रोजची क्षमा प्रार्थना

श्री स्वामी समर्थ
हे समर्था.. मला माफ कर.. दिवसभरात जर माझ्याकडून काही चुकी झाली असे तर मला माफ कर.. परत ती चुकी होणार नाही अशी प्रेरणा मला दे.. दिवसभरात माझ्याकडून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ कर.. समोरच्या व्यक्तीला हि माफ कर.. मनात कोणतेच किंतु परंतु राहू देऊ नकोस… माझे अभ्यासात लक्ष लागू दे.. मी जो काही अभ्यास करेल त्यात माझे लक्षात राहू दे .. रोज काही तरी नवीन शिकण्याची प्रेरणा मला दे.. सर्वांना सुखात.. आनंदात.. ऐश्वर्यात ठेव.. तुझे गोड नाम सदैव मुखात राहू दे .. हे शरीर देवता मला माफ कर आज पर्यंत तुला धन्यवाद दिले नाहीत त्याबद्दल मला माफ कर.. आज पर्यंत जशी मला साथ दिलीस तशीच इथून पुढेही देत रहा हि विनंती.. तुला निरोगी राहण्यासाठी आवश्यक ते भोजन घेण्याची प्रेरणा मला दे.. धन्यवाद समर्था .. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय

जसे पांडवांना श्री कृष्ण भेटले..तसा अनुभव आपणस येईल का?

!!श्री स्वामी समर्थ!!

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
हरिपाठ
पहा काय बोध होतो..स्वामीं नाम घ्या ..स्वामीं नाम..किमान रोज १ माळ..!
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो..माऊली आपणस वरील ओवीतून नामाची महती सांगत आहेत..व्यास महाराजांनी जे सांगितले आहे त्यानुसार..द्वारकाधिश म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री कृष्ण हे पांडवा बरोबर होते..राहिले..पहा इथे आपण पांडवांनी सुद्धा नामरूपी सेवा केली त्याच्या फलस्वरूप भगवान श्री कृष्ण त्यांच्या बरोबर होते… पहा इथे आपणस आणखीन एक बोध होतो तो म्हणजे आपण कुणाचे सानिध्य पसंद करतो.. पांडवांनी भगवान श्री कृष्ण यांची साथ पसंद केली परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेच..आपण ही रोजच्या जीवनात कोणत्या लोकांबरोबर असते त्या नुसार आपले, आचार , विचार , आहार असतो..त्या नुसार आपले जीवन घडत असते..म्हणून आपण नेहमी सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहावे.. रोज नित्य नियमाने नाम सेवा करावी..जशी कृपा पांडवा वर झाली तशी नक्कीच आपल्यावर होईल..धन्यवाद समर्था.. कोटी कोटी धन्यवाद

असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।

!!श्री स्वामी समर्थ!!
असोनी संसारी जिह्वे वेगु करी ।
दशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
हरिपाठ
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो….संत श्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली इथे आपणस नामाची महती सांगत आहेत..संसारात असताना नाम घ्या..पहा किती सोपे आहे..हाताने प्रापंचिक कर्म..मुखाने नाम..म्हणजे प्रापंचिक कर्म करताना मुखात नाम असेल तर सुंदर असा आपला प्रपंच होईल तसेच नाम रुपी सेवा ही होईल..पहा इतर कोणती सेवा करायची असेल तर आपणस अनेक साधनांची आवश्यकता पडते..पण नाम साधनेसाठी काय लागते? काहीच नाही फक्त आपली मानसिक तयारी आवश्यक आहे की मी रोज नाम रुपी सेवा करेलच..दहा शास्त्रे, वेद पुराणे जर आपण वाचलीत तर त्यात आपण काय मिळते तर..नामाचा महिमा..इतका अगाध आहे नामाचा महिमा..आपणस इतक्या स्पष्ट शब्दांत माऊली सांगत आहेत..नाम घ्या नाम..कोणतेही घ्या पण नाम घ्या..बाकी सर्व होणारच आहे..चला आजपासून स्वामी नाम सेवेस सुरवात करूया..धन्यवाद स्वामीं.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!

