श्री गजानन महाराज चरित्र दर्शन २७ – संदर्भ – श्री गजानन विजय अध्याय ८

शेगाव मध्ये पाटील आणि देशमुख या दोन कुटुंबामध्ये भांडण होते.. खंडू पाटील यांना देशमुख यांचा नोकर रस्त्याने जाताना दिसला.. खंडू पाटील यांनी त्याला आपले एक काम सांगितले कि.. आपले कि कागदपत्रे आहेत हे गावातील सरकारी कार्यालयात जाऊन देऊन ये.. परंतु त्याने ते काम नकार दिला.. हा नकार ऐकताच त्यांना फार राग आला आणि त्यांनी त्या नोकराला मारले इतके मारले कि तो बेशुद्धच पडला.. त्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलून देशमुखांकडे नेले.. देशमुखाने पाटलांच्या विरोधात फिर्याद नोंदवली.. आता मात्र पाटील घाबरले.. त्यांना काय करावे काही सुचत नव्हते.. तेव्हा ते श्री महाराजा कडे आले.. महाराजांना सर्व हकीगत सांगितले.. महाराज म्हणाले अरे.. आधी विचार केला नाहीस.. आपण दोघेही समंजस आहात तरी एकमेकांशी भांडता.. लोकांनी आपल्या कडून काय घ्यावे.. महाराजांचे हे बोलणे ऐकून खंडू पाटील यांना आपली चुक समजली.. त्याचा त्यांना पश्चात होत होता.. महाराज म्हणाले काळजी करू नकोस काही होणार नाही.. महाराजांच्या वाणी प्रमाणे खंडू पाटील यांची फिर्यादी तुन सुटका झाली.. बोला श्री गजानन महाराज कि जय.. !

बोध – अनेकदा आपण रागाच्या भरात चुकीचे काम करतो.. कुणाला काही तरी बोलतो.. आपणस आपली चूक नंतर कळते.. पण नंतर पश्चाताप करून काय उपयोग.. त्या ऐवजी नेहमी कर्म करताना.. कोणतीही प्रतिक्रिया देताना ती एकदम रागात न देता शांतपणे द्यावी..!

यश मिळवणे सोपे आहे

यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे… आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण होतो कि ८० टक्के मिळवणे यश नाही का.. आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही पण याचा अर्थ असा नक्कीच नाही कि अपयश आले आहे..म्हणजेच इथे कुठे तरी अपेक्षे प्रमाणे मार्क्स पडले नाहीत म्हणजेच कुठेतरी आपला अभ्यास कमी पडला असावा .. पण तो विद्यार्थी मिळालेले मार्क्स सोडून जे नाही त्यावर दुःख करतो आणि यश हे अपयश वाटते.. असेच आपल्या जीवनात अनके ठिकाणी घडते.. आपण कुठेतरी नोकरी साठी अर्ज करतो.. जसा आपण अर्ज करतो असेच अनेक जण अर्ज करत असतात.. आपले त्या कंपनीत काम होत नाहीत तेव्हा आपण म्हणतो कि मला यश आले नाह.. खरतर कुठंतरी आपले ज्ञान कमी असेल वा आपल्यासाठी ती नोकरी योग्य नसावी म्हणून मिळाली नसावी पण आपण आलेल अपयश इतके गिरवतो कि आपले मन फक्त अपयश मिळाले एवढेच उत्तर देते.. खरंतर आपणस जेव्हा अपयश मिळते तेव्हा नक्कीच ईश्वर आपणस आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हा निर्देश देत असतो.. खरंतर आपणस आलेल्या अपयश रुपी पायरीला आपण यशाची पायरी बनवू शकतो.. फक्त गरज असते ती म्हणजे पुन्हा प्रयत्न करण्याची.. आणि अपेक्षित यश मिळण्यासाठी अपयशाला अपयश न म्हणता यशाची एक पायरी पूर्ण झाली असे म्हणू या कारण आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या कार्यावर होतो.. म्हणून अपयश आले तरी नेहमी म्हणूया कि यशाच्या पहिल्या पायरीकडे वाटचाल केली आहे आणखी थोडे कष्ट आवश्यक आहेत कारण यशाच्या जवळच तर मी पोहचलो आहे.. पहा हा एक विचार आपल्या यशाची व्याख्याच बदलून टाकेल.. धन्यवाद समर्था

इच्छा पूर्ती चा मंत्र

स्वामीं भक्तहो…इच्छा…आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी… अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन करूया..आपणही करा…पाहूया स्वामीं काय चिंतन मनन करून घेतात..👍

