानंतर आपण जे काही नोकरी.. व्यवसाय करत असाल त्यास सुरवात करावी… महाराज सांगतात… आपले अक्षर सुंदर असावे… वाचन सुद्धा स्पष्ट असावे… शुद्ध असावे… आपणस एखाद्या विषयाची काही अडचण असेल तर त्या बाबत आपण तज्ञ् व्यक्तींना विनासंकोच विचारावे… असे नाही कि मी कसे विचारू…आपले अज्ञान लपवू नका… त्याच प्रमाणे आपल्या कडे कुणी आले तर त्याचे समाधान देखील पण करावे.. पण त्याला चुकीचे मार्गदर्शन करू नये…रोज काही तरी आध्यात्मिक ग्रंथाचे वा चांगले साहित्य वाचावे… नुसते साहित्य वाचू नये तर त्यावर स्व चिंतन करावे… स्व चिंतन करून समजले नाही तर त्यातील तज्ञ् व्यक्तींना विचारावे… शक्य असेल तर आपण आपले आध्यत्मिक ज्ञान वा चांगले ज्ञान इतरांना द्यावे परंतु ते सत्य असावे खोटे नसावे… आपले आचरण हे सत्य असावे… म्हणजेच आपण जसे बोलतो तसेच आपले कर्म असावे… म्हणजेच बोले तैसे वागे.. त्याची वंदावी पाऊले । आपले आचरण असे असावे कि ज्याचा इतरांना त्रास होऊ नये.. या सर्व गोष्टी बरोबर महाराज महत्वाची गोष्ट सांगत आहेत…आपल्या ह्रदयात जो भगवंत आहे त्याचे नेहमी ध्यान… चिंतन करण्याचा अभ्यास करावा… अश्या पद्धतीने जर आपले कर्म असेल तर नक्कीच एक दिवस आपणस यश प्राप्त होते यात कोणतीच शंका नसावी.
नक्कीच आपण श्री दासबोध ग्रंथाचा अभ्यास करावा… जय जय रघुवीर समर्थ !
चला आपण समर्थांना प्रार्थना करूया – हे समर्था आज जी आपण आम्हाला यत्नशिकवण दिलीत त्या बद्दल धन्यवाद… आज पर्यंत आम्ही दैववादी होतो… परंतु आज तुम्ही आम्हाला प्रयत्न वादाची… कर्माची शिकवण दिलीत त्याबद्दल धन्यवाद.. आमच्या मनाला सदैव हि शिकवण स्मरणात रहावी… जो पर्यंत यशाची प्राप्ती होत नाही तो पर्यंत न थांबता.. न थकता.. प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा आम्हाला दे… आणि तू जो ह्रदयात स्थित आहेस… त्यावर माझे चित्त स्थिर कर… धन्यवाद समर्था… हि प्रार्थना करून घेतल्या बद्दल धन्यवाद ! जय जय रघुवीर समर्थ


Share
और पढिये !!

श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार...

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे... आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण...

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो...इच्छा...आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी... अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन...

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे. स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व...

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा...

ईश्वर एकच आहे

बोध - आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा. प्रार्थना - स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला...

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा...! बोध-- वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू...स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते..."सूरदास" ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण...

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो...आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना..."श्री स्वामीं समर्थ" १०८ वेळेस म्हणा...पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत... फक्त स्वामीं नाम...पहा किती सोपे।आहे...अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच...

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे...

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ...आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत...आपण विधिवत पूजा करत आहोत...आपल्या मनातील भाव तपासून पहा...कुठे तरी...