ईश्वर एकच आहे

बोध – आपली श्रद्धा कोणत्याही देवावर असो.. ईश्वर एकच आहे.. कुणी स्वामी म्हणेल.. कुणी माऊली.. कुणी राम , कुणी कृष्ण पण प्रत्येकाची हाक हि स्वामी कडे जाते..फक्त आपला विश्वास महत्वाचा.

प्रार्थना – स्वामी ज्या प्रमाणे सूरदास यांच्या हाकेला वो दिलीस तशीच तू आमच्या हाकेला सुद्धा वो देतोस.. पण आमचे अज्ञान असल्यामुळे आम्ही त्यात भेद करतो.. आणि तुझ्या कृपे पासून दूर राहतो.. कृपा कर..सूरदास यांच्या प्रमाणे आमच्यावर हि कृपा कर..धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय..

स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध

स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा…!
बोध– वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू…स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते…”सूरदास” ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण भक्ती करताना नाम सेवा केली..नामात तल्लीन झाले…मग काय..त्यांची हाक इतकी भाव पूर्ण होती की स्वामीं ना वो द्यावी लागली..आपणस ही स्वामीं नामाची कास धरायची आहे..अशी की जशी सूरदास यांनी धरली.. अडचण येतील..मुखातून स्वामीं नाम..आणि आपले कार्य सुरू ठेवायचे आहे..पहा आपला आणि स्वामीं चा सूर नक्की जुळेल…धन्यवाद स्वामीं..!

प्रार्थना– स्वामीं ज्या प्रमाणे सूरदास यांचा सूर तुझ्या भक्तीत एकरूप झाला तसे आमचे.. सूर स्वामीं नामाशी एकरूप कर..आमचा सुरू म्हणेल हे करेल..त्याला परत तुझ्या नामच्या सुरात एकरूप कर..हे तूच करू शकतोस..धन्यवाद समर्था..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!
www.chetnakeswar.com

घरातील देवांना अभिषेक

स्वामीं भक्तहो…आपण रोज आपल्या घरातील देवांना अभिषेक करावा..पण मंत्र माहीत नाहीत..अहो..महामंत्र माहीत आहे ना…”श्री स्वामीं समर्थ” १०८ वेळेस म्हणा…पुजा सुरू केल्यापासून.. संपेपर्यंत… फक्त स्वामीं नाम…पहा किती सोपे।आहे…अहो माझ्या स्वामीं ची सेवा सोपीच आहे…फक्त आपण करत नाही… स्वामीं नाम हे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे..करून पहा..! धन्यवाद स्वामीं

स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत

स्वामीं भक्तहो..या लीलेत स्वामीं भक्ती भाव जागृत करण्यास सांगत आहेत..पण भक्ती कशी वाढेल..ती दृढ कशी होईल..कारण नुसते भक्ती भाव म्हणून तो जागृत होईल का? आपल्याला भुक लागली आहे..समोर पंचपक्वांन्न आहेत..ते पाहून आपली भुक भागेल का? त्या साठी आपणस ते अन्न खावे लागेल..स्वामीं भक्ती सुद्धा अशीच आहे..आपली भक्तीची भुक तेव्हाच वाढेल जेव्हा आपण सेवा करू..सेवा म्हणजे स्वामीं नाम घेणे असेल..स्वामीं च्या लीला वाचून त्यातून स्वामीं काय सांगत आहेत यावर..चिंतन मनन करणे…हे रोज करावे लागेल…यात एक अडचण येते..आपले मन म्हणते..की या लीलेत अमुक व्यक्ती आहेत त्यांनी असे का केले..असे करायला नको होते..खरंतर त्यानी असे या साठी केले की..स्वामीं नी त्यांना बुद्धी दिली की ..पुढच्या पिढीने ही चूक करू नये..म्हणजेच प्रत्येक लीला ही आपली भक्ती वाढण्यासाठी आहे..पण आपण नको ते विचार करून आपले नुकसान करतो..असो आपणस आपली भक्ती वाढवण्यासाठी कार्य करायचे आहे…चला स्वामीं नाम+ चरित्र वाचन+श्रवण+चिंतन मनन करून भक्ती दृढ करूया…! धन्यवाद समर्था..!
आपणही चिंतन मनन करा..ते लिहून काढा..इतरांशी share करा

भक्ती आणि ज्ञान

स्वामीं भक्त हो..भक्ती आणि ज्ञान या एकमेकांना पूरक आहेत तश्याच बाधक ही आहेत..आपण म्हणाल कसे..आता आपण आपलेच उदाहरण घेऊ…आपल्याला स्वामीं ची पुजा करायची आहे..आपल्याला सगळे मंत्र आणि तंत्र माहिती आहेत…आपण विधिवत पूजा करत आहोत…आपल्या मनातील भाव तपासून पहा…कुठे तरी अहंकार असणारच..कारण आपण हे सर्व ज्ञान अभ्यास करून मिळवले आहे..ते शुद्ध आहे पण आपले मन ते ग्रहण करू शकत नाही…आता दुसरा एक स्वामीं भक्त आहे..त्याला न कोणता मंत्र माहीत आहे न तंत्र माहीत आहे..पण त्याच्या ह्रदयात स्वामीं भक्ती रुजली आहे..स्वामीं नाम मुखात आहे..तो भोळा भाव धरून फक्त स्वामीं नाम घेत स्वामीं चा अभिषेक करत आहे…मनात कोणताच अहं नाही..आता आपणच विचार करा कुणाचा भक्ती भाव हा खोल असेल…नक्कीच ज्ञान हे भक्तीतून निर्माण झाले तर आपले कल्याण करते..पण केवळ ज्ञान आपले नुकसान करते..थोडक्यात आपणस तंत्र वा मंत्र यात न अडकता..स्वामीं नाम आणि भक्ती यावर कार्य करायचे आहे..इथे एक गोष्ट समजून घ्यावी प्रत्येक पद्धती ही त्या त्या काळा नुसार योग्य च होती..आहे पण आपणस व्यक्तिमत्व विकास करताना आपणस योग्य काय याचा विचार करून..स्वामीं भक्ती वाढवायची आहे…मनात कोणताही अहं न ठेवता..धन्यवाद स्वामीं..!