इच्छा.. आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग.. आपण हि म्हण लहानपणा पासून ऐकतो आहोत.. पण खरंच आपण यावर विचार केला आहे का … इच्छा आपल्या मनात दिवसभरात किती विचार येतात आणि जातात.. किती इच्छा पूर्ण होतात.. किती इच्छा अपूर्ण राहतात.. म्हणजेच आपल्या अनेकच इच्छा या अतृत्प राहतात.. पण मग आपण असे काही करू शकतो का कि आपल्या इच्छा पूर्ण होतील त्याचा काही राज मार्ग आहे का ? हो आहे.. आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा एका वहीत लिहा.. त्या वहिला आपण इच्छा पूर्ती वही म्हणू या.. या वहीत दिवसभरत आपल्या मनात अश्या कोण कोणत्या इच्छा निर्माण झाल्या त्या लिहा.. इच्छा या वास्तविक अश्या असाव्यात.. जसे मला काही दिवसात इंग्रजी भाषेत बोलण्याची कला अवगत करायची आहे.. प्रत्येक इच्छा जी तुम्हाला पूर्ण करायची आहे ती वहीत लिहीत जा.. ती वही आपल्या इच्छे पूर्तीचे कार्य करणार आहे.. आता आपण इच्छा लिहिली मग ती पूर्ण करण्यासाठी आपणस काय काय करायचे आहे याचे संपूर्ण माहिती लिहून काढा.. त्या नुसार कार्य सुरु करा.. रोज आपण त्या नुसार कार्य करत आहोत कि नाही याचे सुद्धा आपण स्वतः आत्म परीक्षण करा.. करा हळू हळू आपली इच्छा पूर्ण होईल.. काही इच्छा तर अश्या असतील कि ज्या काही दिवसात सुद्धा पूर्ण होतील.. काही साठी कालावधी लागेल.. पहा आपण जाणवेल आपल्यातच इच्छा पूर्तीची जादू आहे पण ती आपण विसरलो होतो.. स्वामी आपणस यश देतातच हा विश्वास आहे.. अनुभव आहे… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले

बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले
आपण जे आचरण करतो.. तेच उपदेश लोकांना द्यायचे.
स्वामी भक्त हो आजच्या स्वामी वाणी तुन स्वामी सांगत आहेत.. आपल्या वाणी तुन आपण जे बोलतो तसेच आपले आचारण असले पाहिजे.. म्हणजे समजा आपण म्हणत असू कि अमुक गोष्ट करू नका वाईट असते.. पण सर्व प्रथम आपण त्या गोष्टीचे आचरण करणे आवश्यक आहे कारण कोणतीही चांगली गोष्ट हि प्रथम आचरणांत आणावी.. मग त्या गोष्टी चे महत्व आपणस इतरांना सांगण्याची गरज नाही.. कारण आपल्या आचरणातून ती दिसते.. जसे आपण नेहमी खरे बोलत असू तर.. आपली मुले हि नेहमी खरेच बोलणार यात काही शंका नाही.. पण आपले काय होते आपण इतरांना मार्गदर्शन करतो पण आपण स्वतः त्याचे आचरण करत नाही.. स्वामी नाम आपण घेत नाही आणि इतरांना म्हणू कि स्वामी नाम घ्या.. स्वामी सेवा करा तर कसे चालेले.. म्हणजेच सर्वप्रथम आपल्यात बदल करा.. बाकी आपल्या भोवती सर्व चांगलेच होईल.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. !

स्वामींना कोणीही फसवू शकत नाही

स्वामी भक्तहो.. कितीही चलाखी करा.. स्वामींना कोणीही फसवू शकत नाही..स्वामींना सर्व समजते..!! स्वामी भक्त हो यात खूप खोल असा अर्थ आहे.. सर्वप्रथम आपल्या मनात येते आम्ही तर कोणतीच चलाखी करत नाही..हे आपण जे उत्तर देत आहोत हेही आपल्या मनाची चलाखी आहे ना.. पहा स्वामी सेवा करायची म्हंटल कि आम्ही म्हणतो वेळ नाही.. आज कंटाळा आला.. आज नाही उद्या.. पण त्याच वेळेस नको त्या गोष्टींसाठी आपण नको तितका वेळ देत असतो.. जसे सोशल मीडिया असेल वा इतर अनेक गोष्टींवर.. पण स्वामी नाम किंवा सेवा करायची म्हंटल कि वेळ नाही.. या ठिकाणी आपले मन चलाखी करते.. आपणस असे वाटते कि आपण खरं बोलत आहोत पण.. इथे आपण स्वतः ला फसवत असतो.. एक प्रकारे स्वामींना हि सेवा न करता कारणे दाखवून फसवू पाहतो.. खरेतर आपण आपल्या स्वतःला फसवत असतो.. आपल्यातील या चुकीच्या विचारांवर आपणस मात करायची आहे..म्हणजेच आपणस प्रामाणिक स्वामी सेवा करायची आहे.. धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद.. !