यश मिळवणे सोपे आहे कि अवघड आहे.. आपल्या प्रत्येकाला यश हवे.. जसे आपल्याला यश हवे आहे तसे यश प्रत्येकालाच हवे आहे… आपल्या प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी आहे.. विद्यार्थी असेल तर काही म्हणतील ८० टक्के मिळावेत..८० टक्के मिळणार ८५ म्हणेल.. पण मग इथे प्रश्न निर्माण होतो कि ८० टक्के मिळवणे यश नाही का.. आपल्या अपेक्षे प्रमाणे नाही पण याचा अर्थ असा नक्कीच नाही कि अपयश आले आहे..म्हणजेच इथे कुठे तरी अपेक्षे प्रमाणे मार्क्स पडले नाहीत म्हणजेच कुठेतरी आपला अभ्यास कमी पडला असावा .. पण तो विद्यार्थी मिळालेले मार्क्स सोडून जे नाही त्यावर दुःख करतो आणि यश हे अपयश वाटते.. असेच आपल्या जीवनात अनके ठिकाणी घडते.. आपण कुठेतरी नोकरी साठी अर्ज करतो.. जसा आपण अर्ज करतो असेच अनेक जण अर्ज करत असतात.. आपले त्या कंपनीत काम होत नाहीत तेव्हा आपण म्हणतो कि मला यश आले नाह.. खरतर कुठंतरी आपले ज्ञान कमी असेल वा आपल्यासाठी ती नोकरी योग्य नसावी म्हणून मिळाली नसावी पण आपण आलेल अपयश इतके गिरवतो कि आपले मन फक्त अपयश मिळाले एवढेच उत्तर देते.. खरंतर आपणस जेव्हा अपयश मिळते तेव्हा नक्कीच ईश्वर आपणस आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे हा निर्देश देत असतो.. खरंतर आपणस आलेल्या अपयश रुपी पायरीला आपण यशाची पायरी बनवू शकतो.. फक्त गरज असते ती म्हणजे पुन्हा प्रयत्न करण्याची.. आणि अपेक्षित यश मिळण्यासाठी अपयशाला अपयश न म्हणता यशाची एक पायरी पूर्ण झाली असे म्हणू या कारण आपल्या विचारांचा प्रभाव आपल्या कार्यावर होतो.. म्हणून अपयश आले तरी नेहमी म्हणूया कि यशाच्या पहिल्या पायरीकडे वाटचाल केली आहे आणखी थोडे कष्ट आवश्यक आहेत कारण यशाच्या जवळच तर मी पोहचलो आहे.. पहा हा एक विचार आपल्या यशाची व्याख्याच बदलून टाकेल.. धन्यवाद समर्था
इच्छा पूर्ती चा मंत्र
स्वामीं भक्तहो…इच्छा…आपण नेहमी म्हणतो..माझी अमुक अमुक इच्छा आहे..थोड्या वेळाने दुसरी इच्छा निर्माण होते..पुन्हा तिसरी… अश्या अनेक इच्छा आपल्या मनात निर्माण होतात..खरंच आपली इच्छा काय आहे..आपली कोणती इच्छा पूर्ण होते..कोणती इच्छा पूर्ण होते..नक्कीच यावर चिंतन मनन करूया..आपणही करा…पाहूया स्वामीं काय चिंतन मनन करून घेतात..👍
इच्छा.. आपण म्हणतो इच्छा तिथे मार्ग.. आपण हि म्हण लहानपणा पासून ऐकतो आहोत.. पण खरंच आपण यावर विचार केला आहे का … इच्छा आपल्या मनात दिवसभरात किती विचार येतात आणि जातात.. किती इच्छा पूर्ण होतात.. किती इच्छा अपूर्ण राहतात.. म्हणजेच आपल्या अनेकच इच्छा या अतृत्प राहतात.. पण मग आपण असे काही करू शकतो का कि आपल्या इच्छा पूर्ण होतील त्याचा काही राज मार्ग आहे का ? हो आहे.. आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा एका वहीत लिहा.. त्या वहिला आपण इच्छा पूर्ती वही म्हणू या.. या वहीत दिवसभरत आपल्या मनात अश्या कोण कोणत्या इच्छा निर्माण झाल्या त्या लिहा.. इच्छा या वास्तविक अश्या असाव्यात.. जसे मला काही दिवसात इंग्रजी भाषेत बोलण्याची कला अवगत करायची आहे.. प्रत्येक इच्छा जी तुम्हाला पूर्ण करायची आहे ती वहीत लिहीत जा.. ती वही आपल्या इच्छे पूर्तीचे कार्य करणार आहे.. आता आपण इच्छा लिहिली मग ती पूर्ण करण्यासाठी आपणस काय काय करायचे आहे याचे संपूर्ण माहिती लिहून काढा.. त्या नुसार कार्य सुरु करा.. रोज आपण त्या नुसार कार्य करत आहोत कि नाही याचे सुद्धा आपण स्वतः आत्म परीक्षण करा.. करा हळू हळू आपली इच्छा पूर्ण होईल.. काही इच्छा तर अश्या असतील कि ज्या काही दिवसात सुद्धा पूर्ण होतील.. काही साठी कालावधी लागेल.. पहा आपण जाणवेल आपल्यातच इच्छा पूर्तीची जादू आहे पण ती आपण विसरलो होतो.. स्वामी आपणस यश देतातच हा विश्वास आहे.. अनुभव आहे… बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय
स्वामी भक्त सूरदास यांच्या पासून बोध
स्वामीं भक्त हो..आपण लीला।वाचली असेल..नसेल तर वाचा…!
बोध– वरील लीला जर आपण वाचली..चिंतन मनंन केले तर..बोधच बोध आहेत..चला आजचा बोध पाहू…स्वामीं नी कृपा केली त्याचे नाव काय होते…”सूरदास” ज्यांचा सूर स्वामीं च्या सुराशी जुळला आहे..तो का जुळला त्यांनी..श्री कृष्ण भक्ती करताना नाम सेवा केली..नामात तल्लीन झाले…मग काय..त्यांची हाक इतकी भाव पूर्ण होती की स्वामीं ना वो द्यावी लागली..आपणस ही स्वामीं नामाची कास धरायची आहे..अशी की जशी सूरदास यांनी धरली.. अडचण येतील..मुखातून स्वामीं नाम..आणि आपले कार्य सुरू ठेवायचे आहे..पहा आपला आणि स्वामीं चा सूर नक्की जुळेल…धन्यवाद स्वामीं..!
प्रार्थना– स्वामीं ज्या प्रमाणे सूरदास यांचा सूर तुझ्या भक्तीत एकरूप झाला तसे आमचे.. सूर स्वामीं नामाशी एकरूप कर..आमचा सुरू म्हणेल हे करेल..त्याला परत तुझ्या नामच्या सुरात एकरूप कर..हे तूच करू शकतोस..धन्यवाद समर्था..ही प्रार्थना करून घेतल्याबद्दल धन्यवाद..!
www.chetnakeswar.com
मन निशंक कसे करावे
निशंक – स्वामी भक्त हो आपण तारक मंत्रात निशंक हा शब्द ऐकतो अनेकदा आपण म्हंटला आहे.. पण मग आपले मन नक्की निशंक झाले आहे का? छोटी मोठी समस्या आली कि आपले मन शंकां निर्माण करते का ? नक्कीच करते कारण आपले मन अजून निशंक झाले नाही आहे त्या मुळे हे होते.. या साठी सर्व प्रथम आपणस आपल्या मनाला कार्य दयावे लागेल.. स्वामी नाम सेवा करण्याचे कार्य आपणस मनाला देणे आवश्यक आहे.. पहा जेव्हा स्वामी नाम घेऊ आणि मनाला सांगू हे मना निशंक हो कारण स्वामी आपलय सोबत आहेत.. काही दिवसात आपल्या मनातील शंकेचे रूपांतरण श्रद्धेत होईल.. फक्त या साठी रोज मनाला स्वामी नामाचे टॉनिक दयावे.. धन्यवाद स्वामी.. कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामी समर्थ महाराज कि जय.. www.chetnakeswar.com
चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?
चिंतन- नाम जप करताना मनात वाईट विचार येतात?
मनन- नाम जप करत असताना किंवा ध्यान करत असताना..मनात वाईट विचार येतात… असे वाटते की नको तो जप नको ते ध्यान…खरंतर जेव्हा हे विचार येत असतात ती आपली आंतरिक सफाई असते.. जी आपण आज पर्यत कधीच केलेली नसते म्हणून आपणस नको वाटते..कारण मनाला चांगले नको असते… आपण आपले बाह्य शरीर वा कपडे स्वच्छ करतो पण मन मात्र कधीच स्वच्छ करत नाही… जेव्हा हे विचार येतात याचा अर्थ आपण आतून स्वच्छ होत आहोत…जो पर्यंत आतून स्वच्छ होत नाही तो पर्यंत प्रगती कशी होईल.म्हणून कितीही त्रास होऊद्या पण नाम साधना..नाम जप सोडू नका..धन्यवाद स्वामीं… कोटी कोटी धन्यवाद.. बोला श्री स्वामीं समर्थ महाराज की जय..!
www.chetnakeswar.com