हरि मुखे म्हणा.. हरि मुखे म्हणा

!!श्री स्वामी समर्थ!!
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥२॥
हरिपाठ
पहा नामाचा महिमा..रोज किमान १ माळ स्वामीं नाम जप करूया..!
www.chetnakeswar.com

स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत..मुखाने नाम घ्या..त्या सारखे दुसरे पुण्य नाही.. खरंतर नामाचा महिमा इतका अगाध आहे की..सर्वच संतांनी नामाचा महिमा वर्णन केला आहे..आपण अनेक संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला तर आपणस जाणवते की..सर्वात सुटसुटीत ईश्वर सेवेचा मार्ग म्हणजे..नाम सेवा.. इथे महत्वाची गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवावी ती म्हणजे..अमुक एकच नाम श्रेष्ठ असे कधीच मनात आणू नये..भगवंताचे प्रत्येक नाम हे श्रेष्ठच आहे..आपण कोणतेही नाम घेतले तरी तो ओ देतोच..फक्त आपणस नामा विषयी प्रेम भाव निर्माण होणे आवश्यक आहे..हा प्रेम भाव निर्माण होण्यासाठी आपणस रोज सातत्याने नाम सेवा करणे आवश्यक आहे..पहा साखरेची गोडी समजण्यासाठी जसे आपणस साखर खाणे आवश्यक आहे..तसेच नामाची गोडी कशी आहे..नामाने काय होते..याचा अनुभव हवा असेल तर नाम घेणे आवश्यक आहे..त्या शिवाय आपणस नामाची अनुभुती येणार नाही.. चला तर मग आज पासून स्वामीं नाम सेवेस सुरवात करूया..जीवनाचे सार्थक करूया..धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..!

देवाचे द्वार कुठे आहे..चिंतन मनन

श्री स्वामी समर्थ
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।
तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥

हरिपाठ ओवी चिंतन मनन

स्वामीं भक्तहो..संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली..हरिपाठच्या पहिल्या ओवीतून आपणस मुक्तीचा मार्ग सांगत आहेत..देवाच्या द्वारात क्षणभर जरी आपण विसावलो तरी आपणस मुक्ती ची अनुभूती येते..खरंतर देवाचं द्वार म्हणजे काय हे आधी समजून घेणे आवश्यक आहे.. देवाचे द्वार म्हणजे इथे माऊली आपणस कोणत्या मंदिरता जाण्यास सांगत आहेत का ? हो आपणस माऊली मंदिरात जाण्यास सांगत आहेत.. पण मग प्रश्न निर्माण होतो..कोणत्या मंदिरात ? माऊली सांगत आहेत ते मंदिर म्हणजे जे आपल्या सर्वांना मिळाले आहे..हे मंदिर नसेल तर आपले आस्तित्व संपते..हे मंदिर म्हणजे आपले शरीर..आपले शरीर मंदिरच आहे..पहा आपण थोडा वेळ श्वास रोखला तर काय होते..या मंदिरातून नाद होतो..श्वास घे ..नाहीतर माझे आस्तित्व संपेल..म्हणजेच आपणस प्राप्त शरीर हेच मंदिर आहे..आता हे मंदिर कसे आहे? आपण कधी आत डोकावतो का? आपण म्हणाला सिटी स्कॅन केले की संपूर्ण शरीर दिसते.. अहो पण आपल्यातील..चांगलेपणा किंवा वाईटपणा त्यात दिसतो का ? नाही..आपण स्वतःच आपले अंतर्मुख दर्शन घेऊ शकतो का उघड्या डोळ्यांनी? नाही..मग या मंदिरातील स्व चे दर्शन होणार कसे.. माऊली सांगतात क्षणभर जरी आपण आपल्या आत डोकावण्याचा प्रयत्न केला तरी आपणस मुक्ती चा अनुभव येईल..आता आपण म्हणाला हे लगेचच झाले पाहिजे..ते शक्य नाही.. त्या साठी आपणस स्वामीं नाम घ्यावे लागेल..श्री स्वामी समर्थ म्हणा , राम कृष्ण हरी म्हणा, किंवा आणखी कोणतेही नाम घ्या..यात सातत्य ठेवा.. नाम घेता घेता..नामात दंग व्हा..पहा.. हळुहळु आपले मन नामावर स्थिर होईत..अनेक स्व अनुभव येतील, व्यक्तिमत्व विकास होईल..अजूनही बरेच काही होईल..फक्त गरज आहे..आपल्याला जे शरीर रुपी मंदिर मिळाले आहे..त्याचा खरा अर्थ समजून उपयोग करण्याचा.. बाकी सर्व होईल..फक्त सेवेत सातत्य ठेवा.. धन्यवाद समर्था..कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!