स्वामी भक्तहो.. स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत भक्ती हवी.. आपण सर्व स्वामींची भक्ती करतो पण कधी कधी आपले मन स्वामी भक्ती मध्ये व्यवहारिक पणा आणते.. इथे एक गोष्ट स्प्ष्ट करावीशी वाटते ती म्हणजे प्रार्थना आणि व्यवहारिक पणा यातील भेद आपणस समजला पाहिजे..नक्कीच तो यातून समजून येईल.. पहा मला काहीतरी अडचण आहे जसे मला एखादी वस्तू हवी आहे.. मी स्वामींना म्हणतो.. स्वामी माझे अमुक अमुक काम करा मी तुम्हाला अमुक अमुक देईल.. पहा एकीकडे आपण म्हणतो कि स्वामी तुम्हीं मला द्या.. याचा अर्थ आपले अंतर्मन जाणते कि आपण हे करू शकत नाही या साठी स्वामी कृपा हवी… आता मला सांगा जर मला स्वामीच मला देणार आहेत.. जो देणारा आहे त्याला मी काय देणार..म्हणजेच आपण आपल्यातील भक्ती भाव सोडून व्यवहारिक पणा आणतो..आता आपण अशी प्रार्थना करू शकतो कि स्वामी आपण तर सर्व जाणताच.. तरीही मी प्रार्थना करत आहे.. माझे अमुक अमुक कार्य व्हावे हि प्रार्थना.. पहा इथे प्रार्थना आहे म्हणजे आपल्यातील भक्ती भाव वाढतो.. जर स्वामींना काही द्यायचे असेल तर आपल्यातील अवगुण स्वामी चरणी अर्पण करू.. कारण स्वामी कृपेने ते दूर होतील हा विश्वास आहे..धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद..!! आपणही चिंतन मनन करा.. प्रार्थना करा हि विनंती
अहंकार
हे समर्था… माझ्यातील अहंकार ही सर्वात मोठी बाधा आहे… माझ्यातील अहं म्हणतो..मी केले म्हणून हे होत आहे.. पण तुझ्या इच्छे शिवाय मी श्वास ही घेऊ शकत नाही पण माझ्यातील अहं हे विसरते..आणि खोट्या अहं पोटी माझे नुकसान होते.. माझ्यातील अहंकार नष्ट कर..कारण तो जो पर्यंत संपत नाही..तो पर्यंत कोणतीच प्रगती होऊ शकत नाही..धन्यवाद समर्था..बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..👍
www.chetnakeswar.com
आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!
आपले मंदिर स्वच्छ ठेवूया..भक्ती वाढवूया..!
श्रावण मासी हर्ष मानसी…आपल्या मनात भक्ती भाव वाढवण्याचा मास…आपण।अनेक संकल्प करतो..अनेक मंदिरात जातो..विशेषतः श्री शिव मंदिरात आपण जातो..आपण अनेक गोष्टी भगवान श्री शिव यांना अर्पण करतो..मग आपण अनेक गोष्टी पिंडीवर वाहतो..मग आपल्या भक्ती मुळे तिथे अनेक माश्या होतात..मुंग्या होतात..पहा आपणच मंदिराची स्वच्छता राखली नाही तर ती कोण राखणार..आपणस आपले घर स्वच्छ ठेवतो..तसे मंदिर ही स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे…मग आपण म्हणाल आम्ही ईश्वराला काही अर्पण करायचे नाही का? करायचे त्यासाठी मंदिरात..४- ५ डबे ठेवा… त्यात साखर, दूध, जवस, तीळ, दही, तूप,तेल अजून काही असेल ते त्या डब्यात ठेवा.. आपण मंदिरात अर्पण करत आहोत..ते असे अर्पण केले तर मंदिर स्वच्छ राहतील…हार फुले घ्या ती आपल्या घरी घेऊन आपली घरच्या देवाला वाह…श्री फळ ( नारळ) एक तर देवाला अर्पण करा किंवा प्रसाद म्हणून आपल्या घरी घेऊन जा..घरी जाऊन फोडा..आता प्रश्न निर्माण होईल..मंदिरात असे डबे नाहीत..अहो..आपणच आपल्या परीसरातील मंदिरात ही व्यवस्था करावी..पहा खूप छान सेवा होईल..वाहायचे असेल तर श्री महादेवाच्या चरणी फक्त पाणी अर्पण करूया.. मात्र त्याच बरोबर आपल्यातील षड्ररिपू अर्पण करणे अति महत्वाचे आहे..आपण सर्व ज्ञानी आहात.. नक्कीच आपल्या भक्ती मुळे आपले मंदिर आपण स्वच्छ ठेवाल…धन्यवाद स्वामीं..👍
www.chetnakeswar. com
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २६ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७
श्री खंडू पाटील रोज श्री महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असत.. श्री खंडू पाटील महाराजांना सवयी प्रमाणे गण्या असे म्हणत असत.. एकेदिवशी कुकाजी खंडू पाटलाला म्हणतात अरे तू रोज श्री महाराजांच्या दर्शनाला जातोस त्यांना प्रार्थना कर आमच्या घरी संतती होऊ दे.. कारण पाटील घराण्यात संतति नव्हती.. कुकाजीच्या म्हणण्याप्रमाणे श्री खंडू पाटील श्री महाराजांना प्रार्थना करतात कि आम्हाला संतती प्राप्ती व्हावी.. यावर श्री महाराज हसतात आणि म्हणतात अरे तुम्ही तर पाटील ना मग हि गोष्ट सुद्धा तुम्हाला सहज प्राप्त करता आली पाहिजे..खंडू पाटील नम्रतेने म्हणतात महाराज जसे पीक हे पाण्याशिवाय येत नाही पण पाऊस पाडणे मनुष्याच्या हाती नाही.. तसेच हीही गोष्ट ईश्वरी इच्छे शिवाय शकय नाही.. महाराज हसतात आणि म्हणतात नक्कीच मी ईश्वराला प्रार्थना करतो कि तुला संतती व्हावी.. फक्त एवढेच कर संतती झाली कि आमरसाचे भोजन सर्वांना दे.. काही दिवसांनी आनंदाची बातमी कानी पडली.. गंगाबाई यांना दिवस गेले.. नवमास पूर्ण झाल्यावर त्यांना संतती झाली.. त्याचे नाव त्यांनी भिकू ठेवले.. पाटील घराणे आनंदी झाले त्यांनी अनेक दानधर्म केले.. तसेच आमरसाचे भोजन हि दिलें.. आजही हि प्रथा सुरु आहे असा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथांत येतो..बोला श्री गजानन महाराज कि जय … !
बोध – आपण सर्व काही प्राप्त करु शकतो परंतु आपण कर्ता नाही तर कर्म करण्यास निमित्त आहोत… कर्म प्रामाणिक करा.. ईश्वराच्या इच्छेने आपणस सर्व काही मिळणारच आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७
श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २५ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ७
श्री गजानन महाराज श्री हरी पाटलांच्या भावाला म्हणत आहेत बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो
हरी पाटील श्री महाराजांचे सेवक ( भक्त झाले ) हे पाहून त्यांचे चारही बंधूना आश्चर्य वाटले.. त्यांनी हरी पाटील ला समजावून सांगितले तू जे करत आहे ते चुकीचे आहे.. आपण पाटील आहोत.. लोक आपले ऐकतात आणि आपण त्या महाराजांची सेवा करता.. हे चारही भाऊ उसाची मुळी घेऊन मंदिरात गेले आणि श्री महाराजांना म्हणतात.. ऊस खाणार का ? जर आपण ऊस खाणार असाल तर आमची एक अट आहे ती जर आपणस मान्य असेल तर आम्ही आपणस ऊस देतो.. आम्ही तुम्हाला उसाने मारणार जर तुमच्या अंगावर एकही वण उठला नाही तरच आम्ही आपणस योगी मानू.. महाराज काहीच बोलले नाही.. त्यातील एक भाऊ म्हणाला महाराज काही बोलत नाही म्हणजेच ते घाबरले आहेत असे मारुती म्हणाल.. तर दुसरा भाऊ गणपती म्हणतो अरे त्यांचे मौन आहे याचा अर्थ त्यांची संमती आहे..ते सर्व जण महाराजांना मारण्यासाठी आले.. हे सर्व पाहून बाकी सर्व सेवेकरी पळून गेली पण भास्कर पाटील मात्र तिथेच थांबले आणि त्या चौघांना सांगत होते.. अरे अशी चूक करू नका.. मात्र ते चौघे मात्र ऐकण्यास तयार नव्हते.. ते मारत होते महाराज मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते..त्यांनी इतके मारले मात्र महाराजांच्या शरीरावर एक हि वण नव्हता.. हे पाहून ते चौघे घाबरली आणि श्री महाराजांच्या चरणी लीन झाले.. महाराज त्यांना म्हणतात बाळांनो तुमच्या हाताला खूप त्रास झाला असेल तो त्रास दूर करण्यासाठी तुम्हाला उसाचा रस काढून देतो.. श्री महाराजांनी हाताने उसाचा रस काढला न कोणता चरका होता न काही यंत्र.. हे पाहून त्या चारही भावांना महाराजांच्या योग सामर्थ्यचि अनुभूती आली.. अश्या प्रकारे पाटील बंधू श्री महाराजांचे सेवक ( भक्त) झाले .. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !
बोध – श्री महाराज आपली चुकी माफ करतात फक्त आपणस महाराजांना ह्रदयपूर्वक समर्पित व्हायचे आहे.. बोला श्री गजानन महाराज कि